आम्ही पण काही कमी नाही:आम्हाला फक्त एक तास द्या, पहलगाम हल्ल्यानंतर संतोष बांगर पाकिस्तानवर खवळले

आम्ही पण काही कमी नाही:आम्हाला फक्त एक तास द्या, पहलगाम हल्ल्यानंतर संतोष बांगर पाकिस्तानवर खवळले

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली. नाव आणि धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या तसेच केवळ पुरुषांनाच मारण्यात आले. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना जसास तसं उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेवर हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पण काही कमी नाही, आम्हाला फक्त एक तास द्या, असे विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. पत्रकारांशी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले, जम्मूत झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे हिंदू त्यात मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पहलगाममध्ये आंतकवाद्यांनी जो हल्ला केला, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे काही आतंकवादी आणि भारतात राहणारे काही आतंकवादी होते. यात आपण जर पाहिले तर त्याठिकाणी त्यांनी त्यांची वैयक्तिक जमीन विकली आणि त्या ठिकाणी आतंकवादी घडवले. काश्मीरमध्ये राहणारा, भारत देशात राहतो, या हिंदुस्तानाचे खातो आणि गुण जर पाकिस्तानचे गात असेल तर मला वाटते अशा लोकांना या हिंदुस्तानात राहण्याचा अधिकार नाही. पुढे बोलताना संतोष बांगर म्हणाले, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माझी हात जोडून विनंती आहे पाकिस्तानंतर जे भारतात राहून आपल्या लोकांवर अत्याचार करताय, आतंकवादी घडवताय, या लोकांना बाहेर काढून गोळ्या घातल्या पाहिजे. आम्हाला फक्त एक तास द्या, आम्ही पण काश्मीरला येतो, आम्ही काही कमी नाही, त्यांना तशाला तसं उत्तर देऊ. काल तिथली महिला माझी बहीण ती म्हणत होती, माझ्या नवऱ्याला तुम्ही मारले मलाही मारून टाका. त्यावर तो आतंकवादी म्हणतो तुमच्या नरेंद्र मोदीला मारायला सांग. दोन वर्षांचा मुलगा सांगतो की माझ्यासमोर माझ्या वडिलांना मारले. यांचा पापाचा घडा भरला आहे आता. येणाऱ्या काहीह दिवसांत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा धडा शिकवणार आहेत. त्या काश्मीरमध्ये जाऊन आपल्याच इथे राहणाऱ्या आतंकवाद्यांनी बाहेर काढून भर रस्त्यात गोळ्या घातल्या पाहिजेत, असे संतोष बांगर म्हणाले. पुढे बोलताना बांगर म्हणाले, काल तो पाकिस्तानचा म्हणत होता की पाकिस्तानचे 25 कोटी मुसलमान, बांगलादेशचे 25 कोटी मुसलमान आणि भारतातले 25 कोटी मुसलमान आम्ही सगळे भारतात घुसून भारताला मिटवून टाकू म्हणाले. अरे हिंदुस्थानातील जनता जर मुतली न तर पाकिस्तान वाहून जाईल, अशा शब्दात संतोष बांगर यांनी संताप व्यक्त केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment