अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत:शरद पवार यांचा थेट हल्ला; म्हणाले – देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणे अपेक्षित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. अमित शहा यांचे बोलणे अतिशय अतिटोकाचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ते कोल्हापूरला शिकले आहेत. मात्र त्यांचे बोलणे ऐकून हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांच्यावरील संस्काराचा उल्लेख पवार यांनी केला आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. अमित शहा हे सातत्याने जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सातत्याने घेतली आहे. अमित शहा आणि त्यांचा बोलण्याचा टोन हा अति टोकाचा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी अधिक तारतम्य ठेवून भाष्य करणे अपेक्षित असल्याचे शरद पवार म्हणाले. खरे म्हणले हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. अमित शहा हे कोल्हापूरला शिकले की कुठे शिकले हे मला माहिती नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अमित शहा यांच्यावर पवारांनी जोरदार हल्ला चढवला. ठाकरेंचे पदाधिकारी पक्ष सोडणार नाहीत उद्धव ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मौन बाळगले असल्याचे पाहायला मिळाले होते. यावर देखील पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यात तथ्य वाटते का? असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला होता. मात्र मला तसे वाटत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अमित शहा यांच्यावर देखील जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही नेते आणि पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. काही माणसे अशी आहेत की जे पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत. ठाकरेंची नेते हे त्यांचा पक्ष सोडतील असे मला वाटत नसल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. उद्योग मंत्र्यांच्या दाव्यावर देखील टीका उद्योग मंत्री दावोसला गुंतवणुकीसाठी गेले की लोक फोडण्यासाठी गेले? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर शरद पवार यांनी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खरे शिवसैनिक सोडणार नाही, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला.

  

Share