अमोल मिटकरींनी ‘उंटाच्या…..’ घेण्याचा प्रयत्न करू नये:भाजप आमदार सुरेश धस यांचा पलटवार; मस्साजोग प्रकरणात महायुतीमधील आमदारांमध्येच जुंपली

अमोल मिटकरींनी ‘उंटाच्या…..’ घेण्याचा प्रयत्न करू नये:भाजप आमदार सुरेश धस यांचा पलटवार; मस्साजोग प्रकरणात महायुतीमधील आमदारांमध्येच जुंपली

महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. याला उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांनी सुपारी घेतली असल्याची टीका केली होती. मात्र, यावर आता सुरेश धस यांनी देखील जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. अमोल मिटकरी अतिशय लहान आहेत. त्यांनी उंटाचा ….. घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात धस यांनी मिटकरी यांना सुनावले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणी उद्या बीड जिल्ह्यामध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात भारतीय जनता पक्षाचा एकही नेता सहभागी होणार नसल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. मात्र त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांना देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ते अद्याप खूप लहान असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. बीड पोलिसांवर देखील आरोप बीड जिल्ह्यातील पोलिस हे एखाद्या नेत्याचे समर्थक किंवा एखादा पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यांना समज देण्याची मागणी देखील भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे. पोलीसच काही माहिती देखील आरोपींना पुरवत असल्याचा आरोप देखील धस यांनी केला आहे. मोर्चात सहभागी नाही पण अधिकाऱ्यांशी संपर्कात बीडमध्ये उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नसल्याचे देखील आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी आपण सीआयडी अधिकाऱ्यांची चर्चा केली असल्याचे देखील धस यांनी सांगितले. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. काय म्हणाले होते अमोल मिटकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत. त्याच मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. बीडमधील सर्वच आमदारांनी यासंबंधी वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे. यात भाजप आमदार सुरेश धस यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही निशाणा साधला. या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा… यानंतर कोणीही पोरके होऊ नये:सतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख भावूक; लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शांततेच पार पडला मोर्चा माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे मत मस्साजोग येथील हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने व्यक्त केले आहे. रेणापूर मध्ये ज्या पद्धतीने शांततेत महामोर्चा झाला. त्या पद्धतीनेच बीड मधील किंवा इतर मोर्चे देखील शांततेत व्हावेत, अशी अपेक्षा वैभवी देशमुखने व्यक्त केली. माझे वडील मला पोरके करून गेले. मात्र यानंतर कोणीही पोरके होऊ नये, आणि आमच्या पाठीशी त्यांनी कायम राहावे, अशी अपेक्षा वैभवी देशमुखने व्यक्त केली. पूर्ण बातमी वाचा… अर्बन नक्षलवाद मोडण्याआधी बीडचा दहशतवाद मोडा:संजय राऊत यांचे फडणवीसांना आव्हान; बीडचा बिहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेलीच नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल बीडमध्ये पोलिस स्टेशन समोर एक हत्या झाली आहे. पोलिस स्टेशनच्या आवारात कोयत्याने सपासप वार करत, एका सामाजिक कार्यकर्तांचे जीवन संपवले गेले. बीडचा बिहार झाला आहे, तेथे कोणाचेही लक्ष नाही. तेथील जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्ण बातमी वाचा… सरकार जर गुन्हेगारांच्या पाठीमागे उभे राहत असेल तर गुन्हेगारांची हिंमत वाढणार; विजय वडेट्टीवार यांचा आरोप सरकार जर गुन्हेगारांच्या पाठीमागे उभे राहत असेल तर गुन्हेगारांची हिंमत वाढणार. मस्साजोग मध्ये जी घटना घडली त्याचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे अजूनही या आरोपींचा आका अजूनही बाहेर आहे. इतकेच नाही तर या आकाचा वरचा आका देखील बिनधास्त असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बीड जिल्हा महाराष्ट्रातील बिहार असल्याचे एका आयपीएस अधिकाऱ्याने म्हटले होते, असा दावा देखील त्यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment