अमरावती एक्स्प्रेस मालट्रकवर धडकली: मध्य रेल्वे 6 तास ठप्प:बाेदवडजवळ अपघात, जीवितहानी टळली, 10 गाड्यांना विलंब

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बोदवड स्थानकानजीक शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून अमरावतीकडे जाणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसने (ट्रेन क्रमांक १२१११) सकाळी साडेचार वाजता बूम बॅरियर असलेल्या ठिकाणी गव्हाने भरलेल्या ट्रकला समाेरासमाेर धडक दिली. सुदैवाने या अपघातात काेणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भुसावळ रेल्वे विभागातील अप डाऊन मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली. धडकेमुळे ट्रकचे प्रचंड नुकसान झाले. ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर (ओएचई) डाउनस्ट्रीमला नुकसान झाले. ती दुरुस्त केल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता वाहतूक सुरळीत झाली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार गेटवरील बूम बॅरियर ओलांडताना गव्हाने भरलेला एक ट्रक रेल्वे मार्गावर आला आणि रेल्वेशी समोरासमोर धडक झाली. ही घटना किलाेमीटर ४७४/३४-३६ येथे घडली. अमरावती एक्सप्रेसच्या लोको पायलटने घटनेची माहिती दिल्याने क्रेन आणि कार्गो तैनात करण्यात आले. ओएचई दुरुस्तीच्या कामासाठी मलकापूरहून एक टॉवर वॅगन व डिझल इंजिन पाठविण्यात आले. ट्रक काढण्यासाठी हायड्रा क्रेनचा वापर करण्यात आला. प्रवाशांना मदत करण्यासाठी भुसावळ विभागाचा विविध रेल्वे स्थानकांवर कक्ष सुरू झाले. तसेच भुसावळ, वरणगाव, बोदवड, मलकापूर, शेगाव आणि अकोला स्थानकांवर प्रवाशांना नाश्ता आणि पाणी वाटप करण्यात आले. चार गाड्यांचे बदलले मार्ग रेल्वे प्रशासनाने बोदवड स्थानकावर प्रवाशांसाठी बस सेवा उपलब्ध करून दिल्या. गाड़ी क्रमांक १२८४४, २२१३८, १२८०९, २२१४१, या गाड्या भुसावळ सेक्शन मध्ये उभ्या होत्या, गाडी क्रमांक १८०२९,१२२६१, १२६५५, ११०३९ या गाड्या खंडवा, इटारसी नागपूर मार्गे वळविण्यात आल्या. सकाळी १०:१४ वाजता वाहतूक पुन्हा सुरू झाली. गाड्यांना पुन्हा विलंब शुक्रवारी सकाळी मनमाड स्थानकातून उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या अनेक गाड्यांना १ ते १४ तासापर्यंतचा विलंब झाला. वेळापत्रक विस्कळीत झाल्याने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. गाड्यांची नावे (विलंब/तासांत) अयोध्या कुर्ला एक्सप्रेस : १
भुवनेश्वर कुर्ला एक्सप्रेस : ५
पुणे काजीपूर एक्सप्रेस : २
ट्रकवर आदळलेले रेल्वेइंजिन.
अमृतसर नांदेड सचखंड : २
दानापूर पुणे होळी स्पेशल : ३
ऋषिकेश हुबळी स्पेशल ट्रेन : २
दानापूर पुणे सुपर : ३
गाजीपूर पुणे होळी स्पेशल : १२
नागपूर पुणे होळी स्पेशल : ९
कालका शिर्डी एक्सप्रेस : २