पुण्यात काेयते फिरवून रस्त्यावरील वाहनांची ताेडफाेड:धनकवडी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पुण्यात काेयते फिरवून रस्त्यावरील वाहनांची ताेडफाेड:धनकवडी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

धनकवडी परिसरातील शेलार चाळ याठिकाणी 18 ते 22 वयाेगटातील दाेन मुले व त्यांचे इतर साथीदार यांनी हातात धारदार काेयते फिरवून ‘आम्ही इथले भाई आहेत, जाे काेणी आमचे समाेर येईल व आमचे नादाला लागेल त्याला आम्ही साेडणार नाही’ असे म्हणत रस्त्यावरील पार्क करण्यात आलेल्या वाहनांची ताेडफाेड करुन दहशत निर्माण करत लाेकांच्या मनात भिती निर्माण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत रिक्षाचालक सुरज बंडु शेंडकर (वय-54) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे राहत असलेल्या ठिकाणी काही अनाेळखी मुले हे गाडीवरुन आरडाआेरड करत तेथे आली. त्यांनी हातातील काेयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई असल्याचे सांगत राडा सुरु केला. जाेरजाेरात आरडाआेरड करुन त्यांनी आम्ही इथले भाई असल्याचे सांगत लाेकांचे मनात दहशत निर्माण केली. तसेच सदर आराेपींनी साेहम साेनार याचा शाेध घेतला. परंतु ताे मिळून न आल्याने त्यांनी रस्त्याचे कडेला उभी असलेली तक्रारदार यांची रिक्षा याचे समाेरील काचेवर काेयत्याने वार करुन रिक्षाच्या काचा फाेडल्या. तसेच बाजूला उभ्या असेल्या दाेन दुचाकी वाहनावर देखील काेयत्याने वार करुन त्याचे नुकसान केले. तसेच तक्रारदार यांचे घरासमाेर रहाणारे राजेश कुंजीर यांचे कारचे मागील बाजूस काेयत्याने मारुन त्याचे देखील नुकसान करण्यात आले. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे. पेट्राेल टाकून गाडया जाळल्या मार्केटयार्ड परिसरात गगनविहार साेसायटीच्या ई विंगच्या प्रवेशद्वारा जवळ साेसायटीतील काही वाहने पार्क करण्यात आली हाेती. त्यावेळी काही मुले ही प्लॅस्टकीचे बाटलीत पेट्राेल घेऊन गगनविहार साेसायटीचे मुख्य गेट मधून सुरक्षारक्षका समाेरुन बेकायदेशीरपणे आत शिरली. त्यांनी प्रवेशद्वाराचे जवळचे कार पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दाेन दुचाकी व एक कार यांच्यावर पेट्राेल आेतून आग लावून दिली. यामध्ये पाच लाख दहा हजारांचे नुकसान झाले आहे. मानवी जिवीत व इतरांची सुरक्षितता धाेक्यात येईल इतक्या बेदारकपणे तसेच निष्काळीजपणे इमारत नष्ट करण्याचे उद्देशाने वाहनांना आग लावून साेसायटीतील रहिवासी लाेकांची सुरक्षितता धाेक्यात आणल्याने दाेन अल्पवयीन मुलांसह पाचजणांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल चव्हाण (वय-25), महेंद्रअ आहुजी (22) व आदित्य साखरे अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.

​धनकवडी परिसरातील शेलार चाळ याठिकाणी 18 ते 22 वयाेगटातील दाेन मुले व त्यांचे इतर साथीदार यांनी हातात धारदार काेयते फिरवून ‘आम्ही इथले भाई आहेत, जाे काेणी आमचे समाेर येईल व आमचे नादाला लागेल त्याला आम्ही साेडणार नाही’ असे म्हणत रस्त्यावरील पार्क करण्यात आलेल्या वाहनांची ताेडफाेड करुन दहशत निर्माण करत लाेकांच्या मनात भिती निर्माण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत रिक्षाचालक सुरज बंडु शेंडकर (वय-54) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे राहत असलेल्या ठिकाणी काही अनाेळखी मुले हे गाडीवरुन आरडाआेरड करत तेथे आली. त्यांनी हातातील काेयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई असल्याचे सांगत राडा सुरु केला. जाेरजाेरात आरडाआेरड करुन त्यांनी आम्ही इथले भाई असल्याचे सांगत लाेकांचे मनात दहशत निर्माण केली. तसेच सदर आराेपींनी साेहम साेनार याचा शाेध घेतला. परंतु ताे मिळून न आल्याने त्यांनी रस्त्याचे कडेला उभी असलेली तक्रारदार यांची रिक्षा याचे समाेरील काचेवर काेयत्याने वार करुन रिक्षाच्या काचा फाेडल्या. तसेच बाजूला उभ्या असेल्या दाेन दुचाकी वाहनावर देखील काेयत्याने वार करुन त्याचे नुकसान केले. तसेच तक्रारदार यांचे घरासमाेर रहाणारे राजेश कुंजीर यांचे कारचे मागील बाजूस काेयत्याने मारुन त्याचे देखील नुकसान करण्यात आले. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे. पेट्राेल टाकून गाडया जाळल्या मार्केटयार्ड परिसरात गगनविहार साेसायटीच्या ई विंगच्या प्रवेशद्वारा जवळ साेसायटीतील काही वाहने पार्क करण्यात आली हाेती. त्यावेळी काही मुले ही प्लॅस्टकीचे बाटलीत पेट्राेल घेऊन गगनविहार साेसायटीचे मुख्य गेट मधून सुरक्षारक्षका समाेरुन बेकायदेशीरपणे आत शिरली. त्यांनी प्रवेशद्वाराचे जवळचे कार पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दाेन दुचाकी व एक कार यांच्यावर पेट्राेल आेतून आग लावून दिली. यामध्ये पाच लाख दहा हजारांचे नुकसान झाले आहे. मानवी जिवीत व इतरांची सुरक्षितता धाेक्यात येईल इतक्या बेदारकपणे तसेच निष्काळीजपणे इमारत नष्ट करण्याचे उद्देशाने वाहनांना आग लावून साेसायटीतील रहिवासी लाेकांची सुरक्षितता धाेक्यात आणल्याने दाेन अल्पवयीन मुलांसह पाचजणांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल चव्हाण (वय-25), महेंद्रअ आहुजी (22) व आदित्य साखरे अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment