आनंदाचा क्षण क्षणात दुःखात बदलला:मुलगी आयएएस झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, यवतमाळची घटना

आनंदाचा क्षण क्षणात दुःखात बदलला:मुलगी आयएएस झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, यवतमाळची घटना

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आणि यातच त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. पुसद पंचायत समितीचे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आयएएस अधिकारी पदावर निवड झाली. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने महागाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. खंदारे कुटुंबावर यामुळे शोककळा पसरली आहे. आनंदाचा क्षण क्षणात दुःखात बदलून गेला. आपल्या लेकीला आयएएस अधिकारी पाहण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण तर झाले परंतु त्याचा आनंद साजरा नाही करता आला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, मुंबई जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश असलेले पुत्र विक्रांत, नव्यानेच आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली मुलगी मोहिनी, स्नुषा स्वाती व बराच मोठा आप्त परिवार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment