अंजनगावात बनावट कपाशी बियाणे जप्त:कृषी अधिकाऱ्यांनी केली फिल्मी स्टाईल कारवाई, 2.44 लाखांचा माल जप्त, मुख्य सूत्रधार गुलदस्त्यात‎

अंजनगावात बनावट कपाशी बियाणे जप्त:कृषी अधिकाऱ्यांनी केली फिल्मी स्टाईल कारवाई, 2.44 लाखांचा माल जप्त, मुख्य सूत्रधार गुलदस्त्यात‎

जिल्ह्यात अवैध कापूस बियाणे दाखल होताच त्यासंबंधी कृषी विभागाने कारवाई सत्र सुरू केले आहे. या अंतर्गतच अंजनगाव सुर्जीतील देवनाथ नगरात सोमवारी कारवाई करत २ लाख ४४३८७ रुपये किमतीचे विक्रीची परवानगी नसलेले १७४ पॅकेट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले. तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असून, बनावट एचटीबीटी कापूस बियाणेप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद वा. सरोदे (५४) हा बऱ्याच दिवसांपासून एचटीबीटी बियाण्याचा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर त्यास पकडण्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्विन राठोड यांनी शेतकऱ्याचे वेषांतर करून विनोद सरोदेकडे बियाण्यांची मागणी केली. त्याने बियाणे विकत देण्याचे मान्य केल्यानंतर पथकातील प्रफुल्ल सातव उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर, विराग देशमुख जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अमरावती, तालुका कृषी अधिकारी भारती जाधव, कृषी अधिकारी नरेंद्र वसुक, कृषी अधिकारी पं. स. अश्विन राठोड, कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने विनोद सरोदेच्या घरी धाड टाकली. घराची तपासणी केली असता तेथे अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला. अनधिकृत बियाण्यांची खरेदी करणे टाळावेच शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची विक्री होत असेल तर त्याची सूचना भरारी पथकाला द्यावी व शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये तसेच अधिकृत कृषी सेवा केंद्र दुकानातूनच पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे, असे आवाहन या वेळी कृषी विभागाने केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment