गणपती बाप्पा मोरया! भारत माता की जयच्या घोषणा:भारतीय लष्कराच्या जवानांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

गणपती बाप्पा मोरया! भारत माता की जयच्या घोषणा:भारतीय लष्कराच्या जवानांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

श्री गणेश महाराज की जय… गणपती बाप्पा मोरया… भारत माता की जय… जय हिंद अशा घोषणांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडप दुमदुमून गेला. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या दक्षिण कमांड (सदर्न कमांड) मधील अधिकारी जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचे स्वागत व सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय जवानांना व त्यांच्या कुटुंबांना गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेता यावे, याकरिता हे अधिकारी व जवान गणेशोत्सवात आवर्जून येतात. यावेळी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी देखील सन्मानचिन्ह देऊन ट्रस्टचा गौरव केला. तसेच ट्रस्टच्या कार्याची माहिती देखील जाणून घेतली. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) पुणेच्या अध्यक्षपदी ललित बनसोड दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) पुणेच्या अध्यक्षपदी ललित बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. डिक्की ही देशभरातील दलित उद्योजकांची शिखर संस्था आहे. डिक्कीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे उपस्थित होते. यावेळी डिक्कीचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर, माजी अध्यक्ष राजू साळवे ,अविनाश जगताप यासह दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते बनसोड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

​श्री गणेश महाराज की जय… गणपती बाप्पा मोरया… भारत माता की जय… जय हिंद अशा घोषणांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडप दुमदुमून गेला. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या दक्षिण कमांड (सदर्न कमांड) मधील अधिकारी जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचे स्वागत व सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय जवानांना व त्यांच्या कुटुंबांना गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेता यावे, याकरिता हे अधिकारी व जवान गणेशोत्सवात आवर्जून येतात. यावेळी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी देखील सन्मानचिन्ह देऊन ट्रस्टचा गौरव केला. तसेच ट्रस्टच्या कार्याची माहिती देखील जाणून घेतली. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) पुणेच्या अध्यक्षपदी ललित बनसोड दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) पुणेच्या अध्यक्षपदी ललित बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. डिक्की ही देशभरातील दलित उद्योजकांची शिखर संस्था आहे. डिक्कीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे उपस्थित होते. यावेळी डिक्कीचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर, माजी अध्यक्ष राजू साळवे ,अविनाश जगताप यासह दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते बनसोड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment