वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन परीक्षेसंदर्भात घेतली संचालकांची भेट:शालेय निकाल लावण्यासंदर्भात शिक्षकांना अडचणी

इ. १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा/संकलित मूल्यमापन (पॅट) परीक्षेसंदर्भात केलेले वेळापत्रक गैरसोयीचे असून शालेय निकाल लावण्यासंदर्भात शिक्षकांना अडचणी येणार आहेत. याकरिता विविध शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक राहुल रेखावार यांची गुरुवारी भेट घेतली. १९ एप्रिल पर्यंत वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन परीक्षा घ्याव्यात. यासह पेपर तपासणीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, शालेय कामकाज ,निकाल तयार करणे व जाहीर करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप, शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. वार्षिक परीक्षा/संकलित मूल्यमापन (PAT) परीक्षेसंदर्भात पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी घेतली मा. संचालकांची भेट .