अरविंदजी हिरवे जॅकेट वक्फसाठी घातले का?:श्रीकांत शिंदेंचा खोचक सवाल, म्हणाले – ठाकरेंच्या पक्षाला हिंदुत्वाचीच नाही, तर हिंदूंचीही ॲलर्जी

अरविंदजी हिरवे जॅकेट वक्फसाठी घातले का?:श्रीकांत शिंदेंचा खोचक सवाल, म्हणाले – ठाकरेंच्या पक्षाला हिंदुत्वाचीच नाही, तर हिंदूंचीही ॲलर्जी

संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे, तर ठाकरे गटाने या विधेयकाचा विरोध केला आहे. श्रीकांत शिंदे यांना विधेयकावर बोलताना ठाकरे गटाने मांडलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या पक्षाला हिंदुत्वच नाही, तर हिंदूंचीही अॅलर्जी असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच अरविंदजी हिरवे जॅकेट वक्फसाठी घातले का? असा खोचक सवाल अरविंद सावंत यांना केला. शिवसेना पक्षाच्या वतीने वक्फ विधेयकाला पाठिंबा देताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतो. हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. आधी कलम 370, नंतर तिहेरी तलाक आणि सीएए आणि आता गरिबांच्या कल्याणासाठी हे विधेयक या सभागृहात आणले गेले आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की, अरविंद सावंत यांनी आज हिरवे जॅकेट बुधवारसाठी घातले आहे की, वक्फसाठी घातले आहे. बाळासाहेब असते तर असे भाषण तुम्ही केले असते का? शिंदे म्हणाले की, अरविंद सावंत यांचे भाषण ऐकून मला खूप वाईट वाटले. यूबीटी शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या अंतरआत्म्याला विचारावे की जर आज बाळासाहेब असते तर असे भाषण तुम्ही केले असते का? आज हे स्पष्ट झाले आहे की, यूबीटी कोणाच्या विचारसरणीचे पालन करत आहे आणि या विधेयकाला विरोध करत आहे. तुमच्याकडे चुकांना सुधारण्याची सुवर्णसंधी होती. स्वत:ची विचारधारा जिवंत ठेवण्याचा, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन केले होते. पण यूबीटीने ती विचारधारा आगोदरच बुलडोझरखाली चिरडली आहे. बाळासाहेबांची विचारधारा स्पष्ट होती. हिंदुत्वाची रक्षा, देशाची एकता आणि अन्य धर्मियांसाठी सन्मान ही त्यांची विचारधारा होती. आज बाळासाहेब इथे असते आणि त्यांनी उबाठाचे भाषण वाचले असते तर त्यांच्या आत्म्याला त्रास झाला असता, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. ठाकरे गटाला फक्त हिंदुत्वाची अॅलर्जी उबाठाने वक्फ बोर्डात गैर मुस्लीम सदस्य नको, अशी मागणी केली आहे. त्याची त्यांनी इथे वकिली केली. बाळासाहेब फक्त हिंदुत्वासाठी लढले. मला वाटतंय ठाकरे गटाला फक्त हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. आज ठाकरे गट औरंगजेबाच्या विचारावर चालतोय. ते औरंगजेबाची वकिली करत आहेत. यांनी पालघरमधील साधू हत्याकांडावर कधी पत्र लिहिले नाही. आज औरंगजेबाचा मुद्दा निघाला तर यांची अस्वस्थता वाढली आहे, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. काँग्रेसने शहाबानो यांचा हक्क हिरावून घेतला वक्फच्या नावाखाली ज्या गरीब मुस्लिमांचा अधिकार हिसकावण्यात आला त्यांच्यासाठी हे विधेयक आधार आहे. विरोधकांनी त्यांचा कायम व्होटबँक म्हणून वापर केला. शहाबानो प्रकरणात कोर्टाने त्यांना न्याय दिला. पण, काँग्रेसने त्यांचा हक्क हिरावून घेतला. मुस्लीम समाजाच्या विकासासाठी सादर केलेल्या सच्चर आयोगाच्या शिफारशींवर आठ वर्ष काँग्रेस सरकारने अंमलबजावणी केली नाही. विरोधकांच्या राजवटीत वक्फच्या जमिनी लाटण्याचे काम ‘इंडी’ आघाडीचे सर्व घटकपक्ष या विधेयकाला विरोध करत आहेत. पण, याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी वक्फमधील घोटाळ्याची आपल्या कार्यकाळात करण्याची मागणी केली होती. वक्फच्या जमिनी लाटण्याचे काम विरोधकांच्या राजवटीमध्ये झाले, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवीगाळ करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत उबाठा गटात नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला. हे ही वाचा… वक्फ विधेयकातील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही:सरकारला उद्योजकांसाठी जमिनी हडपायच्या आहेत, अरविंद सावंत यांचा हल्लाबोल वक्फ विधेयकात वक्फ बोर्डाच्या समितीवर बिगर मुस्लीम व्यक्तींना घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या जर हिंदू देवस्थानच्या समितीवर गैर हिंदू व्यक्तीला घेतले तर काय? असा सवाल शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत बोलताना उपस्थित केला आहे. तसेच हिंदूंच्या मंदिरावर बिगर हिंदूंची नियुक्ती केल्यास त्याचा आम्ही विरोध करू. तसेच तुम्हाला केवळ जमीन हडपायची आहे, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment