जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आश्रयदेणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम सुरू:एनआयएसह इतर यंत्रणांनी सुरू केली संयुक्त कारवाई

जम्मू-काश्मीरमध्ये रहिवासी नसलेल्यांवर सातत्याने हल्ले करणारे दहशतवादी व त्यांच्या पाठराख्यांची आता खैर नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणारे, मदत करणाऱ्यांना कठाेर शिक्षेसाेबतच त्यांच्या मालमत्ताही गमवाव्या लागू शकतात. एनआयएने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी जम्मू-काश्मीर पाेलिस व इतर सुरक्षा दलाच्या सहकार्याने विशेष संयुक्त माेहीम सुरू केली आहे. त्यानुसार पाकिस्तानातून घुसखाेरी करून भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. त्याशिवाय राज्याचे रहिवासी नसलेल्या लाेकांना लक्ष्य केल्या जाणाऱ्या हल्ल्यांत सामील लाेकांवरही अशी कारवाई केली जाईल. सूत्र म्हणाले, एनआयएने या माेहिमेत याच वर्षी फेब्रुवारीत श्रीनगरच्या शाला कदर भागात दाेन जणांच्या हत्येप्रकरणी तुरुंगातील लष्करचा दहशतवादी आदिल मंजूर लंगूची श्रीनगरच्या जलदागर येथील मालमत्ता यूएपीए कायदा १९६७ च्या कलम २५ अंतर्गत जप्त केली. त्याशिवाय दहशतवाद्यांना आश्रय देणे व त्यांना पैशांची रसद पुरवल्याच्या आराेपाखाली ४ जणांची मालमत्ता जप्त केली गेली. जम्मू-काश्मीर पाेलिसांनी उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथील सुपनगामा येथील रहिवासी दहशतवादी अब्दुल मजील मल्ला व अब्दुल रशीद मीर, मंडिगाम हंदवाडाचा दहशतवादी अर्शद अहमद परे , पालपाेराचा दहशतवादी सज्जाद अहमद बटच्या मालमत्तेवर करण्यात आली. एनआयएने त्यांची १० काेटी रुपये किमतीची जमीन जप्त केली आहे. हे चारही जण दहशतवाद्यांचे हँडलर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या काही महिन्यांत पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment