अयोध्येत 30 तासांत सुमारे 25 लाख भक्तांचा महापूर:5 फेब्रुवारीपर्यंत शाळा-कॉलेज बंद

अयोध्येत भक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने श्रीराम लल्लाचे दर्शन कालावधीत वाढ करण्यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविक दर्शन घेत आहेत. गेल्या ३० तासांत सुमारे २५ लाख भक्त अयोध्येत आले असून दर्शनासाठी लांबच लांब ७ रांगा लागल्या आहेत. सोमवारी दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गर्दीमुळे ५ फेब्रुवारीपर्यंत अयोध्या धाम परिसरातील १२वी पर्यंत शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रयागराजला भाविकांची १५ किमी पायपीट इकडे, प्रयागराजमध्ये सोमवारी १.२५ कोटी भाविकांनी गंगेत स्नान केले. तथापि,यासाठी त्यांना १० ते १५ किमी पायपीट करावी लागली. व्हिआयपी लोकांची गर्दी झाल्याने संगमापर्यंत जाणारे सर्व ७ रस्ते प्रशासनाने बंद केले होते.
मौनी अमावास्येचे ‘अमृतस्नान’ पितरांना समर्पित, साधू-संत मौन व्रत धारण करतात या कुंभमेळ्यात २९ जानेवारीला मौनी अमावास्येचे ‘अमृतस्नान’ सर्वात विशेष असेल. मौनी अमावास्येसाठी आखाड्यांतही आपली वेगळी परंपरा आहे. यात सर्वात प्रथम धर्मध्वजाचे स्नान होईल. नंतर इष्टदेवाचा पंचामृत अभिषेक करून स्नान केले जाईल. यानंतर साधू-संत स्नान करतील. याशिवाय उदासनी आखाड्यातील श्री महंत धर्मेंद्र दास सांगतात की, मौनी अमावास्येला जे स्नान होते ते पितरांना समर्पित होते. या दिवशी मौन धारण करतात. १० कोटी भाविक येतील, १५० विशेष रेल्वेगाड्या कुंभमेळ्यातील मौनी अमावास्येला सर्वाधिक १० कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. अपर मेळा अधिकारी विवेक चतुर्वेदी म्हणाले, मौनी अमावास्येसाठी युद्धपातळीवर तयारी केली जात आहे. प्रयागराज रेल्वे मंडळ १५० हून जास्त विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. सर्व साधू-संतांच्या छावण्यांमध्ये याआधीच बुकिंग फुल झाली आहे. या दिवशी देशातूनच नव्हे तर विदेशी भक्तही येथे येण्याची आशा आहे. सर्वप्रथम धर्मध्वज, नंतर इष्टदेव, त्यानंतर साधू-संत स्नान करतील तपोनिधी पंचायती श्री आनंद आखाडा: मौनी अमावास्येच्या दिवशी सर्वप्रथम धर्मध्वज, नंतर पंचामृतातून इष्टदेव भगवान सूर्यनारायणाचा अभिषेक करून स्नान केले जाईल. यानंतर सर्व साधू-संत स्नान करतील. आखाड्याचे अध्यक्ष शंकरानंद सरस्वती आणि श्रीमहंत दिवाकरपुरी यांनी सांगितले की, स्नानानंतर धर्मध्वज पुन्हा मूळ ठिकाणी आणून बांधला जाईल. कंुभमेळ्याच्या समारोपावर ते संगमात प्रवाहित केले जातील. त्याआधी त्यांची पूजा होईल. निर्मोही आखाडा : आखाड्याचे श्रीमहंत रामजीदास म्हणाले, सर्वप्रथम इष्टदेव हनुमानास अमृतस्नान घातले जाईल. नंतर साधू-संत स्नान करतील. आमच्याकडे धर्मध्वजाला स्नान घालण्याची परंपरा आखाड्यांच्या स्थापनेपासून नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment