मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना दावणीला बांधली:मुख्यमंत्री शिंदेंचा जळगावमधून हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगाव येथील धरणगाव येथे जाहीर सभा झाली. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार विकास विरोधी होते आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली म्हणून अशा लोकांच्या विरोधात आम्ही उठाव केला, अशी टिका शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या निवडणुकीत जनतेने भाजप शिवसेना युतीला कौल दिला होता. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी सरकार तयार केले. ते अडीच वर्षाचे सरकार प्रत्येक कामांना स्थगिती देणारे विकास विरोधी सरकार होते. उठाव करण्याचा निर्णय हा स्वाभिमानासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी होतात केवळ फेसबुक वरून राज्य चालवता येत नाही, असा टोला देखील शिंदे उद्धव ठाकरे यांना लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी खटाटोप केला. आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणी समोर त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणी शेतकरी व युवक या निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात मतांचे गुलाब टाकतील तर महाविकास आघाडीला केवळ काटे मिळतील असे शिंदे म्हणाले. शिंदे सेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले गुलाबराव पाटील हे 24 तास काम करणाऱ्या नेते आहेत त्यामुळे त्यांना प्रचाराची गरज नाही ते आजच विजय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.