‘बासंबा’ मारहाणीचा मुद्दा विधानसभेत गाजला:आरोपींच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

‘बासंबा’ मारहाणीचा मुद्दा विधानसभेत गाजला:आरोपींच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारातील शिवरस्ता काढण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी ता. १७ उपस्थित केला आहे. या प्रकरणात आरोपींवर गंभीर गुन्हे असून त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यास पोलिस अधिक्षक हिंगोली यांना सूचना देण्याची मागणीही आमदार पडळकर यांनी केली आहे. याबाबत आमदार पडळकर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले की, बासंबा ये्थे ता. १० मार्च रोजी तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी नाईक, सय्यद व इतर दोन कर्मचारी शिवेवरील रस्ता काढून देण्यासाठी आले होते. यावेळी आजीन प्यारेवाले, बिलाल प्यारेवाले, अायूब प्यारेवाले, रमजान प्यारेवाले, सुबान चौधरी, मुश्‍ताक प्यारेवाले यांच्यासह इतर काही लोक तेथे आले. त्यांनी तलवारी, रॉड, काठ्याने मदन ढाले, प्रफुल्ल ढाले, वनीता ढाले, भारत ढाले यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेले सर्वजण नांदेड येथील संजीवनी हॉस्पीटल येथे उपचार घेत अाहेत. या घटनेमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमुद केले. या घटनेमध्ये पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळी इतर लोकप्रतिनिधी बोलल्यानंतर ३०७ चा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणालाही अटक केली नाही. मात्र ज्या लोकांना मारहाण झाली त्यांच्यावरच क्रांॅस तक्रार ३०७ चा गुन्हा दाखल झाला आहे. ढाले यांच्यावर झालेला चुकीचा गुन्हा तपासाअंती काढावा. तसेच गंभीर गुन्हे असलेल्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव देण्याच्या सूुचना पोलिस अधिक्षक हिंगोली यांना द्यावेत तसेच शिवरस्ता खुला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश देण्याची मागणी आमदार पडळकर यांनी यावेळी केली आहे. आरोपींच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके सदर घटना घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. त्यांच्या जवाबानंतर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आरोपींंना अटक करण्यासाठी हिंगोली ग्रामीण, बासंबा पोलिसांची स्वतंत्र पथके स्थापन केली असून स्थानिक गुन्हे शाखेची पथकेही रवाना करण्यात आली आहेत. मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी दिली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment