बातमी बदलाची:बंगळुरूचा सिटीझन सायन्स प्रोजेक्ट; विद्यार्थी-सामान्य लोक चॅटबॉटवर टाकतात पाणी तुंबल्याचे फोटो, डेंग्यूसारखे अनेक आजार रोखण्यास मदत

सामान्य नागरिक आणि स्थानिक प्रशासन एकत्र काम करतात तेव्हा कसे बदल घडतात, ही बातमी त्याचे उदाहरण आहे. वर्ष २०२४ मध्ये जगभरात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. भारतात डेंग्यूचे २.३३ लाख रुग्ण आढळले. २९७ जणांचा मृत्यू झाला. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी इको नेटवर्कने बंगळुरू सायन्स अँड टेक्नाॅलॉजी क्लस्टरसह ‘आय ॲम वन हेल्थ’ प्रकल्प सुरू केला. त्याअंतर्गत एक वर्ष चाललेल्या पथदर्शी टप्प्यात ९० शालेय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे लार्वा, डासांची उत्पत्ती स्थळे, त्यासाठी आवश्यक पावले आणि टूल्स यांची माहिती देण्यात आली. लोकांनी पाणी तुंबलेल्या ४०० ठिकाणांची (डेटा पॉइंट) छायाचित्रे काढून जीपीएस लोकेशनसह व्हॉट्सॲप चॅटबॉटवर शेअर केली. या डेटामुळे बेंगळुरूचा ‘व्हल्नेरिबिलिटी इंडेक्स’ तयार करण्यास मदत होईल आणि डेंग्यूपासून बचावाची तयारी करता येईल. या प्रकल्पाशिवाय सरकारी प्रयत्नांमुळेही या वर्षी (जानेवारी-जून) बंगळुरूत डेंग्यूच्या प्रकरणांत ४८% घट झाली आहे. जीपीएस लोकेशनसोबत पाणी तुंबल्याची छायाचित्रे केली अपलोड – रोमेश साहू यांना दिलेली माहिती

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment