बाजाराला झळाळी:गणेशोत्सवात अर्थचक्राला गती; संभाजीनगरात १० दिवसांत होणार ७०० कोटींची उलाढाल

दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात महाराष्ट्रात १० हजार कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज ऑल इंडिया कॉन्फिडरेशन आॅफ ट्रेडर्स (कॅग) संघटनेने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरात सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५० कोटींची उलाढाल झाली होती. यंदा तेलाच्या किमती ४० रुपयांनी कमी झाल्या, तर गणेशमूर्तींच्या विक्रीतील उलाढाल वाढली आहे. यंदा दीड लाख मूर्ती अधिक विकल्या गेल्या. कलाकुसर केलेल्या मूर्तीना मागणी होती. त्यांच्यामुळे मूर्तींच्या किमतीत वाढ झाली.
गणेशोत्सवात किराणा, फळे, सजावट साहित्य, विद्युत साहित्य, शिल्पकार, रंगारी, बँड, कपडा व्यापार आदींमध्ये प्रामुख्याने उलाढाल होते. यंदा चित्ताकर्षक मूर्तींच्या किमती जास्त होत्या. त्याचबरोबर मूर्ती खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. सजावटीच्या साहित्यात चीनमधून आयात केलेल्या वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली आहे. उत्सवाच्या काळात शिल्पकार आणि रंगारी यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
गणेशमूर्तींचे दर, विक्रीचे प्रमाण वाढले; राज्यात १० हजार कोटींची होईल उलाढाल फुलांची बाजारपेठ बहरली
शहरात फूल बाजारात फुलांच्या किमती दुप्पट ते तिप्पट वाढल्या आहेत. याशिवाय विड्याची पाने, दूर्वा यांचाही बाजार चांगलाच बहरला आहे. पाऊस उत्तम झाल्याने फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचसोबतच सण-उत्सव जोरदारपणे साजरे करण्याचा ट्रेंडही यंदा आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे.
दुप्पट वाढली वर्गणी गेल्या वर्षीपर्यंत ५०० रुपये वर्गणी दिली जात होती. यंदा बहुतांश मंडळांनी प्रत्येकी १ हजार ते दीड हजार रुपये वर्गणी घेतली आहे. यंदा भव्य गणेशमूर्ती, तसेच आकर्षक मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय गेल्यावर्षी डीजेसाठी ७ हजार भाडे होते. ते यंदा १४ ते २० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
कोरोनाचे सावट सरले कोरोना संसर्गाच्या काळात २०२०-२१ मध्ये उत्सव साजरा करण्याची संधीच नव्हती. मात्र, त्यानंतर २०२२, २०२३ मध्ये कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न अनेक जण करत होते. याशिवाय ज्यांनी जवळची व्यक्ती गमावली त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठीही वेळ गेला आहे. त्यामुळे कोरोनाकाळात उत्सवादरम्यान ४० ते ४५ कोटींची उलाढाल झाली होती. यंदाचा उत्सव सर्वांसाठीच विशेष आहे, त्यामुळे उलाढाल ७०० काेटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
राज्याच्या व्यापारात शहराचा वाटा ७ %
गणेशोत्सवात शहराची उलाढाल ७०० कोटी रुपयांची होणार आहे. हा वाटा राज्याच्या उलाढालीच्या तुलनेत ७ टक्के आहे. किराणा आणि सजावट यांचा या उलाढालीत मोठा वाटा आहे. – अजय शहा, उपाध्यक्ष, कॅट किराणा बाजारातील व्यवसाय यंदा स्थिर
दरवर्षी उलाढालीचा आकडा-वर खाली होतो, पण यंदा किराणा बाजारातील उलाढालीचा आकडा स्थिर आहे. तेलाच्या भावांपलीकडे इतर वस्तूंच्या भावात लक्षणीय तफावत नाही.
– संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

​दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात महाराष्ट्रात १० हजार कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज ऑल इंडिया कॉन्फिडरेशन आॅफ ट्रेडर्स (कॅग) संघटनेने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरात सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५० कोटींची उलाढाल झाली होती. यंदा तेलाच्या किमती ४० रुपयांनी कमी झाल्या, तर गणेशमूर्तींच्या विक्रीतील उलाढाल वाढली आहे. यंदा दीड लाख मूर्ती अधिक विकल्या गेल्या. कलाकुसर केलेल्या मूर्तीना मागणी होती. त्यांच्यामुळे मूर्तींच्या किमतीत वाढ झाली.
गणेशोत्सवात किराणा, फळे, सजावट साहित्य, विद्युत साहित्य, शिल्पकार, रंगारी, बँड, कपडा व्यापार आदींमध्ये प्रामुख्याने उलाढाल होते. यंदा चित्ताकर्षक मूर्तींच्या किमती जास्त होत्या. त्याचबरोबर मूर्ती खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. सजावटीच्या साहित्यात चीनमधून आयात केलेल्या वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली आहे. उत्सवाच्या काळात शिल्पकार आणि रंगारी यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
गणेशमूर्तींचे दर, विक्रीचे प्रमाण वाढले; राज्यात १० हजार कोटींची होईल उलाढाल फुलांची बाजारपेठ बहरली
शहरात फूल बाजारात फुलांच्या किमती दुप्पट ते तिप्पट वाढल्या आहेत. याशिवाय विड्याची पाने, दूर्वा यांचाही बाजार चांगलाच बहरला आहे. पाऊस उत्तम झाल्याने फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचसोबतच सण-उत्सव जोरदारपणे साजरे करण्याचा ट्रेंडही यंदा आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे.
दुप्पट वाढली वर्गणी गेल्या वर्षीपर्यंत ५०० रुपये वर्गणी दिली जात होती. यंदा बहुतांश मंडळांनी प्रत्येकी १ हजार ते दीड हजार रुपये वर्गणी घेतली आहे. यंदा भव्य गणेशमूर्ती, तसेच आकर्षक मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय गेल्यावर्षी डीजेसाठी ७ हजार भाडे होते. ते यंदा १४ ते २० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
कोरोनाचे सावट सरले कोरोना संसर्गाच्या काळात २०२०-२१ मध्ये उत्सव साजरा करण्याची संधीच नव्हती. मात्र, त्यानंतर २०२२, २०२३ मध्ये कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न अनेक जण करत होते. याशिवाय ज्यांनी जवळची व्यक्ती गमावली त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठीही वेळ गेला आहे. त्यामुळे कोरोनाकाळात उत्सवादरम्यान ४० ते ४५ कोटींची उलाढाल झाली होती. यंदाचा उत्सव सर्वांसाठीच विशेष आहे, त्यामुळे उलाढाल ७०० काेटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
राज्याच्या व्यापारात शहराचा वाटा ७ %
गणेशोत्सवात शहराची उलाढाल ७०० कोटी रुपयांची होणार आहे. हा वाटा राज्याच्या उलाढालीच्या तुलनेत ७ टक्के आहे. किराणा आणि सजावट यांचा या उलाढालीत मोठा वाटा आहे. – अजय शहा, उपाध्यक्ष, कॅट किराणा बाजारातील व्यवसाय यंदा स्थिर
दरवर्षी उलाढालीचा आकडा-वर खाली होतो, पण यंदा किराणा बाजारातील उलाढालीचा आकडा स्थिर आहे. तेलाच्या भावांपलीकडे इतर वस्तूंच्या भावात लक्षणीय तफावत नाही.
– संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment