तुमच्या बापाच्या पापामुळे माझे मताधिक्य घटले:महायुतीत असूनही राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार दिला, अदिती तटकरेंच्या टीकेला आमदार थोरवेंचे प्रत्युत्तर

तुमच्या बापाच्या पापामुळे माझे मताधिक्य घटले:महायुतीत असूनही राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार दिला, अदिती तटकरेंच्या टीकेला आमदार थोरवेंचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचा आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महेंद्र थोरवे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून प्रयत्न झाल्याचा आरोप स्वत: थोरवे यांनी केला होता. यावर सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांनी पलटवार केला आहे. ते काठावर वाचले आहेत, त्यांनी विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, असा टोला लगावला आहे. अदिती तटकरे यांनी टोला लगावल्यानंतर आता महेंद्र थोरवे यांनी देखील पुन्हा एकदा टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या बापाच्या पापा मुळेच माझे मताधिक्य घटल्याचा आरोप थोरवे यांनी केला आहे. थोरवे म्हणाले, मी जे काही निवडून आलेलो आहे ते काही काठावर निवडून आलेलो नाही. याउलट तुमचेच जे काही आमदार निवडून आलेले आहे, ते काठावर निवडून आलेले आहे. मी 5,700 मतांनी निवडून आलो आहे. पुढे महेंद्र थोरवे म्हणाले, महायुती असताना सुद्धा राष्ट्रवादीने जो काही अपक्ष उमेदवार दिला, अश्या छुप्या पद्धतीने मला पडण्याचा प्रयत्न या मतदारसंघातून केला गेला. माझ मताधिक्य जे घटलेले आहे, ते पालकमंत्र्यांना सांगा, हे तुमच्या बापाचंच पाप आहे. माझ मताधिक्य तुमच्या बापामुळे घटलेले आहे. मी काठावर निवडून आलेलो नाही. खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे एका नागरी सत्कारप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना थोरवे यांनी तटकरे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे महायुतीमधील या दोन आमदारांमध्ये चांगलेच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment