वातानुकूलित ई बससेवेला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद:37 आसनाची क्षमता, प्रत्यक्षात 45 पेक्षा जास्त प्रवाशांनी केला प्रवास

वातानुकूलित ई बससेवेला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद:37 आसनाची क्षमता, प्रत्यक्षात 45 पेक्षा जास्त प्रवाशांनी केला प्रवास

शनिवारी सकाळी 6.30 वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणसाठी पहिली ई बस सुटली. 37 आसनाची क्षमता असलेल्या बसध्ये प्रत्यक्षात 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. वातानुकूलित व आरामदायी नवीन बससेवा सुरू झाल्याचा आनंद प्रवासी आणि एसटीच्या अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. प्रवासी संख्येत वाढही झालेली आहे. त्या तुलनेत बसची संख्या तोकडी पडत आहे. याबाबतचा अहवाल छत्रपती संभाजीनगर एसटी प्रशासनाने वरिष्ठांना पाठवला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७८ नवीन बसची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पहिल्यांदा 5, 13 सप्टेंबर रोजी 24 अशा एकूण 29 बस मिळाल्या आहेत. 4 ई बसेस पैठण मार्गावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी पहिली ई बस सकाळी 6.30 वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात आली. तत्पूर्वी बसला पुष्पहार घालून सजवण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक नियंत्रक पंडित चव्हाण, यंत्र अभियंता प्रशांत पदमने, आगार व्यवस्थापक संतोष घाणे, स्थानक प्रमुख संतोष नजन आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवासी संख्येनुसार बसेस वाढवण्याची गरज वातानुकूलित ई बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाढत्या प्रवासी संख्येनुसार आणखी पैठण मार्गावर नवीन बसेस वाढवण्याची गरज असल्याचेही नमुद केले.

​शनिवारी सकाळी 6.30 वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणसाठी पहिली ई बस सुटली. 37 आसनाची क्षमता असलेल्या बसध्ये प्रत्यक्षात 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. वातानुकूलित व आरामदायी नवीन बससेवा सुरू झाल्याचा आनंद प्रवासी आणि एसटीच्या अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. प्रवासी संख्येत वाढही झालेली आहे. त्या तुलनेत बसची संख्या तोकडी पडत आहे. याबाबतचा अहवाल छत्रपती संभाजीनगर एसटी प्रशासनाने वरिष्ठांना पाठवला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७८ नवीन बसची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पहिल्यांदा 5, 13 सप्टेंबर रोजी 24 अशा एकूण 29 बस मिळाल्या आहेत. 4 ई बसेस पैठण मार्गावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी पहिली ई बस सकाळी 6.30 वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात आली. तत्पूर्वी बसला पुष्पहार घालून सजवण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक नियंत्रक पंडित चव्हाण, यंत्र अभियंता प्रशांत पदमने, आगार व्यवस्थापक संतोष घाणे, स्थानक प्रमुख संतोष नजन आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवासी संख्येनुसार बसेस वाढवण्याची गरज वातानुकूलित ई बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाढत्या प्रवासी संख्येनुसार आणखी पैठण मार्गावर नवीन बसेस वाढवण्याची गरज असल्याचेही नमुद केले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment