भाच्याने आत्याला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले:कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांनी केली महिलेची सूटका

भाच्याने आत्याला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले:कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांनी केली महिलेची सूटका

कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी साखळदंडातून सदरील महिलेची सुटका केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी परिसरामध्ये एका महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आहे. सारिका साळी असे या चाळीस वर्षीय महिलेचे नाव असून पोलिसांनी या महिलेची सुटका केली आहे. संबंधित महिला ही वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कुलूप फोडणाऱ्या व्यक्तीला बोलावून या महिलेची सूटका केली. सदरील महिला ही तिच्या भाच्याजवळ राहते. यात तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजेच भावजय आणि भाचा हे सर्व एकत्र राहतात. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या महिलेला साखळदंडात बांधून ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित महिलेला साखळदंडात बांधणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी यात सदरील महिलेला बांधून ठेवणाऱ्या भाच्याच्या देखील कानशिलात लगावली आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत जालना जिल्ह्यातील घटना (फेब्रुवारी 2025) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आलापूर गावात, एका महिलेला तिच्या कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून दोन महिन्यांपर्यंत पायात साखळदंड बांधून घरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिची आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाची सुटका केली. या घटनेत संबंधित महिलेला तिच्या पायात साखळदंड बांधून ठेवण्यात आले होते, आणि पोलिसांनी बनावट किल्ल्या तयार करून तिला मुक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटना (जुलै 2024) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका 50 वर्षीय महिलेला झाडाला लोखंडी साखळीने बांधून ठेवलेले आढळले होते. तिच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रे सापडली होती. पोलिसांनी तिची सुटका केली आणि तपास सुरू केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment