भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची पायाभरणी:258 नव्या मंडळांची स्थापना, 963 कार्यरत मंडळांतून पक्ष शक्ती भक्कम

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची पायाभरणी:258 नव्या मंडळांची स्थापना, 963 कार्यरत मंडळांतून पक्ष शक्ती भक्कम

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे .राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत. प्रमुख विभाग
• कोकण-ठाणे विभागात १८४ मंडळ
• उत्तर महाराष्ट्रात १८४ मंडळ
• पश्चिम महाराष्ट्रात २२२ मंडळ
• विदर्भात ३१३ मंडळ
• मराठवाड्यात २०७ मंडळ
• मुंबई विभागात १११ मंडळ मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याची आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment