भंडाऱ्यात 51 फूट उंचीची प्रभू श्रीरामाची मूर्ती:तलावाच्या मधोमध असलेल्या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प

भंडाऱ्यात 51 फूट उंचीची प्रभू श्रीरामाची मूर्ती:तलावाच्या मधोमध असलेल्या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प

ऐतिहासिक खांब तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच, त्याचे धार्मिक महत्त्व जपण्याचा संकल्प सोडलेल्या आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नातून खांब तलावाचे नवे रूप भंडारेकरांच्या पुढे येणार आहे. तलावाच्या मधोमध एक रॅम्प उभारून त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेली मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची ५१ फूट उंच मूर्ती आकर्षणाचे केंद्र आहे. ही मूर्ती तलावाच्या मधोमध आहे, हे विशेष. यावेळी पंचक्रोशीतील संत महंत, मठ, मंदिर आणि विविध तीर्थस्थळातील विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थिती होती. वेद मंत्रोच्चारात अनावरण करण्यात आले. यामुळे भंडारा शहराला एक वेगळी ओळख मिळेल. या अनावरण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध भजन गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजन संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे येथील कला संस्कार आर्ट स्टुडिओतर्फे शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी अवघ्या सहा महिन्याच्या अथक परिश्रमाने ही मूर्ती घडविली आहे. खांब तलावात मधोमध ही मूर्ती ठेवण्यात येणार असून तलावातील गाळ काढल्यामुळे तलाव ऑलरेडी खोल आहे. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प तयार करण्यात आला असून या रॅम्पला रामझुला असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तलावाच्या मधोमध दगडासारख्या दिसणाऱ्या चट्टानावर ही मूर्ती विराजमान होणार आहे मूर्तीची वैशिष्ट्ये श्रीरामाची मूर्ती 51 फुट उंचीची आहे. मूर्ती जेएफआरसी व फाईबर तसेच विशिष्ट केमिकलने तयार केली आहे. कालावधी : सहा महिने मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प आहे.

​ऐतिहासिक खांब तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच, त्याचे धार्मिक महत्त्व जपण्याचा संकल्प सोडलेल्या आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नातून खांब तलावाचे नवे रूप भंडारेकरांच्या पुढे येणार आहे. तलावाच्या मधोमध एक रॅम्प उभारून त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेली मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची ५१ फूट उंच मूर्ती आकर्षणाचे केंद्र आहे. ही मूर्ती तलावाच्या मधोमध आहे, हे विशेष. यावेळी पंचक्रोशीतील संत महंत, मठ, मंदिर आणि विविध तीर्थस्थळातील विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थिती होती. वेद मंत्रोच्चारात अनावरण करण्यात आले. यामुळे भंडारा शहराला एक वेगळी ओळख मिळेल. या अनावरण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध भजन गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजन संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे येथील कला संस्कार आर्ट स्टुडिओतर्फे शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी अवघ्या सहा महिन्याच्या अथक परिश्रमाने ही मूर्ती घडविली आहे. खांब तलावात मधोमध ही मूर्ती ठेवण्यात येणार असून तलावातील गाळ काढल्यामुळे तलाव ऑलरेडी खोल आहे. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प तयार करण्यात आला असून या रॅम्पला रामझुला असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तलावाच्या मधोमध दगडासारख्या दिसणाऱ्या चट्टानावर ही मूर्ती विराजमान होणार आहे मूर्तीची वैशिष्ट्ये श्रीरामाची मूर्ती 51 फुट उंचीची आहे. मूर्ती जेएफआरसी व फाईबर तसेच विशिष्ट केमिकलने तयार केली आहे. कालावधी : सहा महिने मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 30 फुटाचा रॅम्प आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment