भावना गवळी विधानसभेच्या मैदानात?:रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची केली इच्छा व्यक्त

राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निबवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुती सरकार तसेच इतरही अनेक पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. याच सोबत तिसऱ्या आघाडीचा प्रयोगही होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघातून आमदार भावना गवळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिसोडची जागा शिवसेना शिंदे गटाकडे आली आणि पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू, असे म्हणत रिसोडच्या जागेवर भावना गवळी यांनी दावा केला आहे. भावना गवळी म्हणाल्या, पक्षाने आणि महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी काम कारणार असल्याचे त्यांनी म्हणले आहे. जागेवरून वाद होण्याची शक्यता वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लखन मलिक हे तीन वेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा असल्याचे स्पष्ट आहे. तसेच रिसोड मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट दावा करत असल्याने महायुतीमध्ये या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. असा आहे रिसोडचा राजकीय इतिहास 2009 मध्ये कॉंग्रेसचे नेते तसेच माजी महिला व बालकल्याण मंत्री सुभाष झनक आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या विजयराव जाधव यांचा पराभव केला होता. 2013 मध्ये सुभाष झनक यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह विधानसभा पोटनिवडणूक लागली त्यात सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमित झनकच निवडून आले. दरम्यान, महायुतीयामध्ये अंतर्गत वाद आता स्पष्ट दिसत आहेत. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे थेट मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मोठी फूट पडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकीत काय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल. त्यामुळे सर्वांचेच या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

​राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निबवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुती सरकार तसेच इतरही अनेक पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. याच सोबत तिसऱ्या आघाडीचा प्रयोगही होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघातून आमदार भावना गवळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिसोडची जागा शिवसेना शिंदे गटाकडे आली आणि पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू, असे म्हणत रिसोडच्या जागेवर भावना गवळी यांनी दावा केला आहे. भावना गवळी म्हणाल्या, पक्षाने आणि महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी काम कारणार असल्याचे त्यांनी म्हणले आहे. जागेवरून वाद होण्याची शक्यता वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लखन मलिक हे तीन वेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा असल्याचे स्पष्ट आहे. तसेच रिसोड मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट दावा करत असल्याने महायुतीमध्ये या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. असा आहे रिसोडचा राजकीय इतिहास 2009 मध्ये कॉंग्रेसचे नेते तसेच माजी महिला व बालकल्याण मंत्री सुभाष झनक आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या विजयराव जाधव यांचा पराभव केला होता. 2013 मध्ये सुभाष झनक यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह विधानसभा पोटनिवडणूक लागली त्यात सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमित झनकच निवडून आले. दरम्यान, महायुतीयामध्ये अंतर्गत वाद आता स्पष्ट दिसत आहेत. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे थेट मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मोठी फूट पडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकीत काय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल. त्यामुळे सर्वांचेच या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.  

Share