बिहार येथील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी:सोहम डफळेची निवड

बिहार येथील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी:सोहम डफळेची निवड

विदर्भ अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून सबज्युनियर विदर्भ कबड्डी संघ बिहारसाठी निवडला. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील नववीचा विद्यार्थी सोहम डफळेची गया येथील ३४ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर नॅशनल कबड्डी स्पर्धेसाठी निवड केली. राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी स्पर्धेसाठी २४ मुला मुलींची निवड केली. यासाठी २२० खेळाडूंची निवड चाचणी घेतली. त्यामधून निवड समितीतर्फे सोहम डफळे याची पहिल्या बारा खेळाडूंत निवड केली. गया येथे राष्ट्रीय स्पर्धेत सोहम विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सोहमच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, उपमुख्याध्यापक पप्पू वानखडे, दिलीप नेरकर, किशोर गावंडे. बबलू वानखडे ,सुभाष उमाळे, अजय आगरकर, आप्पा गेडाम, क्रीडा शिक्षक विजय तारापुरे, अनिल जावळे, , हरीश हरणे, क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले यांनी सोहमचे अभिनंदन केले. यशाचे श्रेय तो हनुमान क्रीडा मंडळ मोर्शी,साई स्पोर्ट क्लब विदर्भ,गुरुवर्य व आई वडिलांना देत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment