भाजप 2034 मध्ये देशात नवे संविधान आणणार:नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु, हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक दावा

भाजप 2034 मध्ये देशात नवे संविधान आणणार:नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु, हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक दावा

भाजप 2034 मध्ये देशात नवे संविधान आणणार, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरु असल्याचेही सपकाळ म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विविध मुद्द्यांवरून चौफेर टीका केली. मोदींना व्यक्तिशः, पक्ष संदर्भात आणि विचारधाराशी संबंधी भारताचे संविधान मान्य नाही. भाजपला जर संविधान बदलवायचे आहे तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गेल्या 11 वर्षात पंतप्रधान राहूनही मोदींनी सांगण्यासारखे काहीच केले नसल्याने काल त्यांनी आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला. भ्रम पसरवणे, काँग्रेसला बदनाम करणे एवढेच मोदींनी सुरु केले आहे. पंतप्रधानांचे असे वर्तन हे अशोभनीय आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थेट सन्मानाचे कायदा मंत्रीपद दिले होते हे मोदींनी विसरु नये, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपच्या लोकांनी बाबासाहेबांना नेहमीच असन्मानित केले नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेबांना दर्शन घेऊ दिले नाही हे दुर्दैव आहे. दलित ओबीसी आणि काँग्रेसमध्ये मोदी दरी निर्माण करु बघत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. समाजातील वेगवेगळ्या घटकांना मोदी फॅसिस्ट करत आहेत. आरएसएस जनसंघ व आजच्या भाजपच्या लोकांनी बाबासाहेबांना नेहमीच असन्मानित केले, असा आरोप सपकाळ यांनी केला. भाजप आणि संघाला बाबासाहेब विद्वान आहेत, हे मान्य नाही मनुस्मृतीद्वारे संविधान लिहिले जावे व मनुस्मृतीद्वारे संविधान चालावे असे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेले ‘बंच ऑफ थॉट’ हे भाजपचे ‘बायबल’ आहे, असा टोला सपकाळ यांनी भाजपला लगावला. भाजपला आणि संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान आहेत हे मान्यच नाही. भाजपला जर इतके वाटत असेल, तर त्यांनी गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या ‘बंच ऑफ थॉट’ची होळी करावी, असे आव्हान सपकाळ यांनी भाजपला दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कधीही काँग्रेसमुळे माझा पराभव झाला असे म्हटले नाही. उलट त्यांनी त्यांच्या पराभवाच्या कारण डांगे व विनायक दामोदर सावरकर यांच्यावर फोडला, असे सपकाळ यांनी सांगितले. 2034 मध्ये संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरू मोदींना व्यक्तिशः, पक्ष संदर्भात आणि विचारधाराशी संबंधी भारताचे संविधान मान्य नाही. संविधान लिहिताना ते मनुस्मृती संबंधित लिहिल्या गेले पाहिजे, असे संघाने आणि जनसंघाने सांगितले होते याचे पुरावे उपलब्ध आहेत. ते समतेच्या विरोधात होते. सध्या देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया संघ आणि भाजपच्या बगलबच्च्यांनी सुरु केली आहे. 2034 साली आम्ही नवीन संविधान लागू करू, यासाठी त्यांच्या बैठकाही सुरू असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. 2024 च्या निवडणुकीत आपकी बार 400 पार हे जे सुरु होते, तर भाजपचेच उमेदवार सांगत होते की आम्हाला संविधान बदलायचा आहे आणि अजूनही ते त्यावर ठाम आहेत. भाजपला जर संविधान बदलवायचे आहे तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी “मुह मे राम बगल मे छुरी..” असे करु नये, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. अमित शहा, देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल औरंगजेब ज्याप्रमाणे धर्माचा वापर सरकार चालवण्यासाठी करत होता त्याचप्रमाणे आजच फडणवीस सरकार हे औरंगजेबच्या क्रूरते प्रमाणेच काम करत आहे. संविधानापेक्षा इंग्रज परवडले, आम्हाला स्वातंत्र्य नको अशी भूमिका घेणारे महाराष्ट्रात त्याकाळी काही लोक होते, याच व्यक्तींनी इंग्रजांना मदत केली. त्यांची पेन्शन घेतली, माफीनामाही लिहून दिला. अशा प्रवृत्तींचे पुतळे हे काढून टाकणार का? असा सवाल ज्यावेळेस मी केला त्यावेळेस त्यांनी औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून माघार घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व नाकारणारे व इतिहास समोर येऊ नये यासाठी “फुले” चित्रपट रिलीज कसा होऊ देणार? असा सवालही सपकाळ यांनी केला. जर अमित शाह औरंगजेबच्या कबरीला समाधी म्हणत असतील तर गोळवलकर गुरुजींच्या व हेडगेवार गुरुजींच्या स्मृतीस्थळाला कबर म्हणायचे का..? हा माझा अमित शाहा यांना प्रश्न असल्याचे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी घणाघाती टीका केली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment