भाजपचे मिशन मुंबई महापालिका:मुंबई अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला मिळणार संधी, दोन नेत्यांचे नाव चर्चेत

भाजपचे मिशन मुंबई महापालिका:मुंबई अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला मिळणार संधी, दोन नेत्यांचे नाव चर्चेत

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीची सर्व पक्षांकडून तयारी केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेवर विशेष लक्ष भाजप तसेच शिवसेनेकडून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने भाजपने नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील सर्व आमदारांची वरिष्ठ पदाधिकऱ्यांसह बैठक सुरू असून सर्व जिल्हाध्यक्ष या बैठकीला हजेरी लावत आहेत. सध्या मुंबईच्या अध्यक्षपदावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आहेत. मात्र, आता मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता मुंबईच्या अध्यक्षपदावर आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार केला जात आहे. यात आमदार प्रवीण दरेकर तसेच अमित साटम यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात प्रवीण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची देखील चर्चा रंगली आहे. प्रवीण दरेकर हे भाजपचे आमदार तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. प्रवीण दरेकर हे भाजपचे राज्य सचिव आणि भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत. सर्वप्रथम 2009 मध्ये मुंबईच्या मागाठाणे मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर प्रवीण दरेकर निवडून आले होते. 2015 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमित साटम हे भाजप आमदार असून त्यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अमित साटम यांनी कॉंग्रेसचे अशोक भाऊ यांचा 19599 मतांनी पराभव केला होता. तसेच गेल्या 10 वर्षांपासून अमित साटम हे येथील मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे प्रवीण दरेकर व अमित साटम यांच्या नावात मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. भाजपने विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात संघटन पर्व अभियान राबवत 1.5 कोटी सदस्य नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचे हे अभियान महत्वाचे पाऊल ठरणार आहे. तर, संघटनात्मक पातळीवर सध्या भाजपकडून मंडल अध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या निवडी होत आहे. त्यामुळे, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपकडून संघटनात्मक बांधणी केली जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment