भाजपने सरकारी पैसे खर्च करून सत्ता मिळवली:वैजापूर येथे काँग्रेस आढावा बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळेंनी केला आरोप

विधानसभा निवडणुकीत भाजपने सरकारी पैशातून मते विकत घेऊन (लाडकी बहीण) सत्ता स्थापन केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे यांनी केला. वैजापूर येथे तालुका व शहर काँग्रेस समितीची आढावा बैठक पक्षनिरीक्षक माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्या बैठकीत जिल्हाध्यक्ष काळे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. याप्रसंगी मंचावर जिल्हा प्रभारी मुजाहेद खान, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, माजी जि.प. सभापती अॅड. प्रमोद जगताप, ॲड. आर.डी. थोट, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. राहुल संत, चेअरमन मधुकर साळुंके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. काळे यांनी काँग्रेस पक्षात लोकशाही जिवंत असल्याचे सांगितले. येणारा काळ पक्षासाठी व संघटनेत काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उज्ज्वल राहणार आहे. त्यामुळे पक्षसंघटना बळकट करून सर्व जाती-धर्मातील घटकांना सोबत घेऊन शेतकरी, महागाई, बेरोजगारी या प्रश्नांवर तीव्र आंदोलन छेडून जनसामान्यांना दिलासा देण्याचे काम पक्षसंघटनेच्या माध्यमातून केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बैठकीला युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पवार, शहराध्यक्ष शाक्यसिंह त्रिभुवन, सागर थोटा, बाबासाहेब गायकवाड, सुनील बोडके, सलीम तांबोळी, सफल त्रिभुवन, प्रवीण खांडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन सुशीलकुमार यांनी केले तर आभार दिगंबर वाघचौरे यांनी मानले. खा. काळे म्हणाले, भाजपने त्यांच्या राजवटीत सामाजिक व धार्मिक वाद पेटवण्यापलीकडे काहीच कामे न केल्यामुळे राज्यात शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या,जीवनावश्यक वस्चीूं महागाई अशा स्थितीमुळे सर्वसामान्य लोकांची परवड झाल्याची परिस्थिती देशात, राज्यात निर्माण झाली असल्याचे खा. कल्याण काळे यांनी बोलताना स्पष्ट केले. गंगापूर |आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी बनली तर ठिक नाहीतर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा पक्ष संपूर्ण ताकदीने पाठीशी उभा राहील असे आवाहन पक्षनिरीक्षक मा. खासदार तुकाराम रेगे पाटील यांनी गंगापूर येथे पक्षीय आढावा बैठकीत केले. गंगापूर काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, खालेद पठाण, मोहित जाधव यांची उपस्थिती होती. भाजपने दहा वर्षांत काहीच केले नाही