दोन जिगरी मित्रांमध्ये नेमके काय घडले?:चंद्रपूरात एकाचा मृत्यू तर दूसरा बेशुद्ध अवस्थेत, प्रकरणाचे गूढ कायम; तपास सुरू

दोन जिगरी मित्रांमध्ये नेमके काय घडले?:चंद्रपूरात एकाचा मृत्यू तर दूसरा बेशुद्ध अवस्थेत, प्रकरणाचे गूढ कायम; तपास सुरू

चंद्रपूर येथे दोन जिगरी मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दूसरा त्याच ठिकाणी बेशुध्द अवस्थेत आढळून आला आहे. हा अपघात आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट कळू शकले नाही. ही हत्याच असून प्रेमप्रकरणातून झाली असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलिस तपास करत आहेत. नेमके प्रकरण काय? चंद्रपूर येथील औद्यागिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर येथे 10 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. प्रज्वल गोवर्धन नवले (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा जिगरी मित्र नागेश लांडगे हा घटनास्थळीच बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. प्रज्वल हा माणिकगड मार्गांवरीलएका गॅरेजमध्ये काम करत होता. तर त्याचे वडील गोवर्धन चिमूर येथे आणि आई शीतल नवले गृहणी असून ती गडचांदूर येथे राहतात. दोघे विभक्त असून प्रज्वल आईकडे राहत होता. बुधवारी त्याचा मित्र नागेश लांडगे हा प्रज्वलला भेटायला घरी गेला होता. नागेश प्रज्वलला भेटायला गेला तेव्हा प्रज्वलच्या आईला शंका आली होती. प्रज्वलच्या आईने नागेशचा मोबाईल ताब्यात घेतला. आईने मोबाईल तपासला तर आपले बिंग फुटेल अशी भीती नगेशच्या मनात आली. त्यानुसार प्रज्वलने विनंती करून आईकडून नागेशचा मोबाईल मागितला. यावेळी आईने प्रज्वलचा देखील मोबाईल मागितला. परंतु नागेशचा मोबाईल परत करण्याच्या अटीवर प्रज्वलने स्वतःचा मोबाईल आईला दिला. दुसऱ्या दिवशी प्रज्वलचा मृतदेह आढळला प्रज्वलच्या आईने नागेशचा मोबाईल परत केला. मोबाईल मिळाल्यानंतर नागेश आणि प्रज्वल दोघेही सायकलवर घराबाहेर गेले. त्यानंतर नेमके काय घडले हे अद्यापही गूढ आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी प्रज्वलचा मृतदेह आढळून आला, तर नागेश तिथेच बेशुध्द अवस्थेत आढळून आला असल्याची बातमी कुटुंबीयांना मिळाली. कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. प्रज्वलची हत्या नेमकी कशामुळे झाली, हा अपघात होता की घातपात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment