ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील 55 गावे टंचाईमुक्त:उन्हाळ्यात परिसरातील 14 हजार हेक्टर शेती ओलिताखाली

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील 55 गावे टंचाईमुक्त:उन्हाळ्यात परिसरातील 14 हजार हेक्टर शेती ओलिताखाली

पैठण ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला सध्या पाणी सुरू असल्याने पैठण तालुक्यातील कायम टंचाईग्रस्त ववा, वडाळासह ५५ गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. १४ हजार हेक्टरहून अधिक शेती ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेसाठी आणखी निधी मिळावा अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी अधिवेशनात केली आहे. ही योजना २००९ मध्ये तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी मंजूर केली होती. मात्र, अनेक वर्षे काम रखडले. तत्कालीन आमदार आणि सध्याचे खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकल्पाला ८९०.६४ कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी अधिवेशनात केली आहे. २००९ मध्ये या योजनेची किंमत २२२ कोटी होती. पहिल्या टप्प्यातील काम ९ वर्षे सुरू होते. २०१९ पर्यंत ही योजना ७५० कोटींवर गेली. पैठण ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे पैठण तालुक्यातील ६५ गावांतील २० हजार २६५ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता २००९ मध्ये मिळाली होती. आता जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१८-१९ च्या दरसूचीवर आधारित चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेला निधी मिळाल्यास आणखी गावांना फायदा होणार आहे. या योजनेत १५०० मिमी उद्धरण नलिका बसवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५५ गावांना फायदा झाला. उपसासिंचन च्या कालव्यात पाणी आले. योजना मंजुरीच्या १० वर्षांत निधी तिप्पट आता दुसऱ्या टप्प्यात आणखी १० गावांचा समावेश करण्यात आला आहे. योजना मंजुरीच्या १० वर्षांत निधी तिप्पट झाला. २००९ मध्ये २२२ कोटी असलेली योजना ७५० कोटींवर गेली. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आता ८९०.६४ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, हा निधी कधी मिळणार, यावर इतर कामे अवलंबून आहेत. महत्त्वाची योजना, उर्वरित कामेही करू पैठण तालुक्यातील ही महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आणखी गावांचा समावेश करून शेतीला लाभ मिळावा, अशी मागणी अधिवेशनात केली आहे. खेर्डा प्रकल्पामुळे अनेक गावांचा कायापालट झाला. उर्वरित कामेही पूर्ण करू. -विलास भुमरे, आमदार

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment