मंत्रिमंडळ विस्तार- घडामोडींना वेग:देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट; म्हणाले, आमचा फॉर्म्युला ठरला
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी माहिती देखील दिली आहे. या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत आहेत. तर एकनाथ शिंदे अजूनही मुंबईतच आहेत. त्यामुळे या सर्व घडमोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळा विस्ताराच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.