मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय:पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत; रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी देखील उचलणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पीडित कुटुंबातील व्यक्तींची रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी देखील राज्य सरकारच्या वतीने उचलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पीडित जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या बरोबरच पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात पीडित कुटुंबांना आता 50 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. अतिरेक्यांनी पर्यटकांना प्रथम त्यांचा धर्म विचारला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्यूमुखी पडलेत. यात डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 व पनवेल येथील एकाचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जम्मू काश्मीरच्या पलगमामध्ये मंगळवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटक झाले. यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. लष्कराच्या वेशात आलेल्या या अतिरेक्यांनी पर्यटकांना प्रथम त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर ओळखपत्र पाहून त्यांना गोळ्या घातल्या. मृतांत 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या सहा पर्यटकांचा झाला मृत्यू या अतिरेकी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे व संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू-काश्मीरच्या पर्यटनासाठी गेले होते. या हल्ल्यात पनवेल येथील खांदा कॉलनी येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात डोंबिवली (पूर्व-पश्चिम) येथील नवपाडा, पांडूरंग वाडी व नांदिवाली भागातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी, संजय लेले व अतुल मोने अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेले होते.