कंबोडियातील ठकांना सिम, मुंबईतून रिचार्ज:विदेशी नंबर ब्लॉक झाल्यावर फ्रॉडमध्ये भारताच्या क्रमांकाचा वापर सुरू…

क्रमांकामुळे होणाऱ्या सायबर फसवणुकीमुळे लोक अलर्ट झाले आहेत. त्यामुळे ठकांनी नवा उपाय शोधला आहे. आता भारतातील सिम घेऊन त्याद्वारे ऑनलाइन फ्रॉड केला जात आहे. ठकांचे एक नेटवर्क पोलिसांनी डिकोड केले आहे. यात कंबोडियाची लिंक मिळाली आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात सिम कार्ड पोहोचल्याचे उघड झाले आहे. देशभरातून इतरांच्या आयडीने बनावट सिमकार्ड उचलून फसवणुकीचा खेळ खेळला जात आहे. याचा खुलासा जोधपूर आयुक्तालयाने एका ठाण्यात दाखल ६० लाख ८० हजार रु. फसवणूक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान केला आहे. एडीसीपी निशांत भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील टीम फसवणुकीत वापरलेल्या मोबाइल नंबरचे लोकेशन तपासत असताना मुंबईपर्यंत पोहोचली तेव्हा ज्या क्रमांकाने ठकांनी डॉक्टरला आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावावर कॉल करून फसवले होते, तो कॉल कंबोडियातून केला होता. पोलिस आता या प्रकरणाची माहिती जमा करून पुढील तपास करत आहेत. देशातील एका फर्माने १ महिन्यात २५ कोटींचे रिचार्ज केले. पोलिसांनी रिचार्ज करणाऱ्या कंपनीला नोटीस दिली आहे. अशी केली फसवणूक : प्रथम ग्रुप जॉइन करून घेतला डाॅ. तेजपाल फिडोदांना फेक स्टॉकत ट्रेडिंग SCIATOP नावाचे ॲप जॉइन करण्यासाठी लिंक मिळाली. डॉक्टरने लिंकवर जाऊन ग्रुप जॉइन केला. त्यात ग्रुप ॲडमिनसह पाच क्रमांकाने चॅट केली. त्यंानी स्टँडो चार्टर्ड वेल्थच्या नावाने ग्रुप बनवला होता.डॉक्टरना कंपनीचे इन्स्टिट्यूटशन अकाउंट जमा करण्यास, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर ४ महिन्यांत ५ ते ७ पट नफ्याचे आमिष दाखवले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment