रूपाली चाकणकर यांचा तोल सुटला:कारण त्यांनी प्रशासनात कधी कामच केलेले नाही, हगवणे प्रकरणावरुन रूपाली ठोंबरेंचा घरचा आहेर
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रूपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी काही सामाजिक संघटनांनी रूपाली चाकणकरांना अडवून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत जाब विचारला होता. त्यानंतर, रूपाली चाकणकर यांनीही आता अति होतंय, असे म्हणत त्यांना फटाकरले. यानंतर...