काळेपडळ पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित:हुक्का पार्लरकडून ९० हजारांचा हप्ता घेतल्याप्रकरणी शरद नवले यांच्यावर कारवाई
अवैध धंद्याला पाठबळ देऊन त्यांच्याकडून हप्ता घेणाऱ्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. शरद निवृत्ती नवले असे या निलंबित श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. महंमदवाडी येथील बीबीसी रूफटॉप किचन अँड बार येथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. येथे १६ टेबलांवर ५७ तरुणतरुणी हुक्का पित असल्याचे आढळून...