Category: marathi

राहुल गांधींचा आरक्षणावरील खरा चेहरा उघड:त्यांच्या मनातील गोष्ट तोंडात आली, फडणवीस यांचा आरक्षण संपवण्याच्या मुद्यावर घणाघात

राहुल गांधींचा आरक्षणावरील खरा चेहरा उघड:त्यांच्या मनातील गोष्ट तोंडात आली, फडणवीस यांचा आरक्षण संपवण्याच्या मुद्यावर घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याविषयी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांच्या मनातील गोष्ट आता तोंडात आली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर हीच त्यांची खरी भूमिका असून, त्यांचा हाच खरा चेहरा आहे, असे ते म्हणालेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे एका मुलाखतीत बोलताना राहुल यांनी कळीच्या आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही. तुम्ही आर्थिक आकडे पाहता तेव्हा आदिवासींना 100 रुपयांतून केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 100 रुपयांतून केवळ 5 रुपये मिळतात. ओबीसींनाही जवळपास एवढाच वाटा मिळतो. भारतातील बिझनेस लिडर्सची यादी पाहिली तर टॉप 200 मध्ये केवळ 1 ओबीसी आहे. वस्तुतः त्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांवर आहे. पण आम्ही या आजारावर कोणताही उपचार करत नाही, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचा खरा चेहरा आता समोर येत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केव्हाच संसदेपर्यंत पोहोचू दिले नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यांनी मुद्दाम भंडाऱ्यात विरोधात उमेदवार देऊन हरवले. त्यांनी मुंबईतही त्यांच्याशी तसाच व्यवहार केला. त्यांनी वारंवार त्यांचा अवमान केला. हे लोक भारताच्या संविधानाला केव्हाही ज्या नजरेने पाहण्याची गरज असते त्या नजरेने पाहत नाहीत. केवळ राजकीय टूल म्हणून त्यांनी संविधानाचा वापर केला. आता त्यांच्या मनातील गोष्ट ओठांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आरक्षणावरून धरले होते कोंडीत उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने आरक्षण व संविधानाच्या मुद्यावरून सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडले होते. मोदी सरकार आरक्षण संपवण्याच्या प्रयत्नांत असून, त्यासाठी त्यांना 400 जागा हव्या आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता स्वतः राहुल गांधी यांनीच काँग्रेस योग्यवेळी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेईल असे विधान करून सत्ताधाऱ्यांच्या हाती आयते कोलित दिले आहे. अमित शहांनीही साधला निशाणा दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याच्या विधानांतून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचे विचार दिसतात. त्यांनी आरक्षण रद्द करण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

​काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याविषयी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांच्या मनातील गोष्ट आता तोंडात आली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर हीच त्यांची खरी भूमिका असून, त्यांचा हाच खरा चेहरा आहे, असे ते म्हणालेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे एका मुलाखतीत बोलताना राहुल यांनी कळीच्या आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही. तुम्ही आर्थिक आकडे पाहता तेव्हा आदिवासींना 100 रुपयांतून केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 100 रुपयांतून केवळ 5 रुपये मिळतात. ओबीसींनाही जवळपास एवढाच वाटा मिळतो. भारतातील बिझनेस लिडर्सची यादी पाहिली तर टॉप 200 मध्ये केवळ 1 ओबीसी आहे. वस्तुतः त्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांवर आहे. पण आम्ही या आजारावर कोणताही उपचार करत नाही, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचा खरा चेहरा आता समोर येत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केव्हाच संसदेपर्यंत पोहोचू दिले नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यांनी मुद्दाम भंडाऱ्यात विरोधात उमेदवार देऊन हरवले. त्यांनी मुंबईतही त्यांच्याशी तसाच व्यवहार केला. त्यांनी वारंवार त्यांचा अवमान केला. हे लोक भारताच्या संविधानाला केव्हाही ज्या नजरेने पाहण्याची गरज असते त्या नजरेने पाहत नाहीत. केवळ राजकीय टूल म्हणून त्यांनी संविधानाचा वापर केला. आता त्यांच्या मनातील गोष्ट ओठांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आरक्षणावरून धरले होते कोंडीत उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने आरक्षण व संविधानाच्या मुद्यावरून सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडले होते. मोदी सरकार आरक्षण संपवण्याच्या प्रयत्नांत असून, त्यासाठी त्यांना 400 जागा हव्या आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता स्वतः राहुल गांधी यांनीच काँग्रेस योग्यवेळी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेईल असे विधान करून सत्ताधाऱ्यांच्या हाती आयते कोलित दिले आहे. अमित शहांनीही साधला निशाणा दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याच्या विधानांतून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचे विचार दिसतात. त्यांनी आरक्षण रद्द करण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.  

20 महिन्यात पैसे दुप्पट म्हणत 80 लाखांचा ऑनलाइन गंडा:पुण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल

20 महिन्यात पैसे दुप्पट म्हणत 80 लाखांचा ऑनलाइन गंडा:पुण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल

चांगल्या पध्दतीने परतावा देताे, गुंतवणूक केलेली रक्कम 20 महिन्यात दुप्पट करुन देताे व मुळ गुंतवणुकीच्या दहा टक्के रक्कम दरमहा परत करु असे आश्वासन देऊन तीन जणांची 79 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिलीप भाऊसाहेब औटी (वय-40,रा.पारनेर, अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंदननगर पोलिस ठाण्यात आठ आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र बाळु पवार (वय-41,रा.मालेगाव, नाशिक), गणेश कडुबा माळाेदे (40,रा. ), प्रफुल कांबळे (40,रा.पुणे), शुभांगी नरेंद्र पवार (36,रा.मालेगाव, नाशिक), स्वप्नील ठाकरे (38,रा. मुंबई), संदीप अशाेक मुळे (38,रा.पुणे) , विजय खरात व मिथिल काळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदरचा प्रकार सन 2022 ते 13/11/2023 दरम्यान घडला आहे. तक्रारदार यांना आराेपींनी संगनमत करुन चांगले पध्दतीने परतावा देताे, गुंतवणुक केलेली रक्कम 20 महिन्यात दुप्पट करुन देताे व मुळ गुंतवणुकीच्या दहा टक्के रक्कम दरमहा परत करु असे आश्वासन दिले. वेगवेगळया ठिकाणी सेमिनार आयाेजित करुन त्यांचे ट्रेडिंग कंपनीत आर्थिक गुंतवणुक करण्यास सांगून अतिशय नियाेजनबध्द पध्दतीने तक्रारदार व इतर दाेनजणांची मिळून 79 लाख 81 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. प्रीपेड टास्कच्या अमिषाने फसवणूक धनकवडी परिसरात रहाणाऱ्या पुजा महादेव अंबिलपुरे (वय-29) या तरुणीस अज्ञात आराेपीने माेबाईलवर संर्पक करुन तिचा विश्वास संपादन केला. वेळाेवेळी विविध प्रीपेड टास्क देवून ते पूर्ण करण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगून तसेच त्याद्वारे अतिरिक्त कमाईचे अमिष दाखवून तक्रारदार हिची दाेन लाख 91 हजार रुपयांची आॅनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अज्ञात आराेपीवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​चांगल्या पध्दतीने परतावा देताे, गुंतवणूक केलेली रक्कम 20 महिन्यात दुप्पट करुन देताे व मुळ गुंतवणुकीच्या दहा टक्के रक्कम दरमहा परत करु असे आश्वासन देऊन तीन जणांची 79 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिलीप भाऊसाहेब औटी (वय-40,रा.पारनेर, अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंदननगर पोलिस ठाण्यात आठ आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र बाळु पवार (वय-41,रा.मालेगाव, नाशिक), गणेश कडुबा माळाेदे (40,रा. ), प्रफुल कांबळे (40,रा.पुणे), शुभांगी नरेंद्र पवार (36,रा.मालेगाव, नाशिक), स्वप्नील ठाकरे (38,रा. मुंबई), संदीप अशाेक मुळे (38,रा.पुणे) , विजय खरात व मिथिल काळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदरचा प्रकार सन 2022 ते 13/11/2023 दरम्यान घडला आहे. तक्रारदार यांना आराेपींनी संगनमत करुन चांगले पध्दतीने परतावा देताे, गुंतवणुक केलेली रक्कम 20 महिन्यात दुप्पट करुन देताे व मुळ गुंतवणुकीच्या दहा टक्के रक्कम दरमहा परत करु असे आश्वासन दिले. वेगवेगळया ठिकाणी सेमिनार आयाेजित करुन त्यांचे ट्रेडिंग कंपनीत आर्थिक गुंतवणुक करण्यास सांगून अतिशय नियाेजनबध्द पध्दतीने तक्रारदार व इतर दाेनजणांची मिळून 79 लाख 81 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. प्रीपेड टास्कच्या अमिषाने फसवणूक धनकवडी परिसरात रहाणाऱ्या पुजा महादेव अंबिलपुरे (वय-29) या तरुणीस अज्ञात आराेपीने माेबाईलवर संर्पक करुन तिचा विश्वास संपादन केला. वेळाेवेळी विविध प्रीपेड टास्क देवून ते पूर्ण करण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगून तसेच त्याद्वारे अतिरिक्त कमाईचे अमिष दाखवून तक्रारदार हिची दाेन लाख 91 हजार रुपयांची आॅनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अज्ञात आराेपीवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

कौतुक:ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेंचा पुनित बालन ग्रुपकडून 11 लाखांचा धनादेश देऊन गौरव

कौतुक:ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेंचा पुनित बालन ग्रुपकडून 11 लाखांचा धनादेश देऊन गौरव

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. स्वप्नीलच्या या पदकाने 72 वर्षांनी महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले. ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचा पुनित बालन ग्रुपचे प्रमुख पुनित बालन यांच्या हस्ते 11 लाखांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्यानंतर स्वप्नीलच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये 72 वर्षांनी पदक मिळाले. 1995 मध्ये कोल्हापूरमध्ये जन्मलेला स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक 2024च्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला आणि कांस्यपदक जिंकले. या सामन्यात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले आणि युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले आहे. कायदा सर्वांना समान भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट दिल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दरवर्षी मी पुण्यात गणराय दर्शनास येत असते नवीन ऊर्जा मला याठिकाणी मिळते. पुण्याच्या गल्लीबोळात उत्साहाने सण साजरा होत आहे. गणरायाने सर्वांना सद्बुद्धी द्यावे. पुनीत बालन गणेश मंडळांना मदत करत असताना विरोधक त्यांना लक्ष्य करत आहे. त्यापेक्षा जो काम करतो आहे त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मला अधिक बोलून माझे तोंड खराब कऱ्याचे नाही. नागपूर मध्ये बावनकुळे यांच्या कार अपघात प्रकरणावर वेगवेगळे आरोप विरोधक करत आहे.कायदा सर्वांना समान आहे. वेगवेगळे रंग देणारे कलाकार वातावरण भडकावेन प्रयत्न सध्या करत आहे.

​पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. स्वप्नीलच्या या पदकाने 72 वर्षांनी महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले. ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचा पुनित बालन ग्रुपचे प्रमुख पुनित बालन यांच्या हस्ते 11 लाखांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्यानंतर स्वप्नीलच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये 72 वर्षांनी पदक मिळाले. 1995 मध्ये कोल्हापूरमध्ये जन्मलेला स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक 2024च्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला आणि कांस्यपदक जिंकले. या सामन्यात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले आणि युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले आहे. कायदा सर्वांना समान भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट दिल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दरवर्षी मी पुण्यात गणराय दर्शनास येत असते नवीन ऊर्जा मला याठिकाणी मिळते. पुण्याच्या गल्लीबोळात उत्साहाने सण साजरा होत आहे. गणरायाने सर्वांना सद्बुद्धी द्यावे. पुनीत बालन गणेश मंडळांना मदत करत असताना विरोधक त्यांना लक्ष्य करत आहे. त्यापेक्षा जो काम करतो आहे त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मला अधिक बोलून माझे तोंड खराब कऱ्याचे नाही. नागपूर मध्ये बावनकुळे यांच्या कार अपघात प्रकरणावर वेगवेगळे आरोप विरोधक करत आहे.कायदा सर्वांना समान आहे. वेगवेगळे रंग देणारे कलाकार वातावरण भडकावेन प्रयत्न सध्या करत आहे.  

संकेत बावनकुळेचे मेडिकल का केले नाही?:ऑडीची FIR मध्ये नोंद का नाही? कार गॅरेजमध्ये का नेली? सुषमा अंधारेंचे पोलिसांना सवाल

संकेत बावनकुळेचे मेडिकल का केले नाही?:ऑडीची FIR मध्ये नोंद का नाही? कार गॅरेजमध्ये का नेली? सुषमा अंधारेंचे पोलिसांना सवाल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कार अपघाताच्या घटनेचा नागपुरात जावून आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ​​​​​​अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळेची ऑडी कार गॅरेजमध्ये का नेली? गाडीच्या नंबरच्या एफआयआरमध्ये नोंद का करण्यात आली नाही? संकेत बावनकुळे याचे या प्रकरणी मेडिकल का करण्यात आले नाही? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, बेगडी हिंदुत्व असणाऱ्या लोकांना माहिती असायला हवे म्हणून सांगते की भाजप नेत्याच्या मुलाने बीफ खाल्ले आणि त्यानंतर मानकापूरमध्ये पहिली धडक दिली. त्या ठिकाणी अपहरणाचा बराच ड्रामा झाला, यावेळी लोकांनी संकेत बावनकुळेंसह त्यांच्या मित्रांना बराच चोप दिला. त्यांना पोलिस ठाण्यात आणायचा प्रयत्न केला, असा दावाही अंधारे यांनी केला आहे, मला पीआय चकाटे आणि DCP मदने यांनी माहिती दिली, पण ही माहिती संपूर्ण नाही. अंधारेंचा पोलिसांसोबतचा संवाद असा सुषमा अंधारे : गाडीची माहिती एफआयआरमध्ये का नाही? पोलिस : आम्हाला गाडी नंतर मिळाली अंधारे : मग आता त्यात गाडीचा उल्लेख करा, संकेत बावनकुळेंची मेडिकल का केली नाही? पोलिस : संकेत बावनकुळे पळून गेला अंधारे : संकेत पळून गेला म्हणजे पोलिस यंत्रणा ही दुबळी आहे, तुम्ही त्याला शोधू शकत नाही. अंधारे : अपघात प्रकरणातील कार गॅरेजमध्ये का पाठवली पोलिस : आम्ही घटना घडली त्या परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे, त्यातून कोण कार चालवत होते ते निष्पन्न झाले आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत, असे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. पोलिस सुरक्षेची खात्री देणार? सुषमा अंधारे म्हणाल्या की, जितेंद्र सोनकांबळे वर दबाव आणायचा प्रयत्न सुरू आहे.तो अनुसूचित जातीतील असल्याने त्यांच्या जीवाची मला काळजी वाटते आहे. पोलिस त्यांच्या सुरक्षेची खात्री देतील का?, बावनकुळे म्हणतात तसे निपक्ष तपास होणार का, तसे असेल तर तुम्ही तसा आदेश काढा असेही अंधारे यांनी म्हटले आहे. विकास ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नेत्यांच्या मुलांसाठी संक्कार वर्गच उघडायला हवे. त्यांचा विकास ठाकरेंचा सल्ला हा पोर्शे प्रकरणात निबंध लिहून घेतल्यासारखाच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. निबंध लिहला की संपला विषय, अशी प्रथा जर पडली तर अवघड होईल. हीट ॲन्ड रनचा कायदा हा सत्ताधाऱ्यासाठी नाही फक्त विरोधक आणि गरीबांसाठी केला आहे असे सभागृहात नमूद करावे. विकास ठाकरे 24 तासांनतर या प्रकरणी का बोलत आहे. हे ही वृत्त वाचा काँग्रेस नेते अन् बावनकुळेंत देवाणघेवाण:सुषमा अंधारेंचा आरोप; विकास ठाकरेंचे प्रत्युत्तर -मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व बावनकुळेंत देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आपल्याला प्रामाणिकतेवर कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे ठणकावून सांगितले आहे. वाचा सविस्तर

​शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कार अपघाताच्या घटनेचा नागपुरात जावून आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ​​​​​​अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळेची ऑडी कार गॅरेजमध्ये का नेली? गाडीच्या नंबरच्या एफआयआरमध्ये नोंद का करण्यात आली नाही? संकेत बावनकुळे याचे या प्रकरणी मेडिकल का करण्यात आले नाही? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, बेगडी हिंदुत्व असणाऱ्या लोकांना माहिती असायला हवे म्हणून सांगते की भाजप नेत्याच्या मुलाने बीफ खाल्ले आणि त्यानंतर मानकापूरमध्ये पहिली धडक दिली. त्या ठिकाणी अपहरणाचा बराच ड्रामा झाला, यावेळी लोकांनी संकेत बावनकुळेंसह त्यांच्या मित्रांना बराच चोप दिला. त्यांना पोलिस ठाण्यात आणायचा प्रयत्न केला, असा दावाही अंधारे यांनी केला आहे, मला पीआय चकाटे आणि DCP मदने यांनी माहिती दिली, पण ही माहिती संपूर्ण नाही. अंधारेंचा पोलिसांसोबतचा संवाद असा सुषमा अंधारे : गाडीची माहिती एफआयआरमध्ये का नाही? पोलिस : आम्हाला गाडी नंतर मिळाली अंधारे : मग आता त्यात गाडीचा उल्लेख करा, संकेत बावनकुळेंची मेडिकल का केली नाही? पोलिस : संकेत बावनकुळे पळून गेला अंधारे : संकेत पळून गेला म्हणजे पोलिस यंत्रणा ही दुबळी आहे, तुम्ही त्याला शोधू शकत नाही. अंधारे : अपघात प्रकरणातील कार गॅरेजमध्ये का पाठवली पोलिस : आम्ही घटना घडली त्या परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे, त्यातून कोण कार चालवत होते ते निष्पन्न झाले आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत, असे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. पोलिस सुरक्षेची खात्री देणार? सुषमा अंधारे म्हणाल्या की, जितेंद्र सोनकांबळे वर दबाव आणायचा प्रयत्न सुरू आहे.तो अनुसूचित जातीतील असल्याने त्यांच्या जीवाची मला काळजी वाटते आहे. पोलिस त्यांच्या सुरक्षेची खात्री देतील का?, बावनकुळे म्हणतात तसे निपक्ष तपास होणार का, तसे असेल तर तुम्ही तसा आदेश काढा असेही अंधारे यांनी म्हटले आहे. विकास ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नेत्यांच्या मुलांसाठी संक्कार वर्गच उघडायला हवे. त्यांचा विकास ठाकरेंचा सल्ला हा पोर्शे प्रकरणात निबंध लिहून घेतल्यासारखाच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. निबंध लिहला की संपला विषय, अशी प्रथा जर पडली तर अवघड होईल. हीट ॲन्ड रनचा कायदा हा सत्ताधाऱ्यासाठी नाही फक्त विरोधक आणि गरीबांसाठी केला आहे असे सभागृहात नमूद करावे. विकास ठाकरे 24 तासांनतर या प्रकरणी का बोलत आहे. हे ही वृत्त वाचा काँग्रेस नेते अन् बावनकुळेंत देवाणघेवाण:सुषमा अंधारेंचा आरोप; विकास ठाकरेंचे प्रत्युत्तर -मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व बावनकुळेंत देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आपल्याला प्रामाणिकतेवर कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे ठणकावून सांगितले आहे. वाचा सविस्तर  

काँग्रेस नेते अन् बावनकुळेंत देवाणघेवाण:सुषमा अंधारेंचा आरोप; विकास ठाकरेंचे प्रत्युत्तर -मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही

काँग्रेस नेते अन् बावनकुळेंत देवाणघेवाण:सुषमा अंधारेंचा आरोप; विकास ठाकरेंचे प्रत्युत्तर -मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व बावनकुळेंत देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आपल्याला प्रामाणिकतेवर कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे ठणकावून सांगितले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या ऑडी कारने रविवारी मध्यरात्री काही वाहनांना धडक दिली होती. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच विकास ठाकरे यांनी संकेत याचा या अपघाताशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सत्ताधारी तर प्रयत्न करतच आहेत, पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावेत हे माझ्यासाठी कमालीचे अनाकलनीय आहे. पोलिस स्वतः सांगताहेत की संकेत त्या गाडीमध्ये होता आणि विकास ठाकरे म्हणतात संकेतचा संबंधच नाही..!! घोर कलयुग, असे त्या म्हणाल्या होत्या. विकास ठाकरे यांची काय मजबूरी आहे की जे संकेत बावनकुळे यांना वाचवत आहे? विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले? यात विकास ठाकरे यांचे काही स्थानिक राजकारण असू शकते, असेही सुषमा अंधारे या प्रकरणी म्हणाल्या होत्या. त्यांच्या या टीकेनंतर विकास ठाकरे यांनी बुधवारी आपली बाजू स्पष्ट केली. मला कुणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही विकास ठाकरे म्हणाले की, मी नागपुरात 1984 पासून भाजपविरोधात लढत आहे. लोकांनी अनेकदा मला निवडूनही दिले आहे. गत 10 वर्षांत आंदोलन केल्यामुळे माझ्यावर 40 गुन्हे दाखल झाले. भाजपशी कसे लढावे हे मला नागपुरात समजते. याप्रकरणी कुणाकडून ज्ञान घेण्याची मला गरज वाटत नाही. जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हावी हीच माझी भूमिका आहे. पण माझ्या बोलण्याचा कुणी विपर्यास केला असेल तर त्याविषयी माझ्याकडे उत्तर नाही. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मी एकटाच पुरेसा विकास ठाकरे पुढे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात कुणी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मी एकटाच त्यासाठी पुरेसा आहे. मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांना इथे येऊन काय साध्य करायचे आहे हे मला ठावूक आईहे. किंबहुना मी कुणाच्याही बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही. या प्रकरणात कोणताही आरोपी वाचणार नाही. कुणाच्या खच्चीकरणाने कुणी खचत नाही. मी भाजपविरोधात लढून येथे काँग्रेसची मते वाढवली आहेत. त्यामुळे मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. मविआच्या नेत्यांना दुखावणार नाही विकास ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांना दुखावणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी स्वतःहून माध्यमांपुढे जात नाही. कारण मला प्रसिद्धीचा सोस नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंनी बावनकुळेंवर गुन्हा करून दाखवला तर त्याचा आम्हालाही आनंद होईल. कारण मुळात आमचा लढाच त्यांच्याविरोधात आहे. मी महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याला दुखावणार नाही याची दखल त्यांनी घ्यावी, असे ते म्हणाले.

​भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व बावनकुळेंत देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आपल्याला प्रामाणिकतेवर कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे ठणकावून सांगितले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या ऑडी कारने रविवारी मध्यरात्री काही वाहनांना धडक दिली होती. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच विकास ठाकरे यांनी संकेत याचा या अपघाताशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सत्ताधारी तर प्रयत्न करतच आहेत, पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावेत हे माझ्यासाठी कमालीचे अनाकलनीय आहे. पोलिस स्वतः सांगताहेत की संकेत त्या गाडीमध्ये होता आणि विकास ठाकरे म्हणतात संकेतचा संबंधच नाही..!! घोर कलयुग, असे त्या म्हणाल्या होत्या. विकास ठाकरे यांची काय मजबूरी आहे की जे संकेत बावनकुळे यांना वाचवत आहे? विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले? यात विकास ठाकरे यांचे काही स्थानिक राजकारण असू शकते, असेही सुषमा अंधारे या प्रकरणी म्हणाल्या होत्या. त्यांच्या या टीकेनंतर विकास ठाकरे यांनी बुधवारी आपली बाजू स्पष्ट केली. मला कुणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही विकास ठाकरे म्हणाले की, मी नागपुरात 1984 पासून भाजपविरोधात लढत आहे. लोकांनी अनेकदा मला निवडूनही दिले आहे. गत 10 वर्षांत आंदोलन केल्यामुळे माझ्यावर 40 गुन्हे दाखल झाले. भाजपशी कसे लढावे हे मला नागपुरात समजते. याप्रकरणी कुणाकडून ज्ञान घेण्याची मला गरज वाटत नाही. जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हावी हीच माझी भूमिका आहे. पण माझ्या बोलण्याचा कुणी विपर्यास केला असेल तर त्याविषयी माझ्याकडे उत्तर नाही. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मी एकटाच पुरेसा विकास ठाकरे पुढे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात कुणी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मी एकटाच त्यासाठी पुरेसा आहे. मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांना इथे येऊन काय साध्य करायचे आहे हे मला ठावूक आईहे. किंबहुना मी कुणाच्याही बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही. या प्रकरणात कोणताही आरोपी वाचणार नाही. कुणाच्या खच्चीकरणाने कुणी खचत नाही. मी भाजपविरोधात लढून येथे काँग्रेसची मते वाढवली आहेत. त्यामुळे मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. मविआच्या नेत्यांना दुखावणार नाही विकास ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांना दुखावणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी स्वतःहून माध्यमांपुढे जात नाही. कारण मला प्रसिद्धीचा सोस नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंनी बावनकुळेंवर गुन्हा करून दाखवला तर त्याचा आम्हालाही आनंद होईल. कारण मुळात आमचा लढाच त्यांच्याविरोधात आहे. मी महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याला दुखावणार नाही याची दखल त्यांनी घ्यावी, असे ते म्हणाले.  

​​​​​​​सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील:पक्ष कुणाला विचारून एखादे पद किंवा आमदारकी देत नाही -बावनकुळे

​​​​​​​सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील:पक्ष कुणाला विचारून एखादे पद किंवा आमदारकी देत नाही -बावनकुळे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदाची दिलेली जबाबदारी पेलण्यास नकार दिल्यामुळे भाजपमधील असंतोष प्रकर्षाने पुढे आला आहे. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून सोमय्या यांना पक्षादेश पाळावाच लागेल असे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीतील धुसफूस प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली होती. पण किरीट सोमय्या यांनी स्पष्ट शब्दांत हे पद नाकारले आहे. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे आपला निर्णय भाजपच्या राज्यातील नेतृत्वासह निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्ष माजी खासदार रावसाहेब दानवे यांना कळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुणालाही विचारून जबाबदारी देत नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण पक्षाचे नेतृत्व हे कुणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही. याविषयी तसा नियमही नाही. कुणाला आमदारकी द्यायची असेल तरीही पक्ष विचारत नाही. मला स्वतःला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना विचारण्यात आले नव्हते. केवळ तुम्ही काम करा असे सांगण्यात आले. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. त्यानुसार ते त्यांना देण्यात आलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील. काय म्हणाले होते किरीट सोमय्या? किरीट सोमय्या निवडणूक संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी फेटाळताना म्हणाले होते की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या आपल्या पत्रात म्हणाले होते.

​भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदाची दिलेली जबाबदारी पेलण्यास नकार दिल्यामुळे भाजपमधील असंतोष प्रकर्षाने पुढे आला आहे. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून सोमय्या यांना पक्षादेश पाळावाच लागेल असे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीतील धुसफूस प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली होती. पण किरीट सोमय्या यांनी स्पष्ट शब्दांत हे पद नाकारले आहे. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे आपला निर्णय भाजपच्या राज्यातील नेतृत्वासह निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्ष माजी खासदार रावसाहेब दानवे यांना कळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुणालाही विचारून जबाबदारी देत नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण पक्षाचे नेतृत्व हे कुणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही. याविषयी तसा नियमही नाही. कुणाला आमदारकी द्यायची असेल तरीही पक्ष विचारत नाही. मला स्वतःला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना विचारण्यात आले नव्हते. केवळ तुम्ही काम करा असे सांगण्यात आले. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. त्यानुसार ते त्यांना देण्यात आलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील. काय म्हणाले होते किरीट सोमय्या? किरीट सोमय्या निवडणूक संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी फेटाळताना म्हणाले होते की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या आपल्या पत्रात म्हणाले होते.  

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या:हिंगोलीच्या वसई शिवारातील घटना

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या:हिंगोलीच्या वसई शिवारातील घटना

पूर्णा ते हिंगोली रेल्वेमार्गावर वसई शिवारात अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने मालगाडी खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता. 11 पहाटे घडली आहे. गंगाधर लक्ष्मण सातपुते (35) असे मयत शेतकऱ्यांचे नांव आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथील शेतकरी गंगाधर सातपुते यांना दिड एकर शेती आहे. या सोबत दुग्ध व्यवसाय व रोजमजुरी करतात. घरी आई, वडिल, दोन मुले, पत्नी व स्वतः गंगाधर असे सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर चालतो. यावर्षी त्यांनी दिड एकर शेतामध्ये सोयाबीनचे पिक घेतले आहे. सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र ता. १ व ता. २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडू लागले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे पिक हातचे गेले असून आता लागवडीचा खर्च कसा निघेल व उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा होता. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आज पहाटेच ते घरून शेतात जातो असे सांगून निघाले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारा त्यांच्या शेतालगतच असलेल्या रेल्वे रुळाजवळ बसले अन मालगाडी येताच त्यांनी त्यांनी मालगाडी खाली आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वसई येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. नापीकीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अद्यापपर्यंत औंढा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

​पूर्णा ते हिंगोली रेल्वेमार्गावर वसई शिवारात अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने मालगाडी खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता. 11 पहाटे घडली आहे. गंगाधर लक्ष्मण सातपुते (35) असे मयत शेतकऱ्यांचे नांव आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथील शेतकरी गंगाधर सातपुते यांना दिड एकर शेती आहे. या सोबत दुग्ध व्यवसाय व रोजमजुरी करतात. घरी आई, वडिल, दोन मुले, पत्नी व स्वतः गंगाधर असे सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर चालतो. यावर्षी त्यांनी दिड एकर शेतामध्ये सोयाबीनचे पिक घेतले आहे. सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र ता. १ व ता. २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडू लागले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे पिक हातचे गेले असून आता लागवडीचा खर्च कसा निघेल व उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा होता. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आज पहाटेच ते घरून शेतात जातो असे सांगून निघाले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारा त्यांच्या शेतालगतच असलेल्या रेल्वे रुळाजवळ बसले अन मालगाडी येताच त्यांनी त्यांनी मालगाडी खाली आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वसई येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. नापीकीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अद्यापपर्यंत औंढा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.  

आम्हीच ​​​​​​​हिंदुत्त्ववादी अन् मराठी मते टिकवली:एकनाथ शिंदेंचा अमित शहांपुढे दावा, मविआचा सामना करण्यासाठी मागितल्या 105 जागा

आम्हीच ​​​​​​​हिंदुत्त्ववादी अन् मराठी मते टिकवली:एकनाथ शिंदेंचा अमित शहांपुढे दावा, मविआचा सामना करण्यासाठी मागितल्या 105 जागा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे विधानसभेच्या 100 हून अधिक जागांची मागणी केल्याचा दावा पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्त्ववादी व मराठी मते महायुतीसोबत यशस्वीपणे टिकवून दाखवली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला महायुतीत 100 हून अधिक जागा मिळाल्या, तरच आम्हाला उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला पराभूत करता येईल, असे शिंदे यांनी अमित शहा यांना पटवून दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेने राज्यातील 288 पैकी 100 ते 105 जागांवर दावा ठोकला आहे. याऊलट भाजपची 160 जागा लढवून 2019 हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तर राष्ट्रवादी 60 ते 80 जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नांत आहे. या राजकीय गणितामुळे महायुतीत 40 ते 50 जागांवर जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांपुढे 100 ते 105 जागांची मागणी केल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने शहांपुढे लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीसह अखंड शिवसेनेच्या परफॉर्मन्सविषयी एक विस्तृत सादरीकरण करण्यात आले, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. आम्हीच मराठी व हिंदुत्त्वादी मते टिकवली आम्ही पक्षाची मराठी व हिंदुत्ववादी मते टिकवून ठेवली आहेत. याऊलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्वतःची फारशी मते मिळाली नाहीत. इंडिया आघाडीसाठी धोरणात्मक मतदान झाल्यामुळे त्यांना मते मिळाली. त्यामुळे 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरच आम्ही ठाकरे गटाचा सामना करु आणि महाविकास आघाडीला पराभूत करु शकतो, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी अमित शहांना सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला चालू महिन्यातच निश्चित होण्याची शक्यता आहे. पण शिवसेना व राष्ट्रवादीची मागणी पाहता भाजप शिवसेनेला 80 ते 90, राष्ट्रवादीला 50 ते 60 जागा देऊन स्वतः 140 च्या आसपास जागा लढवेल असे चित्र आहे.

​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे विधानसभेच्या 100 हून अधिक जागांची मागणी केल्याचा दावा पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्त्ववादी व मराठी मते महायुतीसोबत यशस्वीपणे टिकवून दाखवली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला महायुतीत 100 हून अधिक जागा मिळाल्या, तरच आम्हाला उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला पराभूत करता येईल, असे शिंदे यांनी अमित शहा यांना पटवून दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेने राज्यातील 288 पैकी 100 ते 105 जागांवर दावा ठोकला आहे. याऊलट भाजपची 160 जागा लढवून 2019 हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तर राष्ट्रवादी 60 ते 80 जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नांत आहे. या राजकीय गणितामुळे महायुतीत 40 ते 50 जागांवर जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांपुढे 100 ते 105 जागांची मागणी केल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने शहांपुढे लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीसह अखंड शिवसेनेच्या परफॉर्मन्सविषयी एक विस्तृत सादरीकरण करण्यात आले, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. आम्हीच मराठी व हिंदुत्त्वादी मते टिकवली आम्ही पक्षाची मराठी व हिंदुत्ववादी मते टिकवून ठेवली आहेत. याऊलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्वतःची फारशी मते मिळाली नाहीत. इंडिया आघाडीसाठी धोरणात्मक मतदान झाल्यामुळे त्यांना मते मिळाली. त्यामुळे 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरच आम्ही ठाकरे गटाचा सामना करु आणि महाविकास आघाडीला पराभूत करु शकतो, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी अमित शहांना सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला चालू महिन्यातच निश्चित होण्याची शक्यता आहे. पण शिवसेना व राष्ट्रवादीची मागणी पाहता भाजप शिवसेनेला 80 ते 90, राष्ट्रवादीला 50 ते 60 जागा देऊन स्वतः 140 च्या आसपास जागा लढवेल असे चित्र आहे.  

चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगाच गाडी चालवत होता:सरकारकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा आरोप

चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगाच गाडी चालवत होता:सरकारकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा आरोप

नागपूरमध्ये जो अपघात झाला त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत गाडी चालवत होता. अपघातानंतर दुसऱ्या व्यक्तीला चालक म्हणून दाखवण्यात आले आणि संकेतला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, संबंधित गाडीत लोकांना महागड्या मद्याच्या बाटल्या आणि एका पंचतारांकित हॉटेलचे चार जणांचे मांसाहारी जेवणाचे बिल आढळून आले आहे. त्यामध्ये ‘बीफ कटलेट’चे देखील बिल समाविष्ट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकीकडे बीफवरुन लोकांना मारहाण करायची आणि दुसरीकडे बीफ खाऊन लोकांना चिरडायचे असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येतात. राजकीय बैठका घेतात. निवडणुकीची तयारी करतात. आमच्यावर टीका करतात. पण मणिपूरवर कधी बोलणार?. तिथे कधी ॲक्शन घेणार, मणिपूर हातातून घालवायच आहे का? सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शाह त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावे. मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा आहे. मोदींनी मणिपूरला जावं, अन्यथा राजीनामा द्यावा. आता दोष द्यायला पंडित नेहरु नाहीत, तुम्ही 11 वर्षापासून सत्तेवर आहात.

हे वृत्त अपडेट होत आहे…

​नागपूरमध्ये जो अपघात झाला त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत गाडी चालवत होता. अपघातानंतर दुसऱ्या व्यक्तीला चालक म्हणून दाखवण्यात आले आणि संकेतला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, संबंधित गाडीत लोकांना महागड्या मद्याच्या बाटल्या आणि एका पंचतारांकित हॉटेलचे चार जणांचे मांसाहारी जेवणाचे बिल आढळून आले आहे. त्यामध्ये ‘बीफ कटलेट’चे देखील बिल समाविष्ट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकीकडे बीफवरुन लोकांना मारहाण करायची आणि दुसरीकडे बीफ खाऊन लोकांना चिरडायचे असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येतात. राजकीय बैठका घेतात. निवडणुकीची तयारी करतात. आमच्यावर टीका करतात. पण मणिपूरवर कधी बोलणार?. तिथे कधी ॲक्शन घेणार, मणिपूर हातातून घालवायच आहे का? सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शाह त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावे. मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा आहे. मोदींनी मणिपूरला जावं, अन्यथा राजीनामा द्यावा. आता दोष द्यायला पंडित नेहरु नाहीत, तुम्ही 11 वर्षापासून सत्तेवर आहात.

हे वृत्त अपडेट होत आहे…  

दिव्य मराठी अपडेट्स:खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रक कालव्यात कोसळला, 7 ठार; आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील घटना

दिव्य मराठी अपडेट्स:खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रक कालव्यात कोसळला, 7 ठार; आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील घटना

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स… आंध्र प्रदेशात लॉरी कालव्यात पडून 7 ठार पूर्व गोदावरी – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवरापल्ली येथे मंगळवारी रात्री उशिरा एक लॉरी कालव्यात पडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. डीएसपी जी देवा कुमार म्हणाले की, लॉरीच्या ड्रायव्हरने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात ट्रकवरील नियंत्रण सुटून तो थेट कालव्यात पडला. या अपघातात लॉरीवर बसलेल्या सर्व ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौकीवर गोळीबार श्रीनगर – जम्मूच्या अखनूर भागात सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर लष्कर हाय अलर्टवर आहे. ही घटना 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2:35 वाजता घडली. फुटबॉलपटू अन्वर अलीवर 4 महिन्यांची बंदी नवी दिल्ली – इंडियन सुपर लीग सुरू होण्यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या खेळाडू स्थिती समितीने भारतीय फुटबॉलपटू अन्वर अलीवर 4 महिन्यांची बंदी घातली आहे. अन्वरने नियोजित वेळेच्या 4 वर्षे आधीच मोहन बागानसोबतचा लोन करार संपवला आणि प्रतिस्पर्धी क्लब ईस्ट बंगालमध्ये सामील झाला. समितीला करार संपुष्टात आणण्याचे कोणतेही वैध कारण सापडले नाही आणि हस्तांतरण बेकायदेशीर मानले. या प्रकरणात, ईस्ट बंगाल आणि दिल्ली एफसीलाही दोन ट्रान्सफर विंडोवर बंदी घालण्यात आली असून त्यांना मोहन बागानला 12.9 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स… आंध्र प्रदेशात लॉरी कालव्यात पडून 7 ठार पूर्व गोदावरी – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवरापल्ली येथे मंगळवारी रात्री उशिरा एक लॉरी कालव्यात पडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. डीएसपी जी देवा कुमार म्हणाले की, लॉरीच्या ड्रायव्हरने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात ट्रकवरील नियंत्रण सुटून तो थेट कालव्यात पडला. या अपघातात लॉरीवर बसलेल्या सर्व ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौकीवर गोळीबार श्रीनगर – जम्मूच्या अखनूर भागात सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर लष्कर हाय अलर्टवर आहे. ही घटना 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2:35 वाजता घडली. फुटबॉलपटू अन्वर अलीवर 4 महिन्यांची बंदी नवी दिल्ली – इंडियन सुपर लीग सुरू होण्यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या खेळाडू स्थिती समितीने भारतीय फुटबॉलपटू अन्वर अलीवर 4 महिन्यांची बंदी घातली आहे. अन्वरने नियोजित वेळेच्या 4 वर्षे आधीच मोहन बागानसोबतचा लोन करार संपवला आणि प्रतिस्पर्धी क्लब ईस्ट बंगालमध्ये सामील झाला. समितीला करार संपुष्टात आणण्याचे कोणतेही वैध कारण सापडले नाही आणि हस्तांतरण बेकायदेशीर मानले. या प्रकरणात, ईस्ट बंगाल आणि दिल्ली एफसीलाही दोन ट्रान्सफर विंडोवर बंदी घालण्यात आली असून त्यांना मोहन बागानला 12.9 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.