Category: marathi

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 6 हजार जेष्ठ नागरीकांचे अर्ज:आरोग्य शिबिरे आयोजित करा- जिल्हाधिकारी

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 6 हजार जेष्ठ नागरीकांचे अर्ज:आरोग्य शिबिरे आयोजित करा- जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्हयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये आता पर्यंत ६ हजार जेष्ठ नागरीकांचे अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त नागरीकांना या याेजनेचा लाभ देण्यासाठी गावपातळीवर आरोग्य शिबीर आयोजित करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. जिल्हयातील विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पालकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, यावर उपाययोजना करण्यासाठी चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वांइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत आता पर्यंत ६ हजार जेष्ठ नागरीकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर आरोग्य शिबीरे घ्यावीत. त्या ठिकाणी नागरीकांना आवश्‍यक असणाऱ्या उपकरणासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अनुदान देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावेत. त्यांना द्यावयाच्या लाभाचा उल्लेख असलेली यादी तयार करुन मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्याच्या सुचना गोयल यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमातील यादी तपासून त्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. पात्र लाभार्थ्यांकडून प्राप्त अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी दिल्या आहेत.

​हिंगोली जिल्हयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये आता पर्यंत ६ हजार जेष्ठ नागरीकांचे अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त नागरीकांना या याेजनेचा लाभ देण्यासाठी गावपातळीवर आरोग्य शिबीर आयोजित करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. जिल्हयातील विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पालकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, यावर उपाययोजना करण्यासाठी चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वांइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत आता पर्यंत ६ हजार जेष्ठ नागरीकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर आरोग्य शिबीरे घ्यावीत. त्या ठिकाणी नागरीकांना आवश्‍यक असणाऱ्या उपकरणासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अनुदान देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावेत. त्यांना द्यावयाच्या लाभाचा उल्लेख असलेली यादी तयार करुन मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्याच्या सुचना गोयल यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमातील यादी तपासून त्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. पात्र लाभार्थ्यांकडून प्राप्त अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी दिल्या आहेत.  

चिंचोली निळोबामध्ये घरावर छापा टाकत गावठी पिस्टल जप्त:हिंगोलीतील गुन्हे शाखेची कारवाई

चिंचोली निळोबामध्ये घरावर छापा टाकत गावठी पिस्टल जप्त:हिंगोलीतील गुन्हे शाखेची कारवाई

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरावर छापा टाकून गावठी पिस्टल जप्त केले आहे. या प्रकरणी एका तरुणावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 10 रात्री गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील 13 ठाणेदारांची 13 पथके स्थापन केली असून त्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून गावठी पिस्टल, तलवार, खंजर व इतर घातकशस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे दत्तात्रय रवंदळे (28) या तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार गजानन पोकळे, विकी कुंदनानी यांचे पथक मंगळवारी त्याच्या पाळतीवर होते. त्याच्याकडे पिस्टल असल्याची खात्री झाल्यनंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून तपासणी केली. यामध्ये दत्तात्रय याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे. या पिस्टलची किंमत 15 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. पोलिसांनी गावठी पिस्टल जप्त करून दत्तात्रय यास ताब्यात घेत औंढा नागनाथ पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी जमादार पोकळे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संदीप टाक पुढील तपास करीत आहेत.

​औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरावर छापा टाकून गावठी पिस्टल जप्त केले आहे. या प्रकरणी एका तरुणावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 10 रात्री गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील 13 ठाणेदारांची 13 पथके स्थापन केली असून त्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून गावठी पिस्टल, तलवार, खंजर व इतर घातकशस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे दत्तात्रय रवंदळे (28) या तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार गजानन पोकळे, विकी कुंदनानी यांचे पथक मंगळवारी त्याच्या पाळतीवर होते. त्याच्याकडे पिस्टल असल्याची खात्री झाल्यनंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून तपासणी केली. यामध्ये दत्तात्रय याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे. या पिस्टलची किंमत 15 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. पोलिसांनी गावठी पिस्टल जप्त करून दत्तात्रय यास ताब्यात घेत औंढा नागनाथ पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी जमादार पोकळे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संदीप टाक पुढील तपास करीत आहेत.  

पिंप्री सदो उर्दू शाळेला एकच शिक्षक, मंत्र्यांकडे तक्रारीसाठी विद्यार्थी स्टेशनवर:6 वर्गांना 8 महिन्यांपासून एकच शिक्षक, 8 महिन्यांपासून पाठपुरावा

पिंप्री सदो उर्दू शाळेला एकच शिक्षक, मंत्र्यांकडे तक्रारीसाठी विद्यार्थी स्टेशनवर:6 वर्गांना 8 महिन्यांपासून एकच शिक्षक, 8 महिन्यांपासून पाठपुरावा

तालुक्यातील पिंप्री सदो येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील सहा वर्गांना आठ महिन्यांपासून एकच शिक्षक आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही मार्ग निघत नसल्याने या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेण्यासाठी मंगळवारी दुपारी इगतपुरी रेल्वेस्थानक गाठल्याने शिक्षण विभागात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, विद्यार्थी व पालकांची समजूत घालता घालता या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. पिंप्री सदो येथील उर्दू शाळेत पहिली ते सहावीच्या वर्गातील २२ विद्यार्थ्यांना ८ महिन्यांपासून एकच शिक्षक अध्यापन करत आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार करूनही मार्ग निघत नसल्याने पालकांनी शिक्षणमंत्र्यांकडे जायचा अचानक निर्णय घेतला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व पालक विद्यार्थ्यांना घेऊन इगतपुरी रेल्वेस्थानकात पोहोचले. याविषयी माहिती मिळताच अनेक दिवसांपासून टाळाटाळ करणारे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, विस्तार अधिकारी अशोक मुंडे उर्वरित पान २ नीलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी Q. वेळोवेळी मागणी करूनही शिक्षक का दिला जात नाही? A. शाळांवर शिक्षक देणे नियुक्ती करणे हे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत नाही. हे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. दर महिन्याला तालुक्यातील रिक्त पदांचा अहवाल दिला जात आहे. Q. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? A. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिलेले नाही. संबंधित एका शिक्षकाला प्राधान्याने विद्यार्थी गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. Q. किती दिवसांत दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली जाणार? A. ज्या शाळेत २० व त्यावरील पटांच्या शाळांना शिक्षक नाहीत, त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड शिक्षक मानधन तत्त्वावर दिले जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. ही प्रक्रिया साधारणत: २० ते २५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. आपल्या तालुक्यातून पहिलाच अर्ज गेला आहे. आठ महिन्यापासून या शाळेच्या समस्या नाशिक येथील वरिष्ठांना देखील कळवल्या आहेत. मध्यंतरी शाळेला टाळे ठोकले होते. त्यानंतर दुसरे शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर १५ दिवसांनंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे‌ थे’ झाली. याला जबाबदार असलेल्या विस्तार अधिकारी यांची बदली करावी. – मतिन पठाण, ट्रस्टी जामा मस्जिद, पिंपरी सदो

​तालुक्यातील पिंप्री सदो येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील सहा वर्गांना आठ महिन्यांपासून एकच शिक्षक आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही मार्ग निघत नसल्याने या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेण्यासाठी मंगळवारी दुपारी इगतपुरी रेल्वेस्थानक गाठल्याने शिक्षण विभागात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, विद्यार्थी व पालकांची समजूत घालता घालता या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. पिंप्री सदो येथील उर्दू शाळेत पहिली ते सहावीच्या वर्गातील २२ विद्यार्थ्यांना ८ महिन्यांपासून एकच शिक्षक अध्यापन करत आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार करूनही मार्ग निघत नसल्याने पालकांनी शिक्षणमंत्र्यांकडे जायचा अचानक निर्णय घेतला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व पालक विद्यार्थ्यांना घेऊन इगतपुरी रेल्वेस्थानकात पोहोचले. याविषयी माहिती मिळताच अनेक दिवसांपासून टाळाटाळ करणारे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, विस्तार अधिकारी अशोक मुंडे उर्वरित पान २ नीलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी Q. वेळोवेळी मागणी करूनही शिक्षक का दिला जात नाही? A. शाळांवर शिक्षक देणे नियुक्ती करणे हे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत नाही. हे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. दर महिन्याला तालुक्यातील रिक्त पदांचा अहवाल दिला जात आहे. Q. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? A. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिलेले नाही. संबंधित एका शिक्षकाला प्राधान्याने विद्यार्थी गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. Q. किती दिवसांत दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली जाणार? A. ज्या शाळेत २० व त्यावरील पटांच्या शाळांना शिक्षक नाहीत, त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड शिक्षक मानधन तत्त्वावर दिले जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. ही प्रक्रिया साधारणत: २० ते २५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. आपल्या तालुक्यातून पहिलाच अर्ज गेला आहे. आठ महिन्यापासून या शाळेच्या समस्या नाशिक येथील वरिष्ठांना देखील कळवल्या आहेत. मध्यंतरी शाळेला टाळे ठोकले होते. त्यानंतर दुसरे शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर १५ दिवसांनंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे‌ थे’ झाली. याला जबाबदार असलेल्या विस्तार अधिकारी यांची बदली करावी. – मतिन पठाण, ट्रस्टी जामा मस्जिद, पिंपरी सदो  

विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक डॉ. पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जिल्ह्यातील 65 शिक्षकांचा कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मान

विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक डॉ. पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जिल्ह्यातील 65 शिक्षकांचा कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मान

मानवाच्या होत असलेल्या जलद विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे मत माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे (प्राथमिक विभाग) केजी टू पीजीपर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात कृतीशील शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक ६५ शिक्षकांना कृतीशील शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी बीजीईचे ॲड. मोतिसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, डॉ. अपर्णा पाटील, डॉ. नरेश बजाज, संजय चौधरी, संजय तिकांडे, आशिष पवित्रकार, परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, नवकल्पना आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये पूर्वीपेक्षा अधिक आहेत. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये वाढवण्याची, त्यांना सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात, असेही डॉ. पाटील म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर महाजन व देवेंद्र वाकचवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल पिलात्रे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, वंदना बोर्डे, पूजिता खेतकर, गजानन शेवलकर आदींनी घेतले. यांचा केला सन्मान ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळा ता. मूर्तिजापूर व शहरी भागातील खंडेलवाल इंग्लिश स्कूल( डाबकी रोड ) या दोन शाळांचा “कृतीशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे सल्लागार मुरलीधर कुलट यांना सेवानिवृत्तीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्या कविता ढाकणे, देविदास पवार, शशिकांत गायकवाड, दिगंबर खडसे, रवीकुमार खेतकर, हिंमत ढाळे, मोहसीन खान या सहा शिक्षकांना “शिक्षक रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

​मानवाच्या होत असलेल्या जलद विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे मत माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे (प्राथमिक विभाग) केजी टू पीजीपर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात कृतीशील शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक ६५ शिक्षकांना कृतीशील शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी बीजीईचे ॲड. मोतिसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, डॉ. अपर्णा पाटील, डॉ. नरेश बजाज, संजय चौधरी, संजय तिकांडे, आशिष पवित्रकार, परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, नवकल्पना आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये पूर्वीपेक्षा अधिक आहेत. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये वाढवण्याची, त्यांना सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात, असेही डॉ. पाटील म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर महाजन व देवेंद्र वाकचवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल पिलात्रे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, वंदना बोर्डे, पूजिता खेतकर, गजानन शेवलकर आदींनी घेतले. यांचा केला सन्मान ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळा ता. मूर्तिजापूर व शहरी भागातील खंडेलवाल इंग्लिश स्कूल( डाबकी रोड ) या दोन शाळांचा “कृतीशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे सल्लागार मुरलीधर कुलट यांना सेवानिवृत्तीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्या कविता ढाकणे, देविदास पवार, शशिकांत गायकवाड, दिगंबर खडसे, रवीकुमार खेतकर, हिंमत ढाळे, मोहसीन खान या सहा शिक्षकांना “शिक्षक रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

चालक दारूच्या नशेत ऑडीने वाहने ठोकरत होता:तेव्हा बावनकुळेंचा मुलगा गाडीतच होता

चालक दारूच्या नशेत ऑडीने वाहने ठोकरत होता:तेव्हा बावनकुळेंचा मुलगा गाडीतच होता

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या भरधाव ऑडी कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव गेला नसला तरी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर संकेतसह गाडीतील तिघेही पळून गेले होते. त्यापैकी दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली, संकेतवर मात्र कारवाई झाली नव्हती. दरम्यान, कारचालकाने दारू प्यायल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच मंगळवारी संकेतची चौकशी केली असता अपघातावेळी तो ऑडीमध्येच असल्याचे त्याने कबूल केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. रविवारी मध्यरात्री रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील हाॅटेल सेंटर पाॅइंटसमोर भरधाव इलेक्ट्रिक आॅडी कारने (एमएच ४०/ सीवाय ४०४०) दुचाकीसह चार चाकी वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे मदने यांनी सांगितले. अपघात झाला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सोमवारी याबाबत लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरु होता. पोलिसांनीही प्रारंभी यावर बोलणे टाळले. मात्र, या प्रकरणाची खूपच चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संकेत यांची बोलावून चौकशी केली. त्याने अपघातावेळी आपण कारमध्येच असल्याची कबुली दिल्याचे मदने यांनी सांगितले. ‘चालक अर्जुन जितेंद्र हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला आहे’, असे मदने यांनी सांगितले. कार अर्जुन हावरे चालवत होता, तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि रोहित चिंतमवार (२७) मागच्या सीटवर बसला होता. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना अडवले. काही जणांनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही, याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. हाॅटेलमधून घरी जाताना अपघात, संकेतची मात्र रक्ततपासणी नाही : एका हाॅटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचे सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ‘यावेळी चालक नशेत होता असे आढळून आले आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट यायचा आहे. रात्री दोघांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात ते नशेत होते असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल आहे. रोहित वा संकेतवर गुन्हा दाखल नाही. त्याबाबत तपास सुरू आहे. पण संकेत याच्या रक्ताची तपासणी करण्यात आलेली नाही. आतापर्यंत तीन गाड्यांचे नुकसान झालेले आहे. यात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आलं आहे, असे मदने यांनी सांगितले.

​भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या भरधाव ऑडी कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव गेला नसला तरी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर संकेतसह गाडीतील तिघेही पळून गेले होते. त्यापैकी दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली, संकेतवर मात्र कारवाई झाली नव्हती. दरम्यान, कारचालकाने दारू प्यायल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच मंगळवारी संकेतची चौकशी केली असता अपघातावेळी तो ऑडीमध्येच असल्याचे त्याने कबूल केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. रविवारी मध्यरात्री रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील हाॅटेल सेंटर पाॅइंटसमोर भरधाव इलेक्ट्रिक आॅडी कारने (एमएच ४०/ सीवाय ४०४०) दुचाकीसह चार चाकी वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे मदने यांनी सांगितले. अपघात झाला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सोमवारी याबाबत लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरु होता. पोलिसांनीही प्रारंभी यावर बोलणे टाळले. मात्र, या प्रकरणाची खूपच चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संकेत यांची बोलावून चौकशी केली. त्याने अपघातावेळी आपण कारमध्येच असल्याची कबुली दिल्याचे मदने यांनी सांगितले. ‘चालक अर्जुन जितेंद्र हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला आहे’, असे मदने यांनी सांगितले. कार अर्जुन हावरे चालवत होता, तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि रोहित चिंतमवार (२७) मागच्या सीटवर बसला होता. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना अडवले. काही जणांनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही, याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. हाॅटेलमधून घरी जाताना अपघात, संकेतची मात्र रक्ततपासणी नाही : एका हाॅटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचे सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ‘यावेळी चालक नशेत होता असे आढळून आले आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट यायचा आहे. रात्री दोघांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात ते नशेत होते असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल आहे. रोहित वा संकेतवर गुन्हा दाखल नाही. त्याबाबत तपास सुरू आहे. पण संकेत याच्या रक्ताची तपासणी करण्यात आलेली नाही. आतापर्यंत तीन गाड्यांचे नुकसान झालेले आहे. यात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आलं आहे, असे मदने यांनी सांगितले.  

किरीट सोमय्यांचे दानवेंना पत्र, म्हटले- अवमानास्पद वागणूक देऊ नका:निवडणूक आयोग संपर्क प्रमुखाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार

किरीट सोमय्यांचे दानवेंना पत्र, म्हटले- अवमानास्पद वागणूक देऊ नका:निवडणूक आयोग संपर्क प्रमुखाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार

भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र निवडणूकीसाठी पक्षाने दिलेली संपर्क प्रमुखाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “प्रिय रावसाहेब,आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी, 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हा पासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य/ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वत: ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो. धन्यवाद !” दरम्यान सोमय्यांच्या या लेटर बॉम्बमुळे सोमय्यांची नाराजी उघड झाली आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या मनधरणीसाठी भाजप श्रेष्ठी काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली. रावसाहेब दानवे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र आता या नियुक्तीवरुन किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या यांनी म्हटलं. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. त्यावेळी तीन वेळा माझा वर जीवघेणे हल्ले झाले, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

​भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र निवडणूकीसाठी पक्षाने दिलेली संपर्क प्रमुखाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “प्रिय रावसाहेब,आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी, 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हा पासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य/ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वत: ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो. धन्यवाद !” दरम्यान सोमय्यांच्या या लेटर बॉम्बमुळे सोमय्यांची नाराजी उघड झाली आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या मनधरणीसाठी भाजप श्रेष्ठी काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली. रावसाहेब दानवे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र आता या नियुक्तीवरुन किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या यांनी म्हटलं. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. त्यावेळी तीन वेळा माझा वर जीवघेणे हल्ले झाले, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.  

धावत्या शिवशाही बसने अचानक घेतला पेट:वाहक चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

धावत्या शिवशाही बसने अचानक घेतला पेट:वाहक चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील वाढेफाटा येथे शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यावेळी बसमध्ये 21 प्रवासी होते. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारस ही घटना घडली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या सांगली आगराची एमएच 06 बीडब्ल्यू 3722 – स्वारगेट-सांगली ही शिवशाही बस सांगलीकडे निघाली होती. दोनच्या सुमारास ही बस सातारा जिल्ह्यातील वाढेफाटा येथे आली असताना अचानक बसमधून धूर येऊ लागला. धूर येत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर लगेचच बस संपूर्णपणे आगीच्या चपट्यात आली. संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक तातडीने सुरळीत केली. तसेच या घटनेची माहिती कळताच महामंडळाच्या सातारा विभागातील अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या बसमधील प्रवाशांची दुसऱ्या वाहनातून सोय करण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास यंत्र अभियंता विकास माने तपास करत आहेत.

​पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील वाढेफाटा येथे शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यावेळी बसमध्ये 21 प्रवासी होते. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारस ही घटना घडली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या सांगली आगराची एमएच 06 बीडब्ल्यू 3722 – स्वारगेट-सांगली ही शिवशाही बस सांगलीकडे निघाली होती. दोनच्या सुमारास ही बस सातारा जिल्ह्यातील वाढेफाटा येथे आली असताना अचानक बसमधून धूर येऊ लागला. धूर येत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर लगेचच बस संपूर्णपणे आगीच्या चपट्यात आली. संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक तातडीने सुरळीत केली. तसेच या घटनेची माहिती कळताच महामंडळाच्या सातारा विभागातील अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या बसमधील प्रवाशांची दुसऱ्या वाहनातून सोय करण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास यंत्र अभियंता विकास माने तपास करत आहेत.  

पंखा अंगावर पडून बसला विजेचा धक्का:नेपाळी गुरख्याचा जागीच मृत्यू

पंखा अंगावर पडून बसला विजेचा धक्का:नेपाळी गुरख्याचा जागीच मृत्यू

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गणेशनगर भागात पंखा अंगावर पडून विजेचा धक्का लागल्याने नेपाळी गुरख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जंक उर्फ जनक गोरे (रा. लकीचुआ, जि. कैलाली राज्य नेपाळ) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंक उर्फ जनक हे मागील काही वर्षापासून कुरुंदा येथे गुराखी म्हणून काम करतात. रात्रभर गणेशनगर परिसरात रखवाली करून दिवसाच्या वेळी आराम करतात. गणेशनगर भागातच त्यांची एक खोली आहे. या खोलीमध्ये मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी आले होते. त्यामुळे जमीनीवर ओल होती. दरम्यान, सोमवारी ता. ९ सकाळी त्यांनी टेबल पंखा लाऊन जमीनीवरच झोपी गेले. यावेळी त्यांच्या अंगावर पंखा पडला. त्यामुळे तुटलेल्या विज वाहिन्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला अन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वसमत येथे काम करणारे त्यांचे भाऊ त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करीत होते. मात्र त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी त्यांनी गणेशनगर येथे येऊन खोलाचा दरवाजा वाजविला. मात्र आतून कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीवरील टीनपत्रावर जाऊन पाहिले असता जंक उर्फ जनक यांचा मृतदेह जमीनीवर पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार बालाजी जोगदंड यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. मृतदेहावर कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी बिनोद गोरे बिस्ट यांनी दिलेल्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १० अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार जोगदंड पुढील तपास करीत आहेत.

​वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गणेशनगर भागात पंखा अंगावर पडून विजेचा धक्का लागल्याने नेपाळी गुरख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जंक उर्फ जनक गोरे (रा. लकीचुआ, जि. कैलाली राज्य नेपाळ) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंक उर्फ जनक हे मागील काही वर्षापासून कुरुंदा येथे गुराखी म्हणून काम करतात. रात्रभर गणेशनगर परिसरात रखवाली करून दिवसाच्या वेळी आराम करतात. गणेशनगर भागातच त्यांची एक खोली आहे. या खोलीमध्ये मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी आले होते. त्यामुळे जमीनीवर ओल होती. दरम्यान, सोमवारी ता. ९ सकाळी त्यांनी टेबल पंखा लाऊन जमीनीवरच झोपी गेले. यावेळी त्यांच्या अंगावर पंखा पडला. त्यामुळे तुटलेल्या विज वाहिन्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला अन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वसमत येथे काम करणारे त्यांचे भाऊ त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करीत होते. मात्र त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी त्यांनी गणेशनगर येथे येऊन खोलाचा दरवाजा वाजविला. मात्र आतून कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीवरील टीनपत्रावर जाऊन पाहिले असता जंक उर्फ जनक यांचा मृतदेह जमीनीवर पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार बालाजी जोगदंड यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. मृतदेहावर कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी बिनोद गोरे बिस्ट यांनी दिलेल्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १० अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार जोगदंड पुढील तपास करीत आहेत.  

शिंदे गट बदनाम झालाय:अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकला प्रकरणी अमोल मिटकरींची टीका

शिंदे गट बदनाम झालाय:अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकला प्रकरणी अमोल मिटकरींची टीका

महायुतीमधील आनंतर्गत वाद सातत्याने पुढे येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुद्ध सुरूच असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून दोन्ही पक्षातील नेते व कार्यकरते नेहमीच आमनेसामने येताना दिसत आहेत. आता बारामतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, प्रत्येक पक्षात हवसे-नवसे-गवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असेल. प्रकाश झोतात राहायचे होते म्हणून दादांनी आम्हाला वेळ दिला नाही हे कारण पुढे करत काळा कपडा टाकल्याचे अमोल मिटकरी म्हणाले आहेत. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळ भेटला नसेल. काळा कपडा टाकून ठेवला म्हणजे बारामतीचा विकास झाकला असे नाही. काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्यासारखा हा प्रकार आहे. काळे झेंडे दाखवणारे आणि आजचा हा प्रकार करणारे हौसे कार्यकर्ते, त्यांच्या या वागण्याने त्यांच्याच पक्षाची प्रतिमा मलिन होते. आजच्या या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झाला आहे. पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, तिन्ही पक्षात एकवाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळे वरिष्ठांनी अशांना सक्त तंबी दिली पाहिजे. आमच्याही भावना आहेत, भावनांचा उद्रेक झाल्यास मोठा विध्वंस होणार, असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला आहे. नेमके प्रकरण काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने बारामतीमध्ये गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. मात्र या फेस्टिव्हलला अजित पवारांनी भेट न देऊ शकल्याने शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांचा फोटो काळा कपडा लावून झाकला. सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली होती, मात्र अजित पवारांनी बारामतीमधील इतर छोट्या मोठ्या गणपती मंडळांनाभेटी दिल्या, पण एकनाथ फेस्टिव्हलला ते आले नाहीत. यामुळे सुरेंद्र जेवरे यांनी हे पाऊल उचलले. या प्रकारानंतर सुरेंद्र जेवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

​महायुतीमधील आनंतर्गत वाद सातत्याने पुढे येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुद्ध सुरूच असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून दोन्ही पक्षातील नेते व कार्यकरते नेहमीच आमनेसामने येताना दिसत आहेत. आता बारामतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, प्रत्येक पक्षात हवसे-नवसे-गवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असेल. प्रकाश झोतात राहायचे होते म्हणून दादांनी आम्हाला वेळ दिला नाही हे कारण पुढे करत काळा कपडा टाकल्याचे अमोल मिटकरी म्हणाले आहेत. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळ भेटला नसेल. काळा कपडा टाकून ठेवला म्हणजे बारामतीचा विकास झाकला असे नाही. काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्यासारखा हा प्रकार आहे. काळे झेंडे दाखवणारे आणि आजचा हा प्रकार करणारे हौसे कार्यकर्ते, त्यांच्या या वागण्याने त्यांच्याच पक्षाची प्रतिमा मलिन होते. आजच्या या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झाला आहे. पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, तिन्ही पक्षात एकवाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळे वरिष्ठांनी अशांना सक्त तंबी दिली पाहिजे. आमच्याही भावना आहेत, भावनांचा उद्रेक झाल्यास मोठा विध्वंस होणार, असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला आहे. नेमके प्रकरण काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने बारामतीमध्ये गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. मात्र या फेस्टिव्हलला अजित पवारांनी भेट न देऊ शकल्याने शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांचा फोटो काळा कपडा लावून झाकला. सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली होती, मात्र अजित पवारांनी बारामतीमधील इतर छोट्या मोठ्या गणपती मंडळांनाभेटी दिल्या, पण एकनाथ फेस्टिव्हलला ते आले नाहीत. यामुळे सुरेंद्र जेवरे यांनी हे पाऊल उचलले. या प्रकारानंतर सुरेंद्र जेवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  

लहान मुलाच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चैन पळवली:पुणे शहरात चार ठिकाणी जबरी चोरी

लहान मुलाच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चैन पळवली:पुणे शहरात चार ठिकाणी जबरी चोरी

पुणे शहरात जबरी चोरीच्या घटना वाढत आहेत. एकीकडे पोलिस रस्त्यावरील गस्त वाढविल्याचे सांगतात. मात्र त्यांच्या गस्तीला जबरी चोरी करणारे चोरटे जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात चार ठिकाणच्या जबरी चोरीत १ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. पहिल्या घटनेत, खरेदी करुन घरी परत येणार्‍या महिलेच्या गळ्यातील १ लाख ५ हजारांचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कर्वेनगर भागात राहणार्‍या ६० वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला खरेदी करुन घरी परत निघाल्या होत्या. त्यावेळी कॅनल रस्त्यावरील भाजी मंडई चौका जवळ कर्वेनगर येथे आल्या असता पाठिमागून आलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन पळविले. दुसर्‍या घटनेत, प्रार्थना करुन येणार्‍या लहान मुलाच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चैन पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मानाजीबाग बोपोडी भागात राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिल्या या आई आणि आपल्या एका वर्षांच्या मुलासह खडकी येथील चर्च मध्ये गेल्या होत्या. गेटमधुन बाहेर पडताना फिर्यादी यांच्या आईने लहान मुलाला कडेवरती घेतले होते. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या आजूबाजूला गर्दी करत मुलाच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चैक हिसकावल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तिसर्‍या घटनेत, या एरियाचा भाई आहे म्हणत कोयत्याच्या धाकाने खिशातील ५ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भीमाशंकर बसवराज भंडारी (वय ५५, रा. मुंढवा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमोल जिवराज पिल्ले (रा. लक्ष्मीनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत, मुलीच्या गळ्यातील ६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण भागात राहणार्‍या २८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शांताबाई म्हसू पवार (वय ४९, रा. मोरे वस्ती, निगडी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या तीन साथिदांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला माळवाडी रस्त्यावरील आर्य रसवंती गृह हडपसर येथे मुलीसोबत थांबल्या होत्या. यावेळी महिला आरोपी शांताबाई यांनी साथिदाराच्या मदतीने फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने पळविले. फिर्यादी महिलेने आरडाओरड केली असता उपस्थित नागरिकांनी चोरट्या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

​पुणे शहरात जबरी चोरीच्या घटना वाढत आहेत. एकीकडे पोलिस रस्त्यावरील गस्त वाढविल्याचे सांगतात. मात्र त्यांच्या गस्तीला जबरी चोरी करणारे चोरटे जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात चार ठिकाणच्या जबरी चोरीत १ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. पहिल्या घटनेत, खरेदी करुन घरी परत येणार्‍या महिलेच्या गळ्यातील १ लाख ५ हजारांचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कर्वेनगर भागात राहणार्‍या ६० वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला खरेदी करुन घरी परत निघाल्या होत्या. त्यावेळी कॅनल रस्त्यावरील भाजी मंडई चौका जवळ कर्वेनगर येथे आल्या असता पाठिमागून आलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन पळविले. दुसर्‍या घटनेत, प्रार्थना करुन येणार्‍या लहान मुलाच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चैन पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मानाजीबाग बोपोडी भागात राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिल्या या आई आणि आपल्या एका वर्षांच्या मुलासह खडकी येथील चर्च मध्ये गेल्या होत्या. गेटमधुन बाहेर पडताना फिर्यादी यांच्या आईने लहान मुलाला कडेवरती घेतले होते. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या आजूबाजूला गर्दी करत मुलाच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चैक हिसकावल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तिसर्‍या घटनेत, या एरियाचा भाई आहे म्हणत कोयत्याच्या धाकाने खिशातील ५ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भीमाशंकर बसवराज भंडारी (वय ५५, रा. मुंढवा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमोल जिवराज पिल्ले (रा. लक्ष्मीनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत, मुलीच्या गळ्यातील ६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण भागात राहणार्‍या २८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शांताबाई म्हसू पवार (वय ४९, रा. मोरे वस्ती, निगडी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या तीन साथिदांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला माळवाडी रस्त्यावरील आर्य रसवंती गृह हडपसर येथे मुलीसोबत थांबल्या होत्या. यावेळी महिला आरोपी शांताबाई यांनी साथिदाराच्या मदतीने फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने पळविले. फिर्यादी महिलेने आरडाओरड केली असता उपस्थित नागरिकांनी चोरट्या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.