Category: marathi

मोटार वाहन विभागातील कर्मचारी जाणार संपावर:सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी, 24 सप्टेंबरपासून करणार बेमुदत संप

मोटार वाहन विभागातील कर्मचारी जाणार संपावर:सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी, 24 सप्टेंबरपासून करणार बेमुदत संप

मोटार वाहन विभागासाठी महाराष्ट्र शासनाने 23 सप्टेंबर 2022 रोजी सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय पारीत केला आहे. दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे तरी सदर आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे राज्यातील मोटार वाहन विभागातील सर्व कर्मचारी भयभीत व भवितव्याबाबत चिंतित झाली आहेत. याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात राज्यातील सर्व मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकरणार आहेत. याबाबत त्यांनी राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आकृतीबंधाची योग्यरित्यापूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी न करता कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरेल तसे शासनाच्या निर्णयास छेद देणाऱ्या महसूल विभागीय बदल्यास संघटनेने तीव्र विरुद्ध दर्शवला आहे असे असतानाही प्रशासनाने नुकताच महसूल विभाग स्तरावर बदल्या केल्या आहेत त्यामुळे कर्मचारी संपल झाले आहेत विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने गठीत केलेल्या कळस्कर समितीचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्रशासनात सादर केला आहे त्या अहवालाची अंमलबजावणी अध्याप न झाल्याने राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये एकच प्रकारचे काम वेगळ्या तऱ्हेने केल्या जाते त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे सचिव आयुक्त स्तरावर संघटनेने सतत संपर्क करून प्रलंबित मागण्याबाबत वेळ चर्चा ची वेळ मागितली याबाबत प्रश्न डोळे झाक केल्यामुळे जिव्हाळ्याच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासकीय स्तरावरील विविध पदांचे सेवा प्रवेश नियम गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात निर्णयाविना पडून आहे, परिवहन प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही उचित कारवाई होत नसल्यामुळे सेवा प्रवेश नियम प्रलंबित राहिले आहेत. मंजूर आकृतीबंधानुसार निरसिद्ध झालेल्या पदावरील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनाकालीनियरित्या विभागीय परीक्षेचे बंधन घालण्यात येत आहे. ते अन्याय करणारे आहे. बदल्यासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत किंवा त्यांच्या कार्यभारात बदल होत नाहीत. याबाबत कर्मचाऱ्यांची कमालयाची नाराजी आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली.

​मोटार वाहन विभागासाठी महाराष्ट्र शासनाने 23 सप्टेंबर 2022 रोजी सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय पारीत केला आहे. दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे तरी सदर आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे राज्यातील मोटार वाहन विभागातील सर्व कर्मचारी भयभीत व भवितव्याबाबत चिंतित झाली आहेत. याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात राज्यातील सर्व मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकरणार आहेत. याबाबत त्यांनी राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आकृतीबंधाची योग्यरित्यापूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी न करता कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरेल तसे शासनाच्या निर्णयास छेद देणाऱ्या महसूल विभागीय बदल्यास संघटनेने तीव्र विरुद्ध दर्शवला आहे असे असतानाही प्रशासनाने नुकताच महसूल विभाग स्तरावर बदल्या केल्या आहेत त्यामुळे कर्मचारी संपल झाले आहेत विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने गठीत केलेल्या कळस्कर समितीचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्रशासनात सादर केला आहे त्या अहवालाची अंमलबजावणी अध्याप न झाल्याने राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये एकच प्रकारचे काम वेगळ्या तऱ्हेने केल्या जाते त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे सचिव आयुक्त स्तरावर संघटनेने सतत संपर्क करून प्रलंबित मागण्याबाबत वेळ चर्चा ची वेळ मागितली याबाबत प्रश्न डोळे झाक केल्यामुळे जिव्हाळ्याच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासकीय स्तरावरील विविध पदांचे सेवा प्रवेश नियम गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात निर्णयाविना पडून आहे, परिवहन प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही उचित कारवाई होत नसल्यामुळे सेवा प्रवेश नियम प्रलंबित राहिले आहेत. मंजूर आकृतीबंधानुसार निरसिद्ध झालेल्या पदावरील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनाकालीनियरित्या विभागीय परीक्षेचे बंधन घालण्यात येत आहे. ते अन्याय करणारे आहे. बदल्यासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत किंवा त्यांच्या कार्यभारात बदल होत नाहीत. याबाबत कर्मचाऱ्यांची कमालयाची नाराजी आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली.  

‘दगडूशेठ’च्या दर्शनाला ‘मंगलमुखी’ तृतीयपंथी:अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी केली श्रीं ची आरती

‘दगडूशेठ’च्या दर्शनाला ‘मंगलमुखी’ तृतीयपंथी:अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी केली श्रीं ची आरती

सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नर परिवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आला आहे. भारतामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न मोठा आहे. त्यामुळे याकरिता आम्ही बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे की बाप्पाने त्यांना संरक्षण कवच द्यावे. दरवर्षी आम्हाला आरतीचा मान मिळतो आहे, तो दरवर्षी मिळत रहावा, अशी इच्छा किन्नर परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली. केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते. चेंदा हे केरळ राज्यात उगम पावणारे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे सांस्कृतिक घटक म्हणून देखील परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखले जाते.

​सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नर परिवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आला आहे. भारतामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न मोठा आहे. त्यामुळे याकरिता आम्ही बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे की बाप्पाने त्यांना संरक्षण कवच द्यावे. दरवर्षी आम्हाला आरतीचा मान मिळतो आहे, तो दरवर्षी मिळत रहावा, अशी इच्छा किन्नर परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली. केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते. चेंदा हे केरळ राज्यात उगम पावणारे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे सांस्कृतिक घटक म्हणून देखील परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखले जाते.  

​​​​​​​मद्यधुंद अवस्थेत शाळेत येणे गुरुजीला पडले महागात:​​​​​​​​​​​​​​माळसेलू जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

​​​​​​​मद्यधुंद अवस्थेत शाळेत येणे गुरुजीला पडले महागात:​​​​​​​​​​​​​​माळसेलू जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यधुंद अवस्थेत येणे शिक्षकाला चांगलेच महागात पडले असून संबंधित शिक्षकाला मंगळवारी ता १० तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी काढले आहेत. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गजानन वडकुते हे सोमवारी ता ९ मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले होते. त्यांनी एका गावकऱ्यासोबत शिवीगाळ देखील केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सदर शिक्षक शाळेत आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने कधी दारु पिल्याची कबुली दिली तर कधी आपण दारु पिलोच नाही असे सांगत हातवर केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार आज गटशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांनी सविस्तर अहवाल सादर केला. तसेच गावकऱ्यांचे म्हणणे व छायाचित्रीकरण देखील सोबत जोडले होते. या प्रकरणात शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षक वडकुते यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी शिक्षक गजानन वडकुते यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश आज करण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे

​हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यधुंद अवस्थेत येणे शिक्षकाला चांगलेच महागात पडले असून संबंधित शिक्षकाला मंगळवारी ता १० तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी काढले आहेत. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गजानन वडकुते हे सोमवारी ता ९ मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले होते. त्यांनी एका गावकऱ्यासोबत शिवीगाळ देखील केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सदर शिक्षक शाळेत आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने कधी दारु पिल्याची कबुली दिली तर कधी आपण दारु पिलोच नाही असे सांगत हातवर केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार आज गटशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांनी सविस्तर अहवाल सादर केला. तसेच गावकऱ्यांचे म्हणणे व छायाचित्रीकरण देखील सोबत जोडले होते. या प्रकरणात शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षक वडकुते यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी शिक्षक गजानन वडकुते यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश आज करण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे  

रिपाइंला विधानसभेत योग्य प्रतिनिधित्व द्या:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी; महायुतीला फायदा होईल असा दावा

रिपाइंला विधानसभेत योग्य प्रतिनिधित्व द्या:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी; महायुतीला फायदा होईल असा दावा

लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केला. रामदास आठवले यांनी पुण्यातील व्हिआयपी विश्रामगृहात एक पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, गौतम सोनवणे, शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, श्याम सदाफुले, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, वसंत बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रामदास आठवले पुढे म्हणाले की, सध्या पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा सर्व धर्मीयांच्या एकतेचे आज प्रतीक बनला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशातील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे आज देशातील २५ कोटी लोकांना आम्ही गरीबीच्या बाहेर आणू शकलो. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही १३ हजार कोटी रुपये आजवर दिलेले आहेत. दहा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एसी-एसटीच्या उमेदवारांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले आहे. आठवले यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा प्राप्त झाल्या नाहीत. संविधान बदलाचा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे जनतेत एक वेगळा संदेश गेला. तसेच मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे दिसून येईल. दरम्यान, इंदू मिल येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारक पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. हे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्नशील आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हे स्मारक पूर्ण झालेले सर्वांना दिसून येईल. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठे रणकंदन होते आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण प्राप्त व्हावे, ही केंद्र व राज्य सरकारची खूप इच्छा आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उठसूठ आंदोलनाची धमकी देण्याऐवजी त्यांनी सरकारला योग्य ते सहकार्य करावे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंच्या वतीने महायुतीतील पक्षांकडे १२ जागांची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पूर्ण करावी, त्याचे कारण हे की, रिपाइंमुळे महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे या सर्व पक्षांनी आपापल्या कोट्यातील चार-चार जागा आम्हाला द्याव्या, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

​लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केला. रामदास आठवले यांनी पुण्यातील व्हिआयपी विश्रामगृहात एक पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, गौतम सोनवणे, शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, श्याम सदाफुले, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, वसंत बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रामदास आठवले पुढे म्हणाले की, सध्या पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा सर्व धर्मीयांच्या एकतेचे आज प्रतीक बनला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशातील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे आज देशातील २५ कोटी लोकांना आम्ही गरीबीच्या बाहेर आणू शकलो. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही १३ हजार कोटी रुपये आजवर दिलेले आहेत. दहा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एसी-एसटीच्या उमेदवारांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले आहे. आठवले यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा प्राप्त झाल्या नाहीत. संविधान बदलाचा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे जनतेत एक वेगळा संदेश गेला. तसेच मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे दिसून येईल. दरम्यान, इंदू मिल येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारक पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. हे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्नशील आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हे स्मारक पूर्ण झालेले सर्वांना दिसून येईल. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठे रणकंदन होते आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण प्राप्त व्हावे, ही केंद्र व राज्य सरकारची खूप इच्छा आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उठसूठ आंदोलनाची धमकी देण्याऐवजी त्यांनी सरकारला योग्य ते सहकार्य करावे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंच्या वतीने महायुतीतील पक्षांकडे १२ जागांची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पूर्ण करावी, त्याचे कारण हे की, रिपाइंमुळे महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे या सर्व पक्षांनी आपापल्या कोट्यातील चार-चार जागा आम्हाला द्याव्या, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.  

भाजप – राष्ट्रवादीत 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत?:भाजपने प्रस्ताव ठेवल्याचा आमदार रवी राणा यांचा दावा; सत्ताधारी महायुतीत वाद

भाजप – राष्ट्रवादीत 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत?:भाजपने प्रस्ताव ठेवल्याचा आमदार रवी राणा यांचा दावा; सत्ताधारी महायुतीत वाद

सत्ताधारी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसपुढे राज्यातील 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीत जागावाटपाच्या मुद्यावरून मोठे मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. रवी राणा यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपने राष्ट्रवादीपुढे ठेवलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. रवी राणा म्हणाले की, ज्या ठिकाणी तिन्ही सत्ताधारी पक्षाचे मजबूत उमेदवार आहेत, त्या ठिकाणी इच्छुकांना थांबवल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे भाजपने ज्या 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे, तो अजित पवारांनी स्विकारला पाहिजे. अजित पवारांनी आपल्या उमेदवारांमध्ये जेवढा दम आहे, तेवढेच उमेदवार निवडणुकीमध्ये उतरावेत. भाजपचेही निवडणुकीत दमदार उमेदवार उतरतील. दमदार उमेदवारांना थांबवले तर महायुतीचेच नुकसान होईल. फडणवीसांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब रवी राणा पुढे म्हणाले, भाजपने ज्या 25 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे त्यात अमरावती शहर मतदारसंघाचा समावेश आहे. बडनेरा मतदारसंघात मी स्वतः महायुतीचा उमेदवार आहे. माझ्या उमेदवारीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मी माझ्या युवा स्वाभिमान पक्षाकडून लढणार आहे. पाना हे माझे निवडणूक चिन्ह आहे. मी माझ्या पक्षासाठी महायुतीकडे 5 ते 6 जागा मागितल्या आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप कायम दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपाचे कोडे अजूनही सुटले नाही. मुंबईच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यात त्यांनी जागावाटपाच्या मुद्यावर प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपला स्ट्राईक रेट सर्वात चांगला असल्याचा दावा करत 126 जागांची मागणी केली. पण स्वतः भाजपलाही 150 हून अधिक जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 85 जागा देण्याच्या मुद्यावर सकारात्मक विचार होऊ शकतो. याऊलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 50 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे अजित पवारांना वाढीव जागा देण्यास अमित शहा फारसे अनुकूल नाहीत अशी चर्चा आहे. अजित पवार एकला चलो रेची भूमिका घेणार? उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपकडून अजित पवारांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे निर्देश दिले जाण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडी व महायुतीपासून अंतर राखून निवडणूक लढवली तर विरोधी मत विखुरले जाईल. यामुळे महाराष्ट्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे भाजपच्या नेत्यांना वाटते. पण अजित पवार स्वगृही म्हणजे शरद पवारांकडे परतले किंवा महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरले तर मात्र हा डाव उलट पडण्याची भीती आहे. त्यामुळे अजित पवार स्वतःच एकला चलो रेचा नारा देतात की भाजप किंवा महायुतीसोबतच निवडणुकीच्या मैदानात उतरतात याचे उत्तर भविष्यकाळातच मिळणार आहे.

​सत्ताधारी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसपुढे राज्यातील 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीत जागावाटपाच्या मुद्यावरून मोठे मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. रवी राणा यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपने राष्ट्रवादीपुढे ठेवलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. रवी राणा म्हणाले की, ज्या ठिकाणी तिन्ही सत्ताधारी पक्षाचे मजबूत उमेदवार आहेत, त्या ठिकाणी इच्छुकांना थांबवल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे भाजपने ज्या 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे, तो अजित पवारांनी स्विकारला पाहिजे. अजित पवारांनी आपल्या उमेदवारांमध्ये जेवढा दम आहे, तेवढेच उमेदवार निवडणुकीमध्ये उतरावेत. भाजपचेही निवडणुकीत दमदार उमेदवार उतरतील. दमदार उमेदवारांना थांबवले तर महायुतीचेच नुकसान होईल. फडणवीसांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब रवी राणा पुढे म्हणाले, भाजपने ज्या 25 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे त्यात अमरावती शहर मतदारसंघाचा समावेश आहे. बडनेरा मतदारसंघात मी स्वतः महायुतीचा उमेदवार आहे. माझ्या उमेदवारीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मी माझ्या युवा स्वाभिमान पक्षाकडून लढणार आहे. पाना हे माझे निवडणूक चिन्ह आहे. मी माझ्या पक्षासाठी महायुतीकडे 5 ते 6 जागा मागितल्या आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप कायम दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपाचे कोडे अजूनही सुटले नाही. मुंबईच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यात त्यांनी जागावाटपाच्या मुद्यावर प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपला स्ट्राईक रेट सर्वात चांगला असल्याचा दावा करत 126 जागांची मागणी केली. पण स्वतः भाजपलाही 150 हून अधिक जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 85 जागा देण्याच्या मुद्यावर सकारात्मक विचार होऊ शकतो. याऊलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 50 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे अजित पवारांना वाढीव जागा देण्यास अमित शहा फारसे अनुकूल नाहीत अशी चर्चा आहे. अजित पवार एकला चलो रेची भूमिका घेणार? उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपकडून अजित पवारांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे निर्देश दिले जाण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडी व महायुतीपासून अंतर राखून निवडणूक लढवली तर विरोधी मत विखुरले जाईल. यामुळे महाराष्ट्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे भाजपच्या नेत्यांना वाटते. पण अजित पवार स्वगृही म्हणजे शरद पवारांकडे परतले किंवा महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरले तर मात्र हा डाव उलट पडण्याची भीती आहे. त्यामुळे अजित पवार स्वतःच एकला चलो रेचा नारा देतात की भाजप किंवा महायुतीसोबतच निवडणुकीच्या मैदानात उतरतात याचे उत्तर भविष्यकाळातच मिळणार आहे.  

ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल का?:नागपूर हिट अँड रन प्रकरणी विजय वडेट्टीवारांनी साधला बावनकुळेंवर निशाणा

ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल का?:नागपूर हिट अँड रन प्रकरणी विजय वडेट्टीवारांनी साधला बावनकुळेंवर निशाणा

नागपूर हिट अँड रन प्रकरणातील ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांची होती. एवढेच नव्हे तर अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मालकांनी लोकांचा जीव घ्यायचा आणि ड्रायव्हरवर नाव टाकायचे. काम करणारा कर्मचारी असेल, चालक असेल यांना बळीचा बकरा बनवायचे आणि आरोपींना मोकाट सोडायचे. दीडशेच्या स्पीडने गाडी होती. नशिबाने लोकांचा जीव गेला नाही, नाहीतर दहा वीस लोकांचा जीव गेला असता. यामध्ये स्पष्ट झाले आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांनी तर यांनी तर दोन लोकांचा जीव घेतला, भरधाव गाडी चालवून. यांना पैशांचा माज आलेला आहे, सत्तेचा माज एवढा आलेला आहे. यांना लोकांच्या जिवाची परवा नाही, लोक मेली काय आणि गेली काय, यांना काही देणे घेणे राहिले नाही. मला कीव येते मुलगा गाडी चालवत होता, जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता तर जगातला कोणी मूर्ख माणूस आहे काय की नंबर प्लेट काढून गाडीमध्ये ठेवेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, यावरून स्पष्ट दिसते की पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घातले. म्हणजे मुलगा दारू प्यायलेला नव्हता, ड्रायव्हर दारू पिऊन होता तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडीमध्ये ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल? वडिलांनी स्पष्ट केले आहे की गाडी मुलाच्या नावावर आहे, मग आरोपी मुलगा नाही? विजय वडेट्टीवार म्हणाले, याचा व्यवस्थित तपास व्हावा, सीसीटीव्ही फूटेज तपासवेत, कुठल्या बारमध्ये बसला होता या सगळ्या गोष्टींचा तपास करावा. बदलापूरसारखे इथले पण सीसीटीव्ही फूटेज गायब करतील नाहीतर. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, या सर्व घटनेचा निष्पक्ष तपास करण्यात यावा. बावनकुळे यांच्या मुलाच्या रक्ताचे नमुने पोलिसांना गायब करण्यात यश आले आहे. याचा अर्थ पोलिस आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट आहे. याचा व्यवस्थित तपास करण्यात यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.

​नागपूर हिट अँड रन प्रकरणातील ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांची होती. एवढेच नव्हे तर अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मालकांनी लोकांचा जीव घ्यायचा आणि ड्रायव्हरवर नाव टाकायचे. काम करणारा कर्मचारी असेल, चालक असेल यांना बळीचा बकरा बनवायचे आणि आरोपींना मोकाट सोडायचे. दीडशेच्या स्पीडने गाडी होती. नशिबाने लोकांचा जीव गेला नाही, नाहीतर दहा वीस लोकांचा जीव गेला असता. यामध्ये स्पष्ट झाले आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांनी तर यांनी तर दोन लोकांचा जीव घेतला, भरधाव गाडी चालवून. यांना पैशांचा माज आलेला आहे, सत्तेचा माज एवढा आलेला आहे. यांना लोकांच्या जिवाची परवा नाही, लोक मेली काय आणि गेली काय, यांना काही देणे घेणे राहिले नाही. मला कीव येते मुलगा गाडी चालवत होता, जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता तर जगातला कोणी मूर्ख माणूस आहे काय की नंबर प्लेट काढून गाडीमध्ये ठेवेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, यावरून स्पष्ट दिसते की पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घातले. म्हणजे मुलगा दारू प्यायलेला नव्हता, ड्रायव्हर दारू पिऊन होता तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडीमध्ये ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल? वडिलांनी स्पष्ट केले आहे की गाडी मुलाच्या नावावर आहे, मग आरोपी मुलगा नाही? विजय वडेट्टीवार म्हणाले, याचा व्यवस्थित तपास व्हावा, सीसीटीव्ही फूटेज तपासवेत, कुठल्या बारमध्ये बसला होता या सगळ्या गोष्टींचा तपास करावा. बदलापूरसारखे इथले पण सीसीटीव्ही फूटेज गायब करतील नाहीतर. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, या सर्व घटनेचा निष्पक्ष तपास करण्यात यावा. बावनकुळे यांच्या मुलाच्या रक्ताचे नमुने पोलिसांना गायब करण्यात यश आले आहे. याचा अर्थ पोलिस आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट आहे. याचा व्यवस्थित तपास करण्यात यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.  

सत्ताधारी महायुतीतील धुसफूस कायम:भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब; फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख

सत्ताधारी महायुतीतील धुसफूस कायम:भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब; फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख

सत्ताधारी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या एका बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाला आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. पण अजित पवारांचे नाही. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यभरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना आता या योजनेचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिमेचा शुभारंभ केला. या पार्श्वभूमीवर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकही फोटो या बॅनरवर दिसत नाही. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळातही खमंग चर्चा रंगली आहे. या बॅनरवर फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ म्हणून करण्यात आला आहे. ‘देवाभाऊ, लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला’, असे त्यावर नमूद आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केलेल्या एका व्हिडिओ जाहिरातीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख ‘अजितदादांची लाडकी बहीण’ योजना असा केला होता. यामुळे अगोदरच महायुतीत वाद पेटला होता. त्यात आता भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

NCP च्या जाहिरातीत ‘अजितदादांची लाडकी बहीण’ असा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हा शब्द वगळून दादाचा वादा अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. विशेषतः या जाहिरातीत त्यांनी अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेखही केला आहे. या जाहिरातीत महायुतीच्या इतर नेत्यांना स्थान न देता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांचा उल्लेख आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आक्षेप घेतला होता. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी या जाहिरातीमुळे मतदारांत महायुतीसंबंधी गैरसमज निर्माण होण्याची भीती व्यक्त केली होती. अजितदादा गटाच्या या कृतीमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचे आपल्या नेत्यावरील प्रेम समजू शकते. पण एखादी योजना किंवा घोषणेला सर्वांनी साथ दिली पाहिजे. अर्थमंत्री व गृहमंत्री यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. या प्रकरणी अजित पवारांचेही श्रेय आहे. पण सोबतच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचेही आहे. राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली. त्यामुळे राष्ट्रवादीने आपापल्या मतदारसंघात या योजनेचा प्रचार करताना अजित पवारांचा फोटो लावावा, पण महायुतीच्या इतर नेत्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे संजय शिरसाट म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळले होते आरोप दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे हे आरोप फेटाळून लावलेत. प्रस्तुत जाहिरातीत आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. केंद्राच्या अनेक योजना पंतप्रधानांच्या नावे असतात. तशा राज्यातील योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने असतात. या जाहिरातीत लाडकी बहीण योजनेचा शॉर्टफॉर्म वापरण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून ही योजना सादर केली, असा युक्तिवाद राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.

​सत्ताधारी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या एका बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाला आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. पण अजित पवारांचे नाही. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यभरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना आता या योजनेचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिमेचा शुभारंभ केला. या पार्श्वभूमीवर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकही फोटो या बॅनरवर दिसत नाही. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळातही खमंग चर्चा रंगली आहे. या बॅनरवर फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ म्हणून करण्यात आला आहे. ‘देवाभाऊ, लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला’, असे त्यावर नमूद आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केलेल्या एका व्हिडिओ जाहिरातीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख ‘अजितदादांची लाडकी बहीण’ योजना असा केला होता. यामुळे अगोदरच महायुतीत वाद पेटला होता. त्यात आता भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

NCP च्या जाहिरातीत ‘अजितदादांची लाडकी बहीण’ असा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हा शब्द वगळून दादाचा वादा अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. विशेषतः या जाहिरातीत त्यांनी अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेखही केला आहे. या जाहिरातीत महायुतीच्या इतर नेत्यांना स्थान न देता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांचा उल्लेख आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आक्षेप घेतला होता. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी या जाहिरातीमुळे मतदारांत महायुतीसंबंधी गैरसमज निर्माण होण्याची भीती व्यक्त केली होती. अजितदादा गटाच्या या कृतीमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचे आपल्या नेत्यावरील प्रेम समजू शकते. पण एखादी योजना किंवा घोषणेला सर्वांनी साथ दिली पाहिजे. अर्थमंत्री व गृहमंत्री यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. या प्रकरणी अजित पवारांचेही श्रेय आहे. पण सोबतच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचेही आहे. राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली. त्यामुळे राष्ट्रवादीने आपापल्या मतदारसंघात या योजनेचा प्रचार करताना अजित पवारांचा फोटो लावावा, पण महायुतीच्या इतर नेत्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे संजय शिरसाट म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळले होते आरोप दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे हे आरोप फेटाळून लावलेत. प्रस्तुत जाहिरातीत आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. केंद्राच्या अनेक योजना पंतप्रधानांच्या नावे असतात. तशा राज्यातील योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने असतात. या जाहिरातीत लाडकी बहीण योजनेचा शॉर्टफॉर्म वापरण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून ही योजना सादर केली, असा युक्तिवाद राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.  

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण:मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील याला 13 सप्टेंबर पर्यंत कोठडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण:मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील याला 13 सप्टेंबर पर्यंत कोठडी

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयाने आता 13 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वास्तविक आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन पाटील हा दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. वास्तविक चेतन पाटील याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, आता नवीन कायद्यानुसार चेतन पाटील याची चौकशी करायची असेल तेव्हा, न्यायालयाच्या आदेशाने पोलिस त्याला ताब्यात घेऊ शकतात. या प्रकरावरुन राज्यभरातू संताप व्यक्त केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला होता. वास्तविक या प्रकरणातील मुख आरोपी जयदीप आपटे हा विसंगत माहिती देत असून त्यामुळे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजेच 13 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला 10 दिवसानंतर अटक करण्यात आली होती. कल्याणच्या घरी कुटुंबीयांना भेटण्यास आला असता पोलिसांनी त्याला अटक केली होती. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता, याचे कंत्राट ठाणे येथील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. मात्र जयदीप आपटे याला केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता, तरी देखील याला कंत्राट का दिले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले

पोलिसांनी जयदीप आपटे तसेच स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. पुतळा उभारणीचे काम ठाण्यातील कंपनीने केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जयदीप आपटे कोण आहे? जयदीप आपटे हा कल्याण येथील 25 वर्षीय तरुण आहे. याच तरुणाने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्रॉंझचा पुतळा उभारला होता. मात्र जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. 28 फुट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी किमान 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे फक्त 7 महिन्यात काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे याने एका मुलाखतीत दिली होती.

​मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयाने आता 13 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वास्तविक आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन पाटील हा दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. वास्तविक चेतन पाटील याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, आता नवीन कायद्यानुसार चेतन पाटील याची चौकशी करायची असेल तेव्हा, न्यायालयाच्या आदेशाने पोलिस त्याला ताब्यात घेऊ शकतात. या प्रकरावरुन राज्यभरातू संताप व्यक्त केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला होता. वास्तविक या प्रकरणातील मुख आरोपी जयदीप आपटे हा विसंगत माहिती देत असून त्यामुळे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजेच 13 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला 10 दिवसानंतर अटक करण्यात आली होती. कल्याणच्या घरी कुटुंबीयांना भेटण्यास आला असता पोलिसांनी त्याला अटक केली होती. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता, याचे कंत्राट ठाणे येथील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. मात्र जयदीप आपटे याला केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता, तरी देखील याला कंत्राट का दिले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले

पोलिसांनी जयदीप आपटे तसेच स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. पुतळा उभारणीचे काम ठाण्यातील कंपनीने केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जयदीप आपटे कोण आहे? जयदीप आपटे हा कल्याण येथील 25 वर्षीय तरुण आहे. याच तरुणाने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्रॉंझचा पुतळा उभारला होता. मात्र जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. 28 फुट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी किमान 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे फक्त 7 महिन्यात काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे याने एका मुलाखतीत दिली होती.  

हिट अँड रन प्रकरणी बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही?:पोलिसांवर दबाव कोणाचा ? अतुल लोंढे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

हिट अँड रन प्रकरणी बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही?:पोलिसांवर दबाव कोणाचा ? अतुल लोंढे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना ठोकरले. पण बावनकुळेंच्या मुलावर अद्याप कारवाई केली नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे ? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपुरात ऑडी कारने तीन-चार लोकांना ठोकरले ती कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांची आहे, अपघातानंतर कारच्या नंबर प्लेट्स काढून कारमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसले म्हणजे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे. बजाजनगरमध्ये या कारच्या अपघातात एका व्यक्तीच्या खांद्याला मार लागला आहे पण तो काही बोलण्यास तयार नाही. आणखी दोघेजण जखमी झाले आहेत तेही काही बोलत नाहीत. रात्री १२.३६ वाजता अपघात झाला मग १२.३० ते १ च्या दरम्यान संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? संकेत बावनकुळेला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असून दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सत्ताधारी दनदांडग्या नेत्यांच्या मुलांसाठी जनतेचा जीव स्वस्त झाला आहे का? ‘हिट अँड रन’ प्रकरणात भाजपा व सत्ताधारी पक्षातील नेत्यांची मुले वा संबंधित लोकच जास्त दिसतात. राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत महायुती सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल आता जनताच या सरकारला उत्तर देईल, असेही अतुल लोंढे म्हणाले.

​भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना ठोकरले. पण बावनकुळेंच्या मुलावर अद्याप कारवाई केली नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे ? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपुरात ऑडी कारने तीन-चार लोकांना ठोकरले ती कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांची आहे, अपघातानंतर कारच्या नंबर प्लेट्स काढून कारमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसले म्हणजे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे. बजाजनगरमध्ये या कारच्या अपघातात एका व्यक्तीच्या खांद्याला मार लागला आहे पण तो काही बोलण्यास तयार नाही. आणखी दोघेजण जखमी झाले आहेत तेही काही बोलत नाहीत. रात्री १२.३६ वाजता अपघात झाला मग १२.३० ते १ च्या दरम्यान संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? संकेत बावनकुळेला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असून दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सत्ताधारी दनदांडग्या नेत्यांच्या मुलांसाठी जनतेचा जीव स्वस्त झाला आहे का? ‘हिट अँड रन’ प्रकरणात भाजपा व सत्ताधारी पक्षातील नेत्यांची मुले वा संबंधित लोकच जास्त दिसतात. राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत महायुती सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल आता जनताच या सरकारला उत्तर देईल, असेही अतुल लोंढे म्हणाले.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून नवा वाद:मोहन भागवतांचा इतिहास म्हणजे विकृतीकरण; जितेंद्र आव्हाडांचा थेट हल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून नवा वाद:मोहन भागवतांचा इतिहास म्हणजे विकृतीकरण; जितेंद्र आव्हाडांचा थेट हल्ला

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्यांच्या या उल्लेखावरून आता विरोधकांनी टीका केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याला इतिहासाचे विकृतीकरण म्हटले आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याबद्दल कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टीळकांनी शोधून काढली, यावरून आव्हाड यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, ‘मोहन भागवतजी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच ! आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.’ संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी यावर सावध पवित्रा घेतला. महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे समकालीन होते. दोघांचेही समाजातील कार्य मोठे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? या वादात पडण्याचे आता काहीही कारण नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

​महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्यांच्या या उल्लेखावरून आता विरोधकांनी टीका केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याला इतिहासाचे विकृतीकरण म्हटले आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याबद्दल कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टीळकांनी शोधून काढली, यावरून आव्हाड यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, ‘मोहन भागवतजी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच ! आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.’ संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी यावर सावध पवित्रा घेतला. महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे समकालीन होते. दोघांचेही समाजातील कार्य मोठे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? या वादात पडण्याचे आता काहीही कारण नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.