Category: marathi

बारामतीच्या मैदानात 2 धाकटे पवार मैदानात?:युगेंद्र पवारांची आजपासून स्वाभिमान यात्रा, तर जय पवार यांच्याही मंडळांना भेटीगाठी

बारामतीच्या मैदानात 2 धाकटे पवार मैदानात?:युगेंद्र पवारांची आजपासून स्वाभिमान यात्रा, तर जय पवार यांच्याही मंडळांना भेटीगाठी

आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपण लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. विविध गणेश मंडळांच्या आरतीच्या माध्यमातून जय पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही छोटे पवार लढणार का? अशी चर्चा सध्या मतदार संघात होत आहे. युगेंद्र पवार यांनी या आधी देखील लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा झंजावाती प्रचार केला. तेव्हापासूनच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभेचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, अनेक वेळा युगेंद्र पवार यांनी आपल्याला राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे सांगतानाच त्यांनी शरद पवार यांनी आदेश दिल्यास त्याप्रमाणे काम करण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यातच त्यांनी आता बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा एक दौरा पूर्ण करणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. आधी बहिण – भाऊ आणि आता भाऊ – भाऊ बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेंत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत असली तरी देखील सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशीच लढत मानली गेली. या बहिण भावाच्या लढतीची चर्चा देशभर होती. त्यात आता युगेंद्र पवार आणि जय पवार हे दोघे भाऊ – भाऊ या विधानसभा मतदारसंघात लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. ते शरयू ग्रुपच्या माध्यमातून व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. तसेच फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याचा कारभार देखील युगेंद्र पवार पाहतात. याशिवाय ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देखील आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा….

​आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपण लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. विविध गणेश मंडळांच्या आरतीच्या माध्यमातून जय पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही छोटे पवार लढणार का? अशी चर्चा सध्या मतदार संघात होत आहे. युगेंद्र पवार यांनी या आधी देखील लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा झंजावाती प्रचार केला. तेव्हापासूनच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभेचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, अनेक वेळा युगेंद्र पवार यांनी आपल्याला राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे सांगतानाच त्यांनी शरद पवार यांनी आदेश दिल्यास त्याप्रमाणे काम करण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यातच त्यांनी आता बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा एक दौरा पूर्ण करणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. आधी बहिण – भाऊ आणि आता भाऊ – भाऊ बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेंत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत असली तरी देखील सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशीच लढत मानली गेली. या बहिण भावाच्या लढतीची चर्चा देशभर होती. त्यात आता युगेंद्र पवार आणि जय पवार हे दोघे भाऊ – भाऊ या विधानसभा मतदारसंघात लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. ते शरयू ग्रुपच्या माध्यमातून व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. तसेच फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याचा कारभार देखील युगेंद्र पवार पाहतात. याशिवाय ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देखील आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा….  

अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट

अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह विविध गणपती मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. यात अमित शहा यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील घेतली. जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची देखील बैठक झाली. त्यातच अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यात कुठेही दिसले नसल्याने याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी अजित पवार आणि अमित शहा यांची विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा सोडणार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने 288 मतदारसंघांपैकी 150 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातील कमीत कमी 125 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. तर अजित पवार आणि अमित शहा यांची मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत 40 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या सर्व 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा आम्ही सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. याशिवाय काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या महाविकास आघाडीतील दहा ते बारा जागा देखील अजित पवार गटाने मागितल्या आहेत.

​केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह विविध गणपती मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. यात अमित शहा यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील घेतली. जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची देखील बैठक झाली. त्यातच अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यात कुठेही दिसले नसल्याने याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी अजित पवार आणि अमित शहा यांची विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा सोडणार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने 288 मतदारसंघांपैकी 150 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातील कमीत कमी 125 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. तर अजित पवार आणि अमित शहा यांची मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत 40 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या सर्व 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा आम्ही सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. याशिवाय काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या महाविकास आघाडीतील दहा ते बारा जागा देखील अजित पवार गटाने मागितल्या आहेत.  

दिव्य मराठी अपडेट्स:आज ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन; सूर्योदयापासून ‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत मुहूर्त‎

दिव्य मराठी अपडेट्स:आज ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन; सूर्योदयापासून ‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत मुहूर्त‎

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर‎ – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींसह शिक्षण, उद्योग, साहित्य, माध्यम क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी ते सुमारे अडीच तास संवाद साधतील. उच्चपदस्थ, सनदी अधिकाऱ्यांसमवेत स्नेहभोज घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या एकाही राज्यपालांनी निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने संवाद साधलेला नाही. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. दुपारी 3.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यावर तेथून सुभेदारी विश्रामगृहाकडे रवाना होतील. दुपारी 4 वाजता लोकप्रतिनिधींशी संवाद, 4.30 ते 6.30 या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी आणि संवाद होईल. रात्री 8 वाजेच्या शासकीय विमानाने मुंबईला रवाना होतील. आज गौरींचे आगमन; सूर्योदयापासून‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत असेल मुहूर्त‎ छत्रपती संभाजीनगर‎ – ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे ‎आगमन आज होणार आहे.‎ सूर्योदयापासून रात्री 8.04 ‎मिनिटांपर्यंत मुहूर्त यासाठी ‎पुरोहितांनी सांगितला आहे. सुख ,‎शांती, मांगल्य घेऊन येणाऱ्या ‎गौरींच्या स्वागतासाठी घराघरात‎ देखणी सजावट झाली आहे. यासाठी बाजारात विविध प्रकारच्या‎ भाज्या मुबलक प्रमाणात विक्रीस ‎‎आहेत. शिवाय फुलांचा बाजारही ‎‎बहरला आहे. गौरींच्या ‎‎सजावटीसाठी आर्टिफिशियल ‎‎फ्लॉवर्सचे डेकोरेशन, मोती,‎ फुलांच्या तोरणांची सर्वाधिक खरेदी ‎‎झाली आहे. कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ मुंबई – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविस यांनी सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात येईल. भाजपचे माजी आमदार पठारेंनी दिले पुन्हा शरद पवार गटात परतीचे संकेत पुणे – गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्ह्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. तेव्हापासून पठारे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता पठारेंनीच शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तेे 2009 मध्ये वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता विधानसभा लढण्यासाठी ते स्वगृही परतणार आहेत. महंत नृत्यगोपाल दास आजारी, आयसीयूमध्ये लखनऊ – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास (86) यांना लखनऊच्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. रुग्णालयाने सोमवारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले की, त्यांची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भुमरेंच्या बंडखोरीनंतर ठाकरे प्रथमच‎पैठणला, 15 रोजी जनसंवाद मेळावा‎ पैठण – खासदार संदीपान भूमरे यांनी शिंदे गटात प्रवेश‎ केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‎‎मध्ये येत आहेत. रविवारी 15‎‎ सप्टेंबर रोजी ठाकरे यांच्या‎‎ उपस्थितीत संत एकनाथ‎‎ कारखान्याचे चेअरमन सचिन‎‎ घायाळ यांचा पक्ष प्रवेश व जनसंवाद‎‎ मेळावा येथे होत आहे. त्यामुळे ‎ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याकडे तालुक्यातील शिंदे‎गटासह ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले‎ आहे. मेळाव्यात ठाकरे हे काय बोलणार याकडे भुमरेंसह ‎ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.‎

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर‎ – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींसह शिक्षण, उद्योग, साहित्य, माध्यम क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी ते सुमारे अडीच तास संवाद साधतील. उच्चपदस्थ, सनदी अधिकाऱ्यांसमवेत स्नेहभोज घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या एकाही राज्यपालांनी निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने संवाद साधलेला नाही. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. दुपारी 3.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यावर तेथून सुभेदारी विश्रामगृहाकडे रवाना होतील. दुपारी 4 वाजता लोकप्रतिनिधींशी संवाद, 4.30 ते 6.30 या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी आणि संवाद होईल. रात्री 8 वाजेच्या शासकीय विमानाने मुंबईला रवाना होतील. आज गौरींचे आगमन; सूर्योदयापासून‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत असेल मुहूर्त‎ छत्रपती संभाजीनगर‎ – ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे ‎आगमन आज होणार आहे.‎ सूर्योदयापासून रात्री 8.04 ‎मिनिटांपर्यंत मुहूर्त यासाठी ‎पुरोहितांनी सांगितला आहे. सुख ,‎शांती, मांगल्य घेऊन येणाऱ्या ‎गौरींच्या स्वागतासाठी घराघरात‎ देखणी सजावट झाली आहे. यासाठी बाजारात विविध प्रकारच्या‎ भाज्या मुबलक प्रमाणात विक्रीस ‎‎आहेत. शिवाय फुलांचा बाजारही ‎‎बहरला आहे. गौरींच्या ‎‎सजावटीसाठी आर्टिफिशियल ‎‎फ्लॉवर्सचे डेकोरेशन, मोती,‎ फुलांच्या तोरणांची सर्वाधिक खरेदी ‎‎झाली आहे. कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ मुंबई – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविस यांनी सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात येईल. भाजपचे माजी आमदार पठारेंनी दिले पुन्हा शरद पवार गटात परतीचे संकेत पुणे – गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्ह्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. तेव्हापासून पठारे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता पठारेंनीच शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तेे 2009 मध्ये वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता विधानसभा लढण्यासाठी ते स्वगृही परतणार आहेत. महंत नृत्यगोपाल दास आजारी, आयसीयूमध्ये लखनऊ – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास (86) यांना लखनऊच्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. रुग्णालयाने सोमवारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले की, त्यांची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भुमरेंच्या बंडखोरीनंतर ठाकरे प्रथमच‎पैठणला, 15 रोजी जनसंवाद मेळावा‎ पैठण – खासदार संदीपान भूमरे यांनी शिंदे गटात प्रवेश‎ केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‎‎मध्ये येत आहेत. रविवारी 15‎‎ सप्टेंबर रोजी ठाकरे यांच्या‎‎ उपस्थितीत संत एकनाथ‎‎ कारखान्याचे चेअरमन सचिन‎‎ घायाळ यांचा पक्ष प्रवेश व जनसंवाद‎‎ मेळावा येथे होत आहे. त्यामुळे ‎ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याकडे तालुक्यातील शिंदे‎गटासह ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले‎ आहे. मेळाव्यात ठाकरे हे काय बोलणार याकडे भुमरेंसह ‎ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.‎  

वरुडतांडा शिवारात भरधाव बसच्या धडकेत वृद्ध ठार:चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर अडकली

वरुडतांडा शिवारात भरधाव बसच्या धडकेत वृद्ध ठार:चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर अडकली

नांदेड ते वारंगामार्गावर वरुडतांडा शिवारात भरधाव बसच्या धडकेने रस्ता ओलांडणाऱ्या वृध्द नागरीकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतदेहावर मंगळवारी ता. 10 सकाळी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्या्त आली आहे. या अपघातानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर गेली. यामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुडतांडा (ता.कळमनुरी) येथील खुबासिंग रुपला आडे (65) हे सोमवारी ता. 9 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वरुडतांडा येथील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. यावेळी नांदेडकडून हिंगोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने (एमएच-26-बीएल 1775) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात खुबासिंग हे महामार्गावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन बस थेट दुभाजकावर जाऊन अडकली. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातस्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार नागोराव बाभळे, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत करून मयत खुबासिंग यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. सकाळी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.

​नांदेड ते वारंगामार्गावर वरुडतांडा शिवारात भरधाव बसच्या धडकेने रस्ता ओलांडणाऱ्या वृध्द नागरीकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतदेहावर मंगळवारी ता. 10 सकाळी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्या्त आली आहे. या अपघातानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर गेली. यामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुडतांडा (ता.कळमनुरी) येथील खुबासिंग रुपला आडे (65) हे सोमवारी ता. 9 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वरुडतांडा येथील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. यावेळी नांदेडकडून हिंगोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने (एमएच-26-बीएल 1775) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात खुबासिंग हे महामार्गावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन बस थेट दुभाजकावर जाऊन अडकली. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातस्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार नागोराव बाभळे, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत करून मयत खुबासिंग यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. सकाळी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.  

बोरगाव मंजू येथे 14 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग:ग्रामीण भागात 16 गावांत एक गाव एक गणपती

बोरगाव मंजू येथे 14 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग:ग्रामीण भागात 16 गावांत एक गाव एक गणपती

दरवर्षी प्रमाणे यंदाही अंनत चतुर्थीच्या दिवशी भाविकासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा वतीने ७ सप्टेंबर रोजी वाजत गाजत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची स्थापना केली. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, बोरगाव मंजू शहरात एकुण १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकुण ७२ गावांत ७१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी घेऊन गणेश मूर्तीची स्थापना केली. दरम्यान बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात १६ गावांत ‘एक गाव एक गणपती’ स्थापना झाली बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने सभा घेऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी आवाहन केले आहे. परिसरातील जनतेने प्रतिसाद देत या वर्षी १६ गावात मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती उत्सव साजरा होत आहे, बोरगाव मंजू शहरातील एकूण १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, बोरगाव मंजू शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणूक १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, मूर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील मिरवणुकीदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे, शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी जनतेने पोलिस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार अनिल गोपाळ यांनी केले आहे, दरम्यान, उत्सवकाळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न िनर्माण होऊ नये, या उद्देशाने सोमवारी शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले, अशी माहिती कळवण्यात आली आहे.

​दरवर्षी प्रमाणे यंदाही अंनत चतुर्थीच्या दिवशी भाविकासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा वतीने ७ सप्टेंबर रोजी वाजत गाजत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची स्थापना केली. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, बोरगाव मंजू शहरात एकुण १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकुण ७२ गावांत ७१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी घेऊन गणेश मूर्तीची स्थापना केली. दरम्यान बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात १६ गावांत ‘एक गाव एक गणपती’ स्थापना झाली बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने सभा घेऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी आवाहन केले आहे. परिसरातील जनतेने प्रतिसाद देत या वर्षी १६ गावात मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती उत्सव साजरा होत आहे, बोरगाव मंजू शहरातील एकूण १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, बोरगाव मंजू शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणूक १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, मूर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील मिरवणुकीदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे, शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी जनतेने पोलिस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार अनिल गोपाळ यांनी केले आहे, दरम्यान, उत्सवकाळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न िनर्माण होऊ नये, या उद्देशाने सोमवारी शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले, अशी माहिती कळवण्यात आली आहे.  

वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महानिर्मिती कंपनी, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५%वाढ देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाही वेतनात वाढ केली आहे. या वीज कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी वेतनवाढीची माहिती दिली. वीज सहायकांना परिवीक्षाधीन कालावधीत ५ हजार रुपयांची वाढ व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा ५०० रुपयांचा भत्ता एक हजार रुपये इतका करण्यात आला आहे. ७४ हजार कोटींची थकबाकी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असली तरी वीज देयकांची थकबाकी वाढतच चालली आहे. महावितरणकडे कृषी, घरगुती, वाणिज्यिक आणि व्यावसायिक आदी विविध संवर्गातील ग्राहकांची ७४ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ४५-४६ हजार कोटी रुपये थकबाकी कृषी ग्राहकांची आहे.

​महानिर्मिती कंपनी, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५%वाढ देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाही वेतनात वाढ केली आहे. या वीज कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी वेतनवाढीची माहिती दिली. वीज सहायकांना परिवीक्षाधीन कालावधीत ५ हजार रुपयांची वाढ व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा ५०० रुपयांचा भत्ता एक हजार रुपये इतका करण्यात आला आहे. ७४ हजार कोटींची थकबाकी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असली तरी वीज देयकांची थकबाकी वाढतच चालली आहे. महावितरणकडे कृषी, घरगुती, वाणिज्यिक आणि व्यावसायिक आदी विविध संवर्गातील ग्राहकांची ७४ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ४५-४६ हजार कोटी रुपये थकबाकी कृषी ग्राहकांची आहे.  

धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती- डॉ. मोहन भागवत:तंजावर हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास

धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती- डॉ. मोहन भागवत:तंजावर हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास

महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे, तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन पू.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजी राजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते. जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर वसुधैव कुटुंबकम हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राचीनिर्मिती झाली आहे’, असा विश्वास डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, सत्ययुगापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहीली आहे. स्वतःला कॉंग्रेसमधील डावे म्हणणारे सुभाषचंद्र बोस तर याला स्पष्टपणे हिंदू प्रेरणा म्हणत. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही तर स्वभावाचे वर्णन आहे. सर्व विविधतांना स्विकारणारे हे उदात्त विशेषण आहे.भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भाने तंजावरचा अधिक अभ्यास व्हायला हवा, असे मत लेखक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी व्यक्त केले. साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविक केले. हिंदवी राष्ट्रीय प्रेरणा या ग्रंथ प्रकल्पाचे यावेळी उद्घाटन झाले. तंजावर हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तंजावर मधील मराठ्यांचा इतिहास हा एका घराण्याचा इतिहास नाही, असे प्रतिपादन बाबाजीराजे भोसले यांनी केले. ते म्हणाले, तंजावरमध्ये केवळ भोसलेच नाही तर डोंगरे, केसरकर, कुलकर्णी, महाडिक, गाडे आदि आडनावाची घराणी आहेत, ज्यांचे मूळ महाराष्ट्रात आहे. हा केवळ एका घराण्याचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचा इतिहास आहे. महाराष्ट्र आणि तंजावरचा संबंध वाढायला हवा. शिवाजी महाराज आत्मप्रेरणा इस्लामी आक्रमणाचे स्वरूप लक्षात न आल्याने अनेक दैदिप्यमान संघर्ष विफल झाले. त्यावर शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा उपाय लागू पडला. त्याचीच प्रेरणा घेऊन भारत भरात दुर्गादास राठोड, छत्रसाल अशा अनेकांनी संघर्ष केला. अगदी इंग्रजांच्या विरूद्धच्या लढ्यातही शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.

​महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे, तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन पू.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजी राजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते. जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर वसुधैव कुटुंबकम हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राचीनिर्मिती झाली आहे’, असा विश्वास डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, सत्ययुगापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहीली आहे. स्वतःला कॉंग्रेसमधील डावे म्हणणारे सुभाषचंद्र बोस तर याला स्पष्टपणे हिंदू प्रेरणा म्हणत. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही तर स्वभावाचे वर्णन आहे. सर्व विविधतांना स्विकारणारे हे उदात्त विशेषण आहे.भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भाने तंजावरचा अधिक अभ्यास व्हायला हवा, असे मत लेखक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी व्यक्त केले. साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविक केले. हिंदवी राष्ट्रीय प्रेरणा या ग्रंथ प्रकल्पाचे यावेळी उद्घाटन झाले. तंजावर हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तंजावर मधील मराठ्यांचा इतिहास हा एका घराण्याचा इतिहास नाही, असे प्रतिपादन बाबाजीराजे भोसले यांनी केले. ते म्हणाले, तंजावरमध्ये केवळ भोसलेच नाही तर डोंगरे, केसरकर, कुलकर्णी, महाडिक, गाडे आदि आडनावाची घराणी आहेत, ज्यांचे मूळ महाराष्ट्रात आहे. हा केवळ एका घराण्याचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचा इतिहास आहे. महाराष्ट्र आणि तंजावरचा संबंध वाढायला हवा. शिवाजी महाराज आत्मप्रेरणा इस्लामी आक्रमणाचे स्वरूप लक्षात न आल्याने अनेक दैदिप्यमान संघर्ष विफल झाले. त्यावर शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा उपाय लागू पडला. त्याचीच प्रेरणा घेऊन भारत भरात दुर्गादास राठोड, छत्रसाल अशा अनेकांनी संघर्ष केला. अगदी इंग्रजांच्या विरूद्धच्या लढ्यातही शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.  

माझ्या मोठ्या मुलालाही गुडांकडून धोका, पोलिसांचे दुर्लक्ष:गेल्या आठवड्यात खून झालेल्या यश रोडगेच्या आईची व्यथा

माझ्या मोठ्या मुलालाही गुडांकडून धोका, पोलिसांचे दुर्लक्ष:गेल्या आठवड्यात खून झालेल्या यश रोडगेच्या आईची व्यथा

गुंडांच्या टोळीयुद्धाचा बळी ठरलेल्या यश रोडगेच्या आईने पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माझ्या मोठ्या मुलालाही सदर टोळीकडून धोका असल्याची भीती माध्यमांसमोर व्यक्त केली. गेल्या पंधरवड्यात यश विलास रोडगे या तरुणाचा (गोपालनगर-मराठा कॉलनी) दिवसाढवळ्या खून करुन त्याचा मृतदेह म्हाडा कॉलनी परिसरात फेकून दिला होता. या घटनेनंतर त्याचे मारेकरी आता त्याचा मोठा भाऊ विजय रोडगेला इन्स्ट्राग्रावरुन धमक्या देत असल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. यशची हत्या २१ ऑगस्टला झाली होती. तेव्हापासून त्याच्या हत्येसाठीचे खरे सूत्रधार फरार असल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु तेच हल्लेखोर इन्स्ट्राग्रामवर नवनवे अकाउंट तयार करुन विलास रोडगेला दररोज धमक्या देत असल्याचे पुरावे यशच्या आईने माध्यमांसमोर ठेवले. त्यांच्यामते पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी अद्याप रितसर चौकशी करुन हल्लेखोरांपर्यंत पोचण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे राजापेठ पोलिसांच्या तपासावर मला संशय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यामते पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही, तर आणखी अघटीत घडू शकते. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करुन मला न्याय द्यावा, अशी आर्जवही त्यांनी केली आहे. आता सीपींना भेटणार गुंडांकडून मोठ्या मुलाला मिळत असलेल्या धमक्या आणि राजापेठ पोलिसांचा असहकार या दोन मुद्द्यांबाबत आपण लवकरच पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​गुंडांच्या टोळीयुद्धाचा बळी ठरलेल्या यश रोडगेच्या आईने पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माझ्या मोठ्या मुलालाही सदर टोळीकडून धोका असल्याची भीती माध्यमांसमोर व्यक्त केली. गेल्या पंधरवड्यात यश विलास रोडगे या तरुणाचा (गोपालनगर-मराठा कॉलनी) दिवसाढवळ्या खून करुन त्याचा मृतदेह म्हाडा कॉलनी परिसरात फेकून दिला होता. या घटनेनंतर त्याचे मारेकरी आता त्याचा मोठा भाऊ विजय रोडगेला इन्स्ट्राग्रावरुन धमक्या देत असल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. यशची हत्या २१ ऑगस्टला झाली होती. तेव्हापासून त्याच्या हत्येसाठीचे खरे सूत्रधार फरार असल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु तेच हल्लेखोर इन्स्ट्राग्रामवर नवनवे अकाउंट तयार करुन विलास रोडगेला दररोज धमक्या देत असल्याचे पुरावे यशच्या आईने माध्यमांसमोर ठेवले. त्यांच्यामते पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी अद्याप रितसर चौकशी करुन हल्लेखोरांपर्यंत पोचण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे राजापेठ पोलिसांच्या तपासावर मला संशय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यामते पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही, तर आणखी अघटीत घडू शकते. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करुन मला न्याय द्यावा, अशी आर्जवही त्यांनी केली आहे. आता सीपींना भेटणार गुंडांकडून मोठ्या मुलाला मिळत असलेल्या धमक्या आणि राजापेठ पोलिसांचा असहकार या दोन मुद्द्यांबाबत आपण लवकरच पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज:’दगडूशेठ’ गणपतीला 50 लाखाचा हिऱ्याचा तिलक अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण

गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज:’दगडूशेठ’ गणपतीला 50 लाखाचा हिऱ्याचा तिलक अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनेक भक्त विविध प्रकारचे सोने, चांदीचे दागिने अर्पण करतात. यंदाच्या गणेशोत्सवात सॉलिटेरियो डायमंडस तर्फे गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये हा तिलक बसविण्यात आला असून यामुळे लाडक्या गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सॉलिटेरियो डायमंडसचे मालक प्रख्यात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी श्रीं चे दर्शन घेत हा तिलक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. विवेक ओबेरॉय म्हणाले, मी जेव्हा इथे येतो, तेव्हा तेव्हा गणपतीचे दर्शन घेऊन मन भरून येते. एवढ्या मोठया प्रमाणात गर्दी असून देखील अत्यंत शांतपणे येथे दर्शन घेता येते. वर्षानुवर्षे येथे गर्दी वाढत असली, तरी देखील सगळ्यांना नीट दर्शन मिळते, हे मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. सॉलिटेरियो डायमंडस तर्फे १२ दिवस हा ६६ कॅरेट हि-याचा तिलक साकारण्याचे काम सुरु होते. गणरायांच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. तब्बल १५० तास कारागिरांनी अत्यंत कलाकुसरीने हा हिऱ्याचा तिलक साकारला आहे. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

​श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनेक भक्त विविध प्रकारचे सोने, चांदीचे दागिने अर्पण करतात. यंदाच्या गणेशोत्सवात सॉलिटेरियो डायमंडस तर्फे गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये हा तिलक बसविण्यात आला असून यामुळे लाडक्या गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सॉलिटेरियो डायमंडसचे मालक प्रख्यात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी श्रीं चे दर्शन घेत हा तिलक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. विवेक ओबेरॉय म्हणाले, मी जेव्हा इथे येतो, तेव्हा तेव्हा गणपतीचे दर्शन घेऊन मन भरून येते. एवढ्या मोठया प्रमाणात गर्दी असून देखील अत्यंत शांतपणे येथे दर्शन घेता येते. वर्षानुवर्षे येथे गर्दी वाढत असली, तरी देखील सगळ्यांना नीट दर्शन मिळते, हे मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. सॉलिटेरियो डायमंडस तर्फे १२ दिवस हा ६६ कॅरेट हि-याचा तिलक साकारण्याचे काम सुरु होते. गणरायांच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. तब्बल १५० तास कारागिरांनी अत्यंत कलाकुसरीने हा हिऱ्याचा तिलक साकारला आहे. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ:DCM फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय; मार्च 2024 पासून लागू होणार वेतनवाढ

वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ:DCM फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय; मार्च 2024 पासून लागू होणार वेतनवाढ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 19 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. तर ही वेतनवाढ मार्च 2024 पासून लागू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय तीन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ मिळाली आहे. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ देण्यात आलेली आहे. या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे. पहिली पगारवाढसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘टॉप अप’ करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात आज एक बैठक पार पडली. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थितीत, धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली.

​उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 19 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. तर ही वेतनवाढ मार्च 2024 पासून लागू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय तीन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ मिळाली आहे. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ देण्यात आलेली आहे. या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे. पहिली पगारवाढसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘टॉप अप’ करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात आज एक बैठक पार पडली. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थितीत, धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली.