कांडलीच्या सुमित्रा आहकेच्या कलेचा सन्मान:मेळघाटच्या वारली पेंटिग्ज, व्याघ्र चित्राची राष्ट्रपतींकडून प्रशंसा
वारली पेंटिग्ज् आणि व्याघ्र प्रकल्पातील जंगल तसेच वन्यजीव संपदेला चित्राच्या माध्यमातून समाजापुढे आणणाऱ्या सुमित्रा आहकेला तब्बल १५ दिवस राष्ट्रपतींच्या अतिथी म्हणून दिल्लीच्या राजभवनात राहण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांच्या अंगी असलेल्या घरगुती कलेचा सन्मानही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. गौरखेडा कुंभी येथे मुख्यालय असलेल्या ‘खोज’ संस्थेत कार्यरत सुमित्रा आहके या आदिवासी भगीनी उच्चशिक्षित आहेत. रेखाकला हा विषय त्यांनी शालेय शिक्षणापासूनच जपला. त्यामुळे...