Category: marathi

राज्यात प्रथमच मुलगी देणार बापाला आव्हान:मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुलगी देणार आव्हान, लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश

राज्यात प्रथमच मुलगी देणार बापाला आव्हान:मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुलगी देणार आव्हान, लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश

राज्याच्या राजकारणात मुलीने बापाला आव्हान देण्याची गोष्ट केव्हाच घडली नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात अशी रंजकपूर्ण लढत होऊ शकते. या ठिकाणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री यांनी दंड थोपटलेत. त्या लवकरच म्हणजे 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. राज्यात पुढील एक-दोन महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे. आत्रामांची होती लोकसभेवर नजर धर्मरावबाबा आत्राम यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती. पण ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पु्न्हा विधानसभेवर लक्ष केंद्रित केले. पण यावेळी त्यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर हेदेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या कुटुंबात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. परिणामी, आता आत्राम यांच्या नेतृत्वात लहानाची मोठी झालेली मुलगी व जावईच त्यांना आव्हान देत आहेत. लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी 6 सप्टेंबर रोजी जनसन्मान यात्रेच्या भाषणावेळी आपल्या मनातील खदखद जनतेपुढे बोलून दाखवली. त्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात बाप-लेकीतील या संभाव्य राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा, बांधकाम सभापतीसह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. अनिल देशमुख यांनीदेखील याविषयी वेळोवेळी भाष्य केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी अहेरी येथील एका कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम व त्यांचे पती ऋतुराज हलगेकर आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश करतील. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे व जयंत पाटील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. राजघराण्यात चुरशीची लढत धर्मरावबाबा आत्राम यांनी आपले चुलते राजे विश्वेश्वरराव आत्राम यांच्याशी फारकत घेत आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण केले. मागील 50 वर्षांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. चुलत बंधू सत्यवानराव आत्राम व त्यानंतर पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी त्यांची थेट लढत होत असते. पण काही अपवाद सोडल्यास अहेरी विधानसभेत राजघराण्याचे वर्चस्व कायम राहिले आहे. पण यंदा पहिल्यांदाच राजघराण्यातील तिघे विधानसभेचा आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहे. त्यामुळे यावेळी अहेरी विधानसभेतील राजकीय घडमोडीवर अनेकांनी लक्ष केंद्रित केले आहे.

​राज्याच्या राजकारणात मुलीने बापाला आव्हान देण्याची गोष्ट केव्हाच घडली नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात अशी रंजकपूर्ण लढत होऊ शकते. या ठिकाणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री यांनी दंड थोपटलेत. त्या लवकरच म्हणजे 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. राज्यात पुढील एक-दोन महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे. आत्रामांची होती लोकसभेवर नजर धर्मरावबाबा आत्राम यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती. पण ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पु्न्हा विधानसभेवर लक्ष केंद्रित केले. पण यावेळी त्यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर हेदेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या कुटुंबात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. परिणामी, आता आत्राम यांच्या नेतृत्वात लहानाची मोठी झालेली मुलगी व जावईच त्यांना आव्हान देत आहेत. लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी 6 सप्टेंबर रोजी जनसन्मान यात्रेच्या भाषणावेळी आपल्या मनातील खदखद जनतेपुढे बोलून दाखवली. त्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात बाप-लेकीतील या संभाव्य राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा, बांधकाम सभापतीसह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. अनिल देशमुख यांनीदेखील याविषयी वेळोवेळी भाष्य केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी अहेरी येथील एका कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम व त्यांचे पती ऋतुराज हलगेकर आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश करतील. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे व जयंत पाटील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. राजघराण्यात चुरशीची लढत धर्मरावबाबा आत्राम यांनी आपले चुलते राजे विश्वेश्वरराव आत्राम यांच्याशी फारकत घेत आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण केले. मागील 50 वर्षांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. चुलत बंधू सत्यवानराव आत्राम व त्यानंतर पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी त्यांची थेट लढत होत असते. पण काही अपवाद सोडल्यास अहेरी विधानसभेत राजघराण्याचे वर्चस्व कायम राहिले आहे. पण यंदा पहिल्यांदाच राजघराण्यातील तिघे विधानसभेचा आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहे. त्यामुळे यावेळी अहेरी विधानसभेतील राजकीय घडमोडीवर अनेकांनी लक्ष केंद्रित केले आहे.  

गणेशोत्सवावरही मराठा आंदोलनाचा प्रभाव:पुण्यात बाप्पांपुढे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा देखावा, पाहा लक्षवेधक VIDEO

गणेशोत्सवावरही मराठा आंदोलनाचा प्रभाव:पुण्यात बाप्पांपुढे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा देखावा, पाहा लक्षवेधक VIDEO

गणपतीचे आगमन झाल्यावर अनेक ठिकाणी विविध प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला पाहायला मिळतात. या देखाव्यांमधून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा देखावा पुण्यातील शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या गणपतीसमोर केला आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे शौर्य किरण चव्हाण यांनी सांगितले आहे. पुण्यातील 93 गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिर परिसरात शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या घरी हा देखावा सादर केला आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, यंदाचा देखावा हा मराठा आरक्षणावर आधारीत असून ही संकल्पना साकार करण्याचे कारण असे की देखानव्याच्या माध्यमातून श्री गणरायाला साकडे घालून सामान्य मराठा समाजाला आरक्षण लाभो ही मागणी गणरायाच्या चरणी ठेऊन ही संकल्पना यंदाच्या वर्षी साकार केली आहे. चव्हाण यांनी सादर केलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी येथील नागरिकही मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या वर्षीपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेल्या उपोषणाला तसेच आंदोलनांना संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण मराठा समाजच त्यांच्या पाठीशी आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या मागण्या दिलेल्या तारखेपूर्वी पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. खाली पाहा व्हिडिओ

​गणपतीचे आगमन झाल्यावर अनेक ठिकाणी विविध प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला पाहायला मिळतात. या देखाव्यांमधून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा देखावा पुण्यातील शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या गणपतीसमोर केला आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे शौर्य किरण चव्हाण यांनी सांगितले आहे. पुण्यातील 93 गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिर परिसरात शौर्य किरण चव्हाण यांनी त्यांच्या घरी हा देखावा सादर केला आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, यंदाचा देखावा हा मराठा आरक्षणावर आधारीत असून ही संकल्पना साकार करण्याचे कारण असे की देखानव्याच्या माध्यमातून श्री गणरायाला साकडे घालून सामान्य मराठा समाजाला आरक्षण लाभो ही मागणी गणरायाच्या चरणी ठेऊन ही संकल्पना यंदाच्या वर्षी साकार केली आहे. चव्हाण यांनी सादर केलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी येथील नागरिकही मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या वर्षीपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेल्या उपोषणाला तसेच आंदोलनांना संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण मराठा समाजच त्यांच्या पाठीशी आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या मागण्या दिलेल्या तारखेपूर्वी पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. खाली पाहा व्हिडिओ  

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता:जायकवाडीमधून आज विसर्ग; जलसाठा 97.50 टक्क्यांवर, सांडव्याद्वारे गोदावरीत 3144 क्युसेक पाणी सोडणार

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता:जायकवाडीमधून आज विसर्ग; जलसाठा 97.50 टक्क्यांवर, सांडव्याद्वारे गोदावरीत 3144 क्युसेक पाणी सोडणार

मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा 97.50 टक्के झाला असून आज दुपारी 1 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे. आज सकाळी 6 वाजता जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) 97.50% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघता आज जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 3144 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकूण 6 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार असुन एकूण 3144 क्युसेक विसर्ग सुरु होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे. तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, सह अभियंता विजय काकडे यांनी केले आहे. 2 वर्षांनंतर होणार विसर्ग‎ मागील वर्षी याच दिवसात ‎धरणाचा साठा32.42 टक्के होता. ‎दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये 100‎टक्के भरल्याने, 28 जुलै 2022 ‎रोजी धरणाचे 18 दरवाजे उघडून‎ पाणी सोडले गेले होते. तर यंदा ‎जायकवाडी धरण 8 ऑगस्टला 97 ‎टक्के भरले होते. यामुळे सोमवारी ‎पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला‎ जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली होती. त्यानुसार आता आज धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा 97.50 टक्के झाला असून आज दुपारी 1 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे. आज सकाळी 6 वाजता जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) 97.50% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघता आज जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 3144 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकूण 6 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार असुन एकूण 3144 क्युसेक विसर्ग सुरु होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे. तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, सह अभियंता विजय काकडे यांनी केले आहे. 2 वर्षांनंतर होणार विसर्ग‎ मागील वर्षी याच दिवसात ‎धरणाचा साठा32.42 टक्के होता. ‎दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये 100‎टक्के भरल्याने, 28 जुलै 2022 ‎रोजी धरणाचे 18 दरवाजे उघडून‎ पाणी सोडले गेले होते. तर यंदा ‎जायकवाडी धरण 8 ऑगस्टला 97 ‎टक्के भरले होते. यामुळे सोमवारी ‎पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला‎ जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली होती. त्यानुसार आता आज धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

साई पल्लवीचा ‘अप्सरा आली’वर भन्नाट डान्स:मराठमोळ्या गाण्यावर बहिणीसोबत बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

साई पल्लवीचा ‘अप्सरा आली’वर भन्नाट डान्स:मराठमोळ्या गाण्यावर बहिणीसोबत बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री साई पल्लवी आपल्या साधेपणासाठी ओळखली जाते. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. तिचा ‘अप्सरा आली’ या मराठमोळ्या गाण्यावरील एका डान्सच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. या गाण्यात ती आपल्या बहिणीसोबत बेभान होऊन नाचताना दिसते. साई पल्लवीचा हा व्हिडिओ तिच्या फॅनपेजने ट्विट केला. त्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ साई पल्लवीची बहीण पूजा कननच्या लग्नातील संगीत रजनीचा असल्याचे सांगण्यात येते. त्यात ती आपल्या बहिणीसह ‘अप्सरा आली’वर थिरकताना दिसते. या गाण्यावर नाचताना एकेक्षणी साई पल्लवी लडखडताना दिसते. पण वेळीच सावरत ती पुन्हा गाण्याच्या चालीवर ठेका धरते. साई पल्लवीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. एक यूजर लिहितो, या डान्समुळे मला साई पल्लवीने प्रभावित केले आहे. दुसरा एक यूजर लिहितो, साई पल्लवी डान्स करताना एकेक्षणी लडखडली, पण त्यानंतरही तिने स्वतःला सांभाळून डान्स पुढे नेला. साई व तिची बहीण दोघीही खूप चांगल्या डान्सर आहेत, असे अन्य एका यूजरने लिहिले आहे. दरम्यान, साई पल्लवी सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती माता सीता, तर अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. खाली पाहा व्हिडिओ ​​​​​​​

​दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री साई पल्लवी आपल्या साधेपणासाठी ओळखली जाते. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. तिचा ‘अप्सरा आली’ या मराठमोळ्या गाण्यावरील एका डान्सच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. या गाण्यात ती आपल्या बहिणीसोबत बेभान होऊन नाचताना दिसते. साई पल्लवीचा हा व्हिडिओ तिच्या फॅनपेजने ट्विट केला. त्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ साई पल्लवीची बहीण पूजा कननच्या लग्नातील संगीत रजनीचा असल्याचे सांगण्यात येते. त्यात ती आपल्या बहिणीसह ‘अप्सरा आली’वर थिरकताना दिसते. या गाण्यावर नाचताना एकेक्षणी साई पल्लवी लडखडताना दिसते. पण वेळीच सावरत ती पुन्हा गाण्याच्या चालीवर ठेका धरते. साई पल्लवीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. एक यूजर लिहितो, या डान्समुळे मला साई पल्लवीने प्रभावित केले आहे. दुसरा एक यूजर लिहितो, साई पल्लवी डान्स करताना एकेक्षणी लडखडली, पण त्यानंतरही तिने स्वतःला सांभाळून डान्स पुढे नेला. साई व तिची बहीण दोघीही खूप चांगल्या डान्सर आहेत, असे अन्य एका यूजरने लिहिले आहे. दरम्यान, साई पल्लवी सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती माता सीता, तर अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. खाली पाहा व्हिडिओ ​​​​​​​  

मनोज जरांगेंची भेट घेतल्याने तरुणाला मारहाण:भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर आरोप, वाद चिघळण्याची चिन्हे

मनोज जरांगेंची भेट घेतल्याने तरुणाला मारहाण:भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर आरोप, वाद चिघळण्याची चिन्हे

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मनोज जरांगे यांची बाजू घेतल्याने मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र जरांगे पाटील आपल्यावर खोटे आरोप लावत असल्याचे मत राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात वाद सुरू आहेत. अशातच राजेंद्र राऊत यांच्यावर हे आरोप होताना दिसत आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांनी केलेले आरोप फेटाळले असून मारहाण झालेल्या तरुणाने अजून तक्रारही दाखल केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, जरांगे दादांच्या डोळ्यावर काळी पट्टी आली आहे. बार्शीत सभा झाली तेव्हापासून जरांगे यांनी मला टार्गेट केले आहे. ते म्हणतात आम्ही सुपारी घेतली, बीड जाळायची आहे का? आम्हाला गोळ्या घालणार आहात का? एवढी दादागिरी गुंडगिरी कशी चालणार लोकशाहीत? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक होत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद चिघळत असून राऊत यांच्याविरोधात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर सोलापूरमध्ये मराठा समाज एकत्रित येत आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहे. तसेच आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिली तर आम्ही गनिमी काव्याने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मराठा समाजाने दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी घोंगडी बैठक देखील घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

​बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मनोज जरांगे यांची बाजू घेतल्याने मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र जरांगे पाटील आपल्यावर खोटे आरोप लावत असल्याचे मत राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात वाद सुरू आहेत. अशातच राजेंद्र राऊत यांच्यावर हे आरोप होताना दिसत आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांनी केलेले आरोप फेटाळले असून मारहाण झालेल्या तरुणाने अजून तक्रारही दाखल केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, जरांगे दादांच्या डोळ्यावर काळी पट्टी आली आहे. बार्शीत सभा झाली तेव्हापासून जरांगे यांनी मला टार्गेट केले आहे. ते म्हणतात आम्ही सुपारी घेतली, बीड जाळायची आहे का? आम्हाला गोळ्या घालणार आहात का? एवढी दादागिरी गुंडगिरी कशी चालणार लोकशाहीत? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक होत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद चिघळत असून राऊत यांच्याविरोधात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर सोलापूरमध्ये मराठा समाज एकत्रित येत आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहे. तसेच आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिली तर आम्ही गनिमी काव्याने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मराठा समाजाने दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी घोंगडी बैठक देखील घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.  

पोलिसांना अरे तुरे करणाऱ्या नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करणार का?:कोल्हापूरच्या आयजींची माध्यमांना हतबल प्रतिक्रिया

पोलिसांना अरे तुरे करणाऱ्या नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करणार का?:कोल्हापूरच्या आयजींची माध्यमांना हतबल प्रतिक्रिया

वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषणे करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई होणार का? या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. असं काही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही, असे सांगत त्यांनी आपली हतबलता स्पष्ट केली. भाजप आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तणाव वाढवत आहेत. तसेच वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, म्हणून नोटीस द्यायला गेल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचा एकेरी भाषेत उध्दार करून बदलीची धमकी देत आहेत. याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला असता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची हतबलता स्पष्टपणे दिसून आली. सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार नितेश राणे हे पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार बदल्यांची धमकी देत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, यासंदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट बोलणे टाळले. जे काही घडले, त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती केली जाईल किंवा केली देखील असेल, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. इस्लामपूर (ता. वाळवा) येथे २४ ऑगस्ट रोजी आमदार राणेंनी पोलिस निरीक्षक हारूगडे यांना एकेरी भाषा वापरली. प्रक्षोभक भाषण करून जातीय तेढ निर्माण करू नये, म्हणून पोलिस निरीक्षक हारूगडे हे आमदार राणेंना नोटीस देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘तू कोणाला नोटीस देतोयस, त्या मुस्लिमांना नोटीस दे. मी नोटीस घेत नाही. तिकडे फेकून दे’, अशा एकेरी भाषेत आ. राणेंनी पोलिस निरीक्षकाला सुनावले होते. त्यासंदर्भातील प्रश्नावर मी त्याबद्दल ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलू शकतो, परंतु, मीडियासमोर काहीही बोलणार नाही, अशी हतबल प्रतिक्रिया आयजी सुनील फुलारी यांनी दिली. पोलिसांना जाहीर कार्यक्रमांमध्ये वारंवार धमक्या देणाऱ्या आ. नितेश राणेंचा साताऱ्यातील सेवानिवृत्त पोलिसांच्या संघटनेने जाहीर निषेध केला आहे. पोलिस कधीही बदलीला घाबरत नाहीत. आकसापोटी पोलिसांच्या बदल्या करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही संघटनेनं केलेली आहे.

​वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषणे करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई होणार का? या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. असं काही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही, असे सांगत त्यांनी आपली हतबलता स्पष्ट केली. भाजप आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तणाव वाढवत आहेत. तसेच वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, म्हणून नोटीस द्यायला गेल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचा एकेरी भाषेत उध्दार करून बदलीची धमकी देत आहेत. याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला असता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची हतबलता स्पष्टपणे दिसून आली. सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार नितेश राणे हे पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार बदल्यांची धमकी देत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, यासंदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट बोलणे टाळले. जे काही घडले, त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती केली जाईल किंवा केली देखील असेल, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. इस्लामपूर (ता. वाळवा) येथे २४ ऑगस्ट रोजी आमदार राणेंनी पोलिस निरीक्षक हारूगडे यांना एकेरी भाषा वापरली. प्रक्षोभक भाषण करून जातीय तेढ निर्माण करू नये, म्हणून पोलिस निरीक्षक हारूगडे हे आमदार राणेंना नोटीस देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘तू कोणाला नोटीस देतोयस, त्या मुस्लिमांना नोटीस दे. मी नोटीस घेत नाही. तिकडे फेकून दे’, अशा एकेरी भाषेत आ. राणेंनी पोलिस निरीक्षकाला सुनावले होते. त्यासंदर्भातील प्रश्नावर मी त्याबद्दल ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलू शकतो, परंतु, मीडियासमोर काहीही बोलणार नाही, अशी हतबल प्रतिक्रिया आयजी सुनील फुलारी यांनी दिली. पोलिसांना जाहीर कार्यक्रमांमध्ये वारंवार धमक्या देणाऱ्या आ. नितेश राणेंचा साताऱ्यातील सेवानिवृत्त पोलिसांच्या संघटनेने जाहीर निषेध केला आहे. पोलिस कधीही बदलीला घाबरत नाहीत. आकसापोटी पोलिसांच्या बदल्या करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही संघटनेनं केलेली आहे.  

अखेर अजित पवारांच्या मनात काय?:प्रथम कुटुंब फुटल्याची केली चूक मान्य, आता बारामती सोडण्याचे संकेत; पण नजर 2029 च्या लढ्यावर

अखेर अजित पवारांच्या मनात काय?:प्रथम कुटुंब फुटल्याची केली चूक मान्य, आता बारामती सोडण्याचे संकेत; पण नजर 2029 च्या लढ्यावर

महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदवान पवार कुटुंबात गतकाही वर्षांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या लढाईत आतापर्यंत शरद पवारांनी आपले वर्चस्व राखले आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पॉवर चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. पण अजित पवारांनी राजकीय सारिपाटावर मांडलेल्या सोंगट्या पाहता ते नैतिकदृष्ट्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत थोरल्या पवारांवर भारी पडतील असे चित्र आहे. यामुळेच ते काहीसे बदलल्याचे दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या स्वभावात खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. भाजपशी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस हस्तगत केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या बाबतीत अत्यंत कठोर झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा आपल्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात चक्क आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी सुनेत्रा यांचा प्रचार करताना आकाश-पाताळ एक केले. पण त्यानंतरही त्यांना पराभवाची कटू चव चाखावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरीची निराशाजनक राहिली. दुसरीकडे, शरद पवारांच्या नव्या पक्षाने चमकदार कामगिरी केली. तेव्हापासून अजित पवार त्यांच्याप्रती काहीसे मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. रविवारी बारामतीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. अखेर अजित पवारांच्या मनात काय? अजित पवारांना भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून पक्षाबरोबरच जनतेचीही मने जिंकता येतील असा विश्वास होता. त्यानुसार त्यांची पहिली लिटमस टेस्ट लोकसभा निवडणूक होती. पण ते त्यात सपशेल अपयशी ठरले. पण याहून मोठी गोष्ट म्हणजे भाजप व शिवसेनेसोबत असताना त्यांना पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे व्हायचे नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यांना माहिती आहे की, शरद पवार आता वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचलेत, जिथे 2029 च्या निवडणुकीत ते फारसे सक्रिय राहण्याची आशा नाही. त्यामुळे त्यावेळी शरद पवारांचे चाहते व समर्थक आपल्याकडे वळतील असे त्यांना वाटते. त्यामुळेच अजित पवार शरद पवारांच्या मार्गाने जात मध्यम मार्गाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते वक्फ बोर्डाच्या मुद्यावर मुस्लिमांसोबत दिसून येतात, तर राम मंदिरापासून सर्वच राष्ट्रीय मुद्यांवर भाजपसोबत असल्याचे दाखवून देतात. विशेषतः असे करताना त्यांना शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधातही जायचे नाही. त्यामुळेच ते आपली चूक झाल्याचे मान्य करत शरद पवारांच्या समर्थकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच मान्य केली होती चूक अजित पवार यांनी नुकतीच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या एका सभेत आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांना वडिलांशी फितुरी न करण्याचा सल्ला दिला होता. ते भाग्यश्रीला म्हणाले होते की, गुरू कधीही शिष्याला सर्व डावपेच शिकवत नाही, तो नेहमी एक डाव राखून ठेवतो. मला तुला अशी चूक करू नको, वडिलांसोबत राहा असा सल्ला देतो. वडील आपल्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढे प्रेम कुणी कुणावर करत नाही. असे केल्याने तू तुझ्याच घरात वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत ठरशील. हे योग्य नाही. ते समाजाला पटत नाही. या संदर्भात मी स्वतः अनुभव घेतला आहे. मला आता माझी चूक समजली आहे. ती चूक मला मान्यही आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भाग्यश्री यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघात आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाचा दाखला देत भाग्यश्रीला उपरोक्त सल्ला देत होते. मग जय पवारांचे नाव चर्चेत का? अजित पवार यांनी बारामती येथील जागा आपले सुपुत्र जय पवार यांना सोडण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजिव आहेत. म्हणजे, बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित व श्रीनिवास या बंधूंमध्ये मुकाबला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवारांनी गतवर्षी आपले चुलते शरद पवारांशी बंडखोरी केल्यानंतर जय पवार पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर दिसून आले होते. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या पहिल्या सभेतही ते अजित पवारांसोबत दिसून आले होते. दुसरीकडे, युगेंद्र पवारही गत वर्षभरापासून शरद पवारांसोबत फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुप्रिया सुळेंविषयीही व्यक्त केली होती सहानुभूती अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी सॉफ्ट भूमिका व्यक्त केली होती. ‘राजकारणाच्या जागी राजकारण आहे, पण या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते, पण घरात राजकारण येऊ देऊ नये. पण लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला होता. एकदा निशाणा साधला की बाण परत घेता येत नाही. पण तरीही माझे मन मला सांगते की, असे व्हायला नको होते. दुर्दैवाने आता तो निर्णय मागे घेता येणार नाही’, असे ते म्हणाले होते. बारामतीचा अभेद्य गड जिंकण्याची रणनीती या घटनाक्रमावरून हे स्पष्ट आहे की, अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतून धडा घेत यापुढे आपले चुलते शरद पवार व कुटुंबीयांवर आक्रमक भूमिका न घेता अत्यंत शांतपणे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. बारामती वगळता ते एकप्रकारे शरद पवार यांच्यावर राजकारणातून रिटायर होण्यासठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामु्ळेच त्यांनी आपल्या वयाचा दाखला देत अप्रत्यक्षपणे शरद पवारांचे वय व महत्त्वकांक्षेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही स्वतः आपला मुलगा व पुतण्यासाठी आपली जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे. आता शरद पवारांनी अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याला बारामतीतून उमेदवारी दिली तरी अजित पवार नैतिकदृष्ट्या शरद पवारांच्या पुढे असतील. यामाध्यमातून ते कौटुंबिक आघाडीवरील बारामतीच्या लढाईत आपल्या काकांना मात देतील.

​महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदवान पवार कुटुंबात गतकाही वर्षांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या लढाईत आतापर्यंत शरद पवारांनी आपले वर्चस्व राखले आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पॉवर चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. पण अजित पवारांनी राजकीय सारिपाटावर मांडलेल्या सोंगट्या पाहता ते नैतिकदृष्ट्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत थोरल्या पवारांवर भारी पडतील असे चित्र आहे. यामुळेच ते काहीसे बदलल्याचे दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या स्वभावात खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. भाजपशी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस हस्तगत केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या बाबतीत अत्यंत कठोर झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा आपल्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात चक्क आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी सुनेत्रा यांचा प्रचार करताना आकाश-पाताळ एक केले. पण त्यानंतरही त्यांना पराभवाची कटू चव चाखावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरीची निराशाजनक राहिली. दुसरीकडे, शरद पवारांच्या नव्या पक्षाने चमकदार कामगिरी केली. तेव्हापासून अजित पवार त्यांच्याप्रती काहीसे मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. रविवारी बारामतीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. अखेर अजित पवारांच्या मनात काय? अजित पवारांना भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून पक्षाबरोबरच जनतेचीही मने जिंकता येतील असा विश्वास होता. त्यानुसार त्यांची पहिली लिटमस टेस्ट लोकसभा निवडणूक होती. पण ते त्यात सपशेल अपयशी ठरले. पण याहून मोठी गोष्ट म्हणजे भाजप व शिवसेनेसोबत असताना त्यांना पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे व्हायचे नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यांना माहिती आहे की, शरद पवार आता वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचलेत, जिथे 2029 च्या निवडणुकीत ते फारसे सक्रिय राहण्याची आशा नाही. त्यामुळे त्यावेळी शरद पवारांचे चाहते व समर्थक आपल्याकडे वळतील असे त्यांना वाटते. त्यामुळेच अजित पवार शरद पवारांच्या मार्गाने जात मध्यम मार्गाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते वक्फ बोर्डाच्या मुद्यावर मुस्लिमांसोबत दिसून येतात, तर राम मंदिरापासून सर्वच राष्ट्रीय मुद्यांवर भाजपसोबत असल्याचे दाखवून देतात. विशेषतः असे करताना त्यांना शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधातही जायचे नाही. त्यामुळेच ते आपली चूक झाल्याचे मान्य करत शरद पवारांच्या समर्थकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच मान्य केली होती चूक अजित पवार यांनी नुकतीच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या एका सभेत आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांना वडिलांशी फितुरी न करण्याचा सल्ला दिला होता. ते भाग्यश्रीला म्हणाले होते की, गुरू कधीही शिष्याला सर्व डावपेच शिकवत नाही, तो नेहमी एक डाव राखून ठेवतो. मला तुला अशी चूक करू नको, वडिलांसोबत राहा असा सल्ला देतो. वडील आपल्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढे प्रेम कुणी कुणावर करत नाही. असे केल्याने तू तुझ्याच घरात वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत ठरशील. हे योग्य नाही. ते समाजाला पटत नाही. या संदर्भात मी स्वतः अनुभव घेतला आहे. मला आता माझी चूक समजली आहे. ती चूक मला मान्यही आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भाग्यश्री यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघात आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाचा दाखला देत भाग्यश्रीला उपरोक्त सल्ला देत होते. मग जय पवारांचे नाव चर्चेत का? अजित पवार यांनी बारामती येथील जागा आपले सुपुत्र जय पवार यांना सोडण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजिव आहेत. म्हणजे, बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित व श्रीनिवास या बंधूंमध्ये मुकाबला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवारांनी गतवर्षी आपले चुलते शरद पवारांशी बंडखोरी केल्यानंतर जय पवार पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर दिसून आले होते. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या पहिल्या सभेतही ते अजित पवारांसोबत दिसून आले होते. दुसरीकडे, युगेंद्र पवारही गत वर्षभरापासून शरद पवारांसोबत फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुप्रिया सुळेंविषयीही व्यक्त केली होती सहानुभूती अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी सॉफ्ट भूमिका व्यक्त केली होती. ‘राजकारणाच्या जागी राजकारण आहे, पण या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते, पण घरात राजकारण येऊ देऊ नये. पण लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला होता. एकदा निशाणा साधला की बाण परत घेता येत नाही. पण तरीही माझे मन मला सांगते की, असे व्हायला नको होते. दुर्दैवाने आता तो निर्णय मागे घेता येणार नाही’, असे ते म्हणाले होते. बारामतीचा अभेद्य गड जिंकण्याची रणनीती या घटनाक्रमावरून हे स्पष्ट आहे की, अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतून धडा घेत यापुढे आपले चुलते शरद पवार व कुटुंबीयांवर आक्रमक भूमिका न घेता अत्यंत शांतपणे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. बारामती वगळता ते एकप्रकारे शरद पवार यांच्यावर राजकारणातून रिटायर होण्यासठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामु्ळेच त्यांनी आपल्या वयाचा दाखला देत अप्रत्यक्षपणे शरद पवारांचे वय व महत्त्वकांक्षेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही स्वतः आपला मुलगा व पुतण्यासाठी आपली जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे. आता शरद पवारांनी अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याला बारामतीतून उमेदवारी दिली तरी अजित पवार नैतिकदृष्ट्या शरद पवारांच्या पुढे असतील. यामाध्यमातून ते कौटुंबिक आघाडीवरील बारामतीच्या लढाईत आपल्या काकांना मात देतील.  

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला:आता पश्चातापाचा काय उपयोग? संजय राऊत यांचा हल्लाबोल

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला:आता पश्चातापाचा काय उपयोग? संजय राऊत यांचा हल्लाबोल

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. अजित पवार बारामती मध्ये विधानसभा निवडणूक हरणार आहेत, नक्की आहे. हे त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काय बोलणार? असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. जे तुमच्या पक्षाचे नेते होते आणि तुमच्यासाठी वडिलांप्रमाणे असणारे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिले. त्यांनी तुम्हाला सर्व काही दिलेले असतानाही तुम्ही मात्र, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाँम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी मी देखील लढा दिला असल्याचे भाजप नेते अमित शहा यांनी म्हटले होते. यावरुन देखील संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. मुंबईने नामांतर करण्यासाठी आम्ही आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक आंदोलने उभी केले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. त्यासाठी मराठी माणसांनी बलिदान दिले असल्याचे देखील मे म्हणाले. शिवसेनेने विविध आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी लावून धरली होती. बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात अमित शहा यांचा हात असल्याचे ऐकल्यानंतर आता आम्ही त्यांना हसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाँम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी 105 मराठी बांधवांनी बलिदान दिले आहे, विसरता येणार नाही. यापुढे देखील बलिदान देण्याची मराठी माणसाची तयारी असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे.
आता लालबागचा राजाही ते मुंबईतून गुजरातला घेऊन जायची भीती वाटते आता लालबागचा राजा देखील आम्ही स्थापन केला आहे, असे अमित शहा म्हणतील. असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे. अमित शहा अनेकदा लालबागच्या राजाला येऊन गेले आहेत. पण आता लालबागचा राजाही ते मुंबईतून गुजरातला घेऊन जायची भीती वाटत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अमित शहा हेच शिंदे, अजित पवाराचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चाळीस लोक हे ढोंगी आहेत. ते ढोंगीपणा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या वेळी त्यांनी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. आता त्यांच्यावर बुरखे वाटप करण्याची वेळ आली आहे. यावरून देखील त्यांनी टीका केली. अमित शहा हे शिंदे आणि अजित पवार यांचे नेते आहेत. त्यामुळे ते त्यांच्या बैठका घेत असतील, त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यासारखे काही नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे:ठाकरे गटाचा पुनरुच्चार; फडणवीसांना दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे थांबवण्याचा सल्ला काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. अजित पवार बारामती मध्ये विधानसभा निवडणूक हरणार आहेत, नक्की आहे. हे त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काय बोलणार? असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. जे तुमच्या पक्षाचे नेते होते आणि तुमच्यासाठी वडिलांप्रमाणे असणारे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिले. त्यांनी तुम्हाला सर्व काही दिलेले असतानाही तुम्ही मात्र, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाँम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी मी देखील लढा दिला असल्याचे भाजप नेते अमित शहा यांनी म्हटले होते. यावरुन देखील संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. मुंबईने नामांतर करण्यासाठी आम्ही आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक आंदोलने उभी केले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. त्यासाठी मराठी माणसांनी बलिदान दिले असल्याचे देखील मे म्हणाले. शिवसेनेने विविध आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी लावून धरली होती. बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात अमित शहा यांचा हात असल्याचे ऐकल्यानंतर आता आम्ही त्यांना हसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाँम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी 105 मराठी बांधवांनी बलिदान दिले आहे, विसरता येणार नाही. यापुढे देखील बलिदान देण्याची मराठी माणसाची तयारी असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे.
आता लालबागचा राजाही ते मुंबईतून गुजरातला घेऊन जायची भीती वाटते आता लालबागचा राजा देखील आम्ही स्थापन केला आहे, असे अमित शहा म्हणतील. असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे. अमित शहा अनेकदा लालबागच्या राजाला येऊन गेले आहेत. पण आता लालबागचा राजाही ते मुंबईतून गुजरातला घेऊन जायची भीती वाटत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अमित शहा हेच शिंदे, अजित पवाराचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चाळीस लोक हे ढोंगी आहेत. ते ढोंगीपणा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या वेळी त्यांनी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. आता त्यांच्यावर बुरखे वाटप करण्याची वेळ आली आहे. यावरून देखील त्यांनी टीका केली. अमित शहा हे शिंदे आणि अजित पवार यांचे नेते आहेत. त्यामुळे ते त्यांच्या बैठका घेत असतील, त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यासारखे काही नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे:ठाकरे गटाचा पुनरुच्चार; फडणवीसांना दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे थांबवण्याचा सल्ला काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

शरद पवार नात, जावयासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला:अनेक वर्षांनंतर दुसऱ्यांदा घेतले दर्शन, यापूर्वी CM असताना आले होते

शरद पवार नात, जावयासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला:अनेक वर्षांनंतर दुसऱ्यांदा घेतले दर्शन, यापूर्वी CM असताना आले होते

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष. राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पवार बऱ्याच वर्षांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही घेतले दर्शन लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर शरद पवारांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही पोहोचले. तिथेही त्यांनी सदानंद सुळे व रेवती सुळे यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंनीही घेतले दर्शन उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तथा सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. हे ही वाचा…
सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटक:निषेधार्थ हजारो लोकांची हिंसक निदर्शने; पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या सुरत – सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

​राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष. राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पवार बऱ्याच वर्षांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही घेतले दर्शन लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर शरद पवारांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही पोहोचले. तिथेही त्यांनी सदानंद सुळे व रेवती सुळे यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंनीही घेतले दर्शन उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तथा सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. हे ही वाचा…
सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटक:निषेधार्थ हजारो लोकांची हिंसक निदर्शने; पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या सुरत – सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर  

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने सार्वजनिक मालमत्तेची दाणादाण:1अब्ज 56 कोटींचे नुकसान, 42 पुल, 29 रस्ते, 98 साठवण बंधाऱ्याचा समावेश

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने सार्वजनिक मालमत्तेची दाणादाण:1अब्ज 56 कोटींचे नुकसान, 42 पुल, 29 रस्ते, 98 साठवण बंधाऱ्याचा समावेश

हिंगोली जिल्हयात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेची दाणादाण उडाली असन तब्बल १ अब्ज ५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ४२ पुल, २९ रस्ते तर ९८ साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. आता वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्ते व पुलाच्या कामाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्‍यक झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात ता. १ सप्टेंबर व ता. २ सप्टेंबर या कालावधी सरासरी १४१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील पाचही तालुक्यांमधून १०० मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या शिवाय अतिवृष्टीचा सार्वजनिक मालमत्तेलाही फटका बसला आहे. या पावसानंतर नुकसानीची पाहणी केली असता जिल्हयातील २९ ठिकाणी साडे चार किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांर्गत ४२ पुलांचे ५२.२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत इतर जिल्हा मार्गाचे १७९ किलोमिटरचे १७.९० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून इतर जिल्हा मार्गाच्े १७९ किलोमिटर अंतराचे ६३.१२ कोटींचे नुकसान झाले आहेत. तसेच २२२ पुलांचे ४.४४ कोटींचे नुकसान झाले आहे. या शिवाय विज कंपनीचे १८१ उच्चदाब खांब, २५५ लघुदाब खांबाचे १३.५५ लाखांचे नुकसान झाले. तसेच १३.२६ किलोमिटर उच्चदाब वाहिनी, २४.६८ किलोमिटर लघुदाब वाहिनी तुटल्याने ४८.९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिवाय १७ रोहित्रांचे १२.५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या ९८ साठवण बंधाऱ्यांना फटका बसला असून ७.८४ कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच ३५ कोल्हापूरी बंधाऱ्याचे ३.५० कोटींचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पुल व इतर ठिकाणी ७५ हजाराचे नुकसान झाले असून कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील पशुवैद्यकिय दवाखान्यांचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हयातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून रस्ते, पुल दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले असून त्या पाठोपाठ विज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

​हिंगोली जिल्हयात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेची दाणादाण उडाली असन तब्बल १ अब्ज ५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ४२ पुल, २९ रस्ते तर ९८ साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. आता वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्ते व पुलाच्या कामाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्‍यक झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात ता. १ सप्टेंबर व ता. २ सप्टेंबर या कालावधी सरासरी १४१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील पाचही तालुक्यांमधून १०० मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या शिवाय अतिवृष्टीचा सार्वजनिक मालमत्तेलाही फटका बसला आहे. या पावसानंतर नुकसानीची पाहणी केली असता जिल्हयातील २९ ठिकाणी साडे चार किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांर्गत ४२ पुलांचे ५२.२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत इतर जिल्हा मार्गाचे १७९ किलोमिटरचे १७.९० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून इतर जिल्हा मार्गाच्े १७९ किलोमिटर अंतराचे ६३.१२ कोटींचे नुकसान झाले आहेत. तसेच २२२ पुलांचे ४.४४ कोटींचे नुकसान झाले आहे. या शिवाय विज कंपनीचे १८१ उच्चदाब खांब, २५५ लघुदाब खांबाचे १३.५५ लाखांचे नुकसान झाले. तसेच १३.२६ किलोमिटर उच्चदाब वाहिनी, २४.६८ किलोमिटर लघुदाब वाहिनी तुटल्याने ४८.९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिवाय १७ रोहित्रांचे १२.५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या ९८ साठवण बंधाऱ्यांना फटका बसला असून ७.८४ कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच ३५ कोल्हापूरी बंधाऱ्याचे ३.५० कोटींचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पुल व इतर ठिकाणी ७५ हजाराचे नुकसान झाले असून कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील पशुवैद्यकिय दवाखान्यांचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हयातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून रस्ते, पुल दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले असून त्या पाठोपाठ विज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.