Category: marathi

गुंतवणूकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवत 21 लाखांना ऑनलाईन गंडा:परदेशी चलन खरेदीच्या आर्थिक व्यवहारात तरुणाची फसवणूक

गुंतवणूकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवत 21 लाखांना ऑनलाईन गंडा:परदेशी चलन खरेदीच्या आर्थिक व्यवहारात तरुणाची फसवणूक

गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून सायबर चोरट्यांनी तरूणाला २१ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २५ जुलै ते ९ ऑगस्ट कालावधीत मांजरी बुद्रुक परिसरात घडली आहे. याप्रकरणी चरितम्मा वटट्रीकुंटा( वय ३४ )यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चरितम्मा हे कुटूंबियासह मांजरी बुद्रूक परिसरात राहायला आहेत. २५ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क करून गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सायबर चोरट्यांनी सुरूवातीला तक्रारदारांना परतावा दिल्यामुळे त्यांचा विश्वास संपादित झाला. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांत २१ लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक एस जगदाळे पुढील तपास करीत आहेत. परदेशी चलन खरेदीच्या आर्थिक व्यवहारात तरुणाची आर्थिक फसवणूक परदेशी चलन खरेदी व्यवहारात चोरट्यांनी तरुणाची एक लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, विष्णू एक्सचेंजर डाॅट काॅम, राहुल, तसेच एका बँकेतील खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुणाने ऑनलाइन परदेशी चलन खरेदीबाबतची माहिती संकेतस्थळावरुन घेतली होती. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याानंतर आरोपींनी १७०० अमेरिकन डाॅलर एक लाख ४१ हजार ९०० रुपयांमध्ये देतो, असे सांगितले. तरुणाला एका बँक खात्यात एक लाख ४१ हजार ९०० रुपये जमा करण्यास सांगितले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर त्याला डाॅलर दिले नाहीत.त्यानंतर तरुणाने आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

​गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून सायबर चोरट्यांनी तरूणाला २१ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २५ जुलै ते ९ ऑगस्ट कालावधीत मांजरी बुद्रुक परिसरात घडली आहे. याप्रकरणी चरितम्मा वटट्रीकुंटा( वय ३४ )यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चरितम्मा हे कुटूंबियासह मांजरी बुद्रूक परिसरात राहायला आहेत. २५ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क करून गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सायबर चोरट्यांनी सुरूवातीला तक्रारदारांना परतावा दिल्यामुळे त्यांचा विश्वास संपादित झाला. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांत २१ लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक एस जगदाळे पुढील तपास करीत आहेत. परदेशी चलन खरेदीच्या आर्थिक व्यवहारात तरुणाची आर्थिक फसवणूक परदेशी चलन खरेदी व्यवहारात चोरट्यांनी तरुणाची एक लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, विष्णू एक्सचेंजर डाॅट काॅम, राहुल, तसेच एका बँकेतील खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुणाने ऑनलाइन परदेशी चलन खरेदीबाबतची माहिती संकेतस्थळावरुन घेतली होती. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याानंतर आरोपींनी १७०० अमेरिकन डाॅलर एक लाख ४१ हजार ९०० रुपयांमध्ये देतो, असे सांगितले. तरुणाला एका बँक खात्यात एक लाख ४१ हजार ९०० रुपये जमा करण्यास सांगितले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर त्याला डाॅलर दिले नाहीत.त्यानंतर तरुणाने आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

36व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी रेखाटली गणपतीची पेंटिंग्ज:ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांचा विशेष सत्कार

36व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी रेखाटली गणपतीची पेंटिंग्ज:ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांचा विशेष सत्कार

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी श्री गणपतीची पेंटिंग्ज रंगवून वाह वाह मिळवली. बालगंधर्व कलादालन येथे रविवारी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या पेंटिंग प्रदर्शनचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांचा वयाची ८५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार प्रा. मिलिंद फडके, संयोजक तुलसी आर्ट ग्रुपचे सुरेश लोणकर आणि धनश्री लोणकर मंचावर उपस्थित होते. टाळ्यांचा कडकडाट करून १०० हून अधिक चित्रकारांनी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांना मानवंदना दिली. गणपती चित्रांचे या प्रदर्शनात अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर, खडू, पेन्सिल, चारकोल इत्यादी माध्यमांचा चित्रकारांनी वापर केला आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार रोहन भोसले यांनी गणपतीचे शाडू माती पासून शिल्प बनवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिल्पकार विवेक खटावकर यांनी सुमारे ५ फूट उंचीचे फायबरपासून बनवलेले गणपतीचे शिल्प तेथे उभारले. प्रदर्शनाच्या ३ दिवसात नामवंत चित्रकार विविध पेंटिंग्जची प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. हे प्रदर्शन ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे. याचं बक्षीस वितरण समारंभ दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी संपन्न होईल.

​३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी श्री गणपतीची पेंटिंग्ज रंगवून वाह वाह मिळवली. बालगंधर्व कलादालन येथे रविवारी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या पेंटिंग प्रदर्शनचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांचा वयाची ८५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार प्रा. मिलिंद फडके, संयोजक तुलसी आर्ट ग्रुपचे सुरेश लोणकर आणि धनश्री लोणकर मंचावर उपस्थित होते. टाळ्यांचा कडकडाट करून १०० हून अधिक चित्रकारांनी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांना मानवंदना दिली. गणपती चित्रांचे या प्रदर्शनात अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर, खडू, पेन्सिल, चारकोल इत्यादी माध्यमांचा चित्रकारांनी वापर केला आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार रोहन भोसले यांनी गणपतीचे शाडू माती पासून शिल्प बनवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिल्पकार विवेक खटावकर यांनी सुमारे ५ फूट उंचीचे फायबरपासून बनवलेले गणपतीचे शिल्प तेथे उभारले. प्रदर्शनाच्या ३ दिवसात नामवंत चित्रकार विविध पेंटिंग्जची प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. हे प्रदर्शन ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे. याचं बक्षीस वितरण समारंभ दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी संपन्न होईल.  

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती:ॠषीपंचमीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती:ॠषीपंचमीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर

ओम नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नमः:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्रा.गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे ३९ वे वर्ष होते. डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, बुद्धी हीच खरी शक्ती आहे. सर्व महिला आज गणरायाकडे बुद्धी मागायला मोठ्या संख्येने आल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. प्रत्येक कार्यामागे बुद्धी आहे, एक विचार असतो. जे काही करतो, ते आपण बुद्धीपूर्वक करायला हवे. आज बाहेरील परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे महिलांनी आपली शक्ती जागृत करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

​ओम नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नमः:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्रा.गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे ३९ वे वर्ष होते. डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, बुद्धी हीच खरी शक्ती आहे. सर्व महिला आज गणरायाकडे बुद्धी मागायला मोठ्या संख्येने आल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. प्रत्येक कार्यामागे बुद्धी आहे, एक विचार असतो. जे काही करतो, ते आपण बुद्धीपूर्वक करायला हवे. आज बाहेरील परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे महिलांनी आपली शक्ती जागृत करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.  

पुण्यात कात्रज परिसरात मेफेड्रॉन तस्कर जेरबंद:12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

पुण्यात कात्रज परिसरात मेफेड्रॉन तस्कर जेरबंद:12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

कात्रज परिसरात मेफेड्रॉन तस्करीच्या तयारीत असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख रूपये किंमतीचे ५४ ग्रॅम ५१ मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले. मल्लीनाथ बसवराज गौडगाव (वय २९ रा. आंबेगाव बु, पुणे मुळ जि.सोलापुर) आणि नौशाद अब्दुलअली शेख, (वय ३६ रा. पडेगाव, संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांना कात्रज परिसरात दोघेजण मेफेड्रॉन तस्करीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गौडगाव आणि शेखला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ लाख रूपयांचे एमडी आणि पावणेनउ लाख रूपयांची पावडर असा ५५ ग्रॅम एमडी जप्त केले.ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नंदीनी वग्याणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, एपीआय समीर कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अभिनय चौधरी, सागर बोरगे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले यांनी केली. भरदिवसा जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून, जेष्ठ महिलांसह पादचारी महिलांना लक्ष्य करीत दागदागिन्यांची चोरी केली जात आहे. बिबबवेवाडीच्या घटनेनंतर दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटनाकोथरूडमधील महात्मा गांधी सोसायटी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला नातूसह कोथरूडमधील महात्मा गांधी सोसायटी परिसरातून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी पुढील तपास करीत आहेत.

​कात्रज परिसरात मेफेड्रॉन तस्करीच्या तयारीत असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख रूपये किंमतीचे ५४ ग्रॅम ५१ मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले. मल्लीनाथ बसवराज गौडगाव (वय २९ रा. आंबेगाव बु, पुणे मुळ जि.सोलापुर) आणि नौशाद अब्दुलअली शेख, (वय ३६ रा. पडेगाव, संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांना कात्रज परिसरात दोघेजण मेफेड्रॉन तस्करीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गौडगाव आणि शेखला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ लाख रूपयांचे एमडी आणि पावणेनउ लाख रूपयांची पावडर असा ५५ ग्रॅम एमडी जप्त केले.ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नंदीनी वग्याणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, एपीआय समीर कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अभिनय चौधरी, सागर बोरगे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले यांनी केली. भरदिवसा जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून, जेष्ठ महिलांसह पादचारी महिलांना लक्ष्य करीत दागदागिन्यांची चोरी केली जात आहे. बिबबवेवाडीच्या घटनेनंतर दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटनाकोथरूडमधील महात्मा गांधी सोसायटी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला नातूसह कोथरूडमधील महात्मा गांधी सोसायटी परिसरातून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी पुढील तपास करीत आहेत.  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज स्वीकारले जाणार- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज स्वीकारले जाणार- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या योजनेंतर्गत माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( एनयूएम, एमएसआरएलएम व माविम), मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे, अशी माहिती रंधवे यांनी दिली. ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २ हजार ४०८ योजनादूत नेमण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी https://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड करण्यात येणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.उमेदवाराने मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अधिवासाचा दाखला, आधारसंलग्न बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

​मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या योजनेंतर्गत माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( एनयूएम, एमएसआरएलएम व माविम), मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे, अशी माहिती रंधवे यांनी दिली. ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २ हजार ४०८ योजनादूत नेमण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी https://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड करण्यात येणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.उमेदवाराने मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अधिवासाचा दाखला, आधारसंलग्न बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.  

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य- CM एकनाथ शिंदे:म्हणाले- संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य- CM एकनाथ शिंदे:म्हणाले- संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव

वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प कुरेकर महाराज यांना शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले. कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे , ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त ह. भ. प. संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असेही ते म्हणाले. गेल्या २ वर्षात शासनाने ६०० च्यावर निर्णय घेतले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गरिबी माहिती आहे. सर्वात जास्त अर्थव्यवस्था चोख बजावणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. माझी लाडकी बहिण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे. या योजनेबरोबरच लेक लाडकी लखपती योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, एस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आदी योजना राबवित आहे. शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ आदीसाठी आतापर्यंत १६ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीला राज्याच्या नमो महासन्मान योजनेची ६ हजार रुपयांची जोड देऊन वर्षाला एकूण १२ हजार रुपये देण्यात येत आहेत. १ रुपयात पीक विमा देणारे हे देशातील पहिले सरकार असून ७.५ एच. पी. पर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

​वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प कुरेकर महाराज यांना शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले. कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे , ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त ह. भ. प. संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असेही ते म्हणाले. गेल्या २ वर्षात शासनाने ६०० च्यावर निर्णय घेतले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गरिबी माहिती आहे. सर्वात जास्त अर्थव्यवस्था चोख बजावणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. माझी लाडकी बहिण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे. या योजनेबरोबरच लेक लाडकी लखपती योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, एस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आदी योजना राबवित आहे. शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ आदीसाठी आतापर्यंत १६ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीला राज्याच्या नमो महासन्मान योजनेची ६ हजार रुपयांची जोड देऊन वर्षाला एकूण १२ हजार रुपये देण्यात येत आहेत. १ रुपयात पीक विमा देणारे हे देशातील पहिले सरकार असून ७.५ एच. पी. पर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.  

लोकांची सहानुभूती मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न:जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

लोकांची सहानुभूती मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न:जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये ‘जिथं पिकतं तिथं विकत नसतं’, अशी प्रतिक्रिया दिली होती. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यामुळे येथील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही? यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत, लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्ष नेते होते. शरद पवार उच्चपदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असो ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते. असे जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे, बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार काम करत नाही का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावे हे लोकांना आवडत नाही. सर्व बारामतीला माहिती बॉस कोण आहे. पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही. एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले.

​अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये ‘जिथं पिकतं तिथं विकत नसतं’, अशी प्रतिक्रिया दिली होती. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यामुळे येथील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही? यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत, लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्ष नेते होते. शरद पवार उच्चपदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असो ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते. असे जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे, बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार काम करत नाही का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावे हे लोकांना आवडत नाही. सर्व बारामतीला माहिती बॉस कोण आहे. पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही. एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले.  

अजित पवारांच्या आमदाराविरोधात भाजप!:पुण्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

अजित पवारांच्या आमदाराविरोधात भाजप!:पुण्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

महायुतीमध्ये अंतर्गत वाद आता समोर येताना दिसत आहेत. पुण्यात भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय अजित पवार गटातील आमदार चेतन तुपे करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्यावर तीव्र नाराजी दर्शवण्यासाठी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे शिवराज घुले यांनी सांगितले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरी नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला, मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांनी केला आहे. मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला आहे. दरम्यान, अजित पवार महायुतीत सामील झाले. वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलनही झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये आणि भाजप , शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यानंतर उलटी येते, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र दिसते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​महायुतीमध्ये अंतर्गत वाद आता समोर येताना दिसत आहेत. पुण्यात भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय अजित पवार गटातील आमदार चेतन तुपे करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्यावर तीव्र नाराजी दर्शवण्यासाठी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे शिवराज घुले यांनी सांगितले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरी नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला, मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांनी केला आहे. मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला आहे. दरम्यान, अजित पवार महायुतीत सामील झाले. वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलनही झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये आणि भाजप , शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यानंतर उलटी येते, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र दिसते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू:आमदार संतोष बांगर यांनी घेतली भेट

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू:आमदार संतोष बांगर यांनी घेतली भेट

औंढा नागनाथ येथील बसस्थानकाजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वेल्डींगचे काम करत असताना विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. शेख सरफराज शेख गफार (३०) असे मयताचे नाव आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील बसस्थानकाजवळ एका वेल्डींगच्या दुकानामध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील जिरेगल्ली भागातील शेख सरफराज शेख गफार (३०), शेख फिरोज शेख अहमद (२५), जुबेर खाँ अहेमदखाँ पठाण (२५), शेख निजाम शेख शरीफ (२४) हे चौघे जण टीनशेड वेल्डींगचे काम करीत होता. यावेळी वेल्डींग करीत असतांना अचानक वेल्डींग मशीनचा वायर तुटून नालीमध्ये पडला तर दुसरा वायर एका तरुणाच्या हातात आला. यामुळे टीनपत्राला धरून असलेल्या चौघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तेथील नागरीकांनी परिसरात असलेल्या मंडपाचे लाकडे काढून वायरवर मारले. त्यानंतर चौघेही बाजूला फेकले गेले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हिंगोलीच्या रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शेख सरफराज यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. त्यामुळे त्यांना परत औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, जखमी तिघांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार संतोष बांगर यांनी तातडीने शासकिय रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, औंढा नागनाथचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार शेख महम्मह, ज्ञानेश्‍वर गोरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्याप पर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मयत शेख सरफराज हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता पुरुष होता. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​औंढा नागनाथ येथील बसस्थानकाजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वेल्डींगचे काम करत असताना विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. शेख सरफराज शेख गफार (३०) असे मयताचे नाव आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील बसस्थानकाजवळ एका वेल्डींगच्या दुकानामध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील जिरेगल्ली भागातील शेख सरफराज शेख गफार (३०), शेख फिरोज शेख अहमद (२५), जुबेर खाँ अहेमदखाँ पठाण (२५), शेख निजाम शेख शरीफ (२४) हे चौघे जण टीनशेड वेल्डींगचे काम करीत होता. यावेळी वेल्डींग करीत असतांना अचानक वेल्डींग मशीनचा वायर तुटून नालीमध्ये पडला तर दुसरा वायर एका तरुणाच्या हातात आला. यामुळे टीनपत्राला धरून असलेल्या चौघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तेथील नागरीकांनी परिसरात असलेल्या मंडपाचे लाकडे काढून वायरवर मारले. त्यानंतर चौघेही बाजूला फेकले गेले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हिंगोलीच्या रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शेख सरफराज यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. त्यामुळे त्यांना परत औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, जखमी तिघांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार संतोष बांगर यांनी तातडीने शासकिय रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, औंढा नागनाथचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार शेख महम्मह, ज्ञानेश्‍वर गोरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्याप पर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मयत शेख सरफराज हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता पुरुष होता. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

हिंगोली जिल्ह्यात पानटपऱ्यांवर कारवाई:31 गुन्हे दाखल, 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली जिल्ह्यात पानटपऱ्यांवर कारवाई:31 गुन्हे दाखल, 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह जिल्हाभरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून शनिवारी दिवसभरात ३१ ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले असून ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालयाच्या परिसरातील पानटपऱ्यांवर गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी जिल्हयातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पानटपऱ्यांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हाभरात पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व इतर पदार्थ असा ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ४, हिंगोली ग्रामीण ४, नर्सी १, औंढा नागनाथ ३, सेनगाव ३, कुरुंदा २, वसमत शहर ६, वसमत ग्रामीण ३, आखाडा बाळापूर ३ व हट्टा पोलिस ठाण्यात दोन असे ३१ गुन्हे दाखल झाले आहेत. सदर मोहिम यापुढेही सुरु राहणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हयातील पानटपरी चालकांनी कुठल्याही प्रकारचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. यापुढे या पदार्थांची विक्री करतांना आढळून आल्यास आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

​हिंगोली शहरासह जिल्हाभरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून शनिवारी दिवसभरात ३१ ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले असून ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालयाच्या परिसरातील पानटपऱ्यांवर गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी जिल्हयातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पानटपऱ्यांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हाभरात पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व इतर पदार्थ असा ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ४, हिंगोली ग्रामीण ४, नर्सी १, औंढा नागनाथ ३, सेनगाव ३, कुरुंदा २, वसमत शहर ६, वसमत ग्रामीण ३, आखाडा बाळापूर ३ व हट्टा पोलिस ठाण्यात दोन असे ३१ गुन्हे दाखल झाले आहेत. सदर मोहिम यापुढेही सुरु राहणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हयातील पानटपरी चालकांनी कुठल्याही प्रकारचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. यापुढे या पदार्थांची विक्री करतांना आढळून आल्यास आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.