Category: marathi

शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात:म्हणाले – मोदींचा संविधानात बदल करण्याचा डाव होता, पण आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली

शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात:म्हणाले – मोदींचा संविधानात बदल करण्याचा डाव होता, पण आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे ते म्हणाले. शरद पवार यांची शनिवारी उदगीर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र...

रविवारी दोन सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा:मराठवाड्यातील 151 केंद्रावर 87 हजार भावी शिक्षक देणार पेपर

रविवारी दोन सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा:मराठवाड्यातील 151 केंद्रावर 87 हजार भावी शिक्षक देणार पेपर

मराठवाड्यातील 151 परिक्षा केंद्रावर रविवारी ता. 10 दोन सत्रात शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाणार असून या परिक्षेत 87 हजार 954 उमेदवार सहभागी होणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून परिक्षेची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाते. रविवारी ता. 10 दोन सत्रात हि परिक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी...

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ नाही:त्याबद्दल केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, शहाच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये-  चंद्रशेखर बावनकुळे

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ नाही:त्याबद्दल केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, शहाच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये-  चंद्रशेखर बावनकुळे

मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार हे मुख्यमंत्री बनण्याच्या कुठल्याही चढाओढीमध्ये नाही. अमित शहा यांच्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढू नये. आम्ही विकासाकरिता काम करत आहोत. मुख्यमंत्रिपदासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल. आम्ही सध्या त्यावर विचार करत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही विकासासाठी मत मागत आहोत. 14 कोटी जनतेच्या...

मोदी – शहांनी अवघा महाराष्ट्र लुटला:आता विधानसभा निवडणुकीत सर्वत्र मते मागत फिरत आहेत, उद्धव ठाकरे यांचा टोला

मोदी – शहांनी अवघा महाराष्ट्र लुटला:आता विधानसभा निवडणुकीत सर्वत्र मते मागत फिरत आहेत, उद्धव ठाकरे यांचा टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात झालेल्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट हल्ला चढवला. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी अवघा महाराष्ट्र लुटला. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात मते मागत फिरत आहेत, असे ते म्हणालेत. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…   

भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या:सांगली जिल्ह्यातील खळबळजनक घटना, कुऱ्हाडीचे घाव घालून केले ठार

भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या:सांगली जिल्ह्यातील खळबळजनक घटना, कुऱ्हाडीचे घाव घालून केले ठार

भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुधाकर खाडे यांचा शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास पंढरपूर रोडवरील राम मंदिरालगत असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून एका व्यक्तीशी वाद झाला होता....

आपला तो बाबू अन् दुसऱ्याचे ते कारटं ही राणेंची सवय:जिल्ह्यातील जनता त्यांच्यासोबत राहणार नाही- वैभव नाईक

आपला तो बाबू अन् दुसऱ्याचे ते कारटं ही राणेंची सवय:जिल्ह्यातील जनता त्यांच्यासोबत राहणार नाही- वैभव नाईक

नीलेश राणे हा नारायण राणेंचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांना सरस वाटतोय. खासदार असताना त्यांच्या मुलाने काय दिवे लावले? दुसऱ्याचे ते कारटे आणि आपला तो बाबू अशी राणेंना नेहमीच सवय आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत आत्मियता आहे. याला येऊ देणार नाही त्याला येऊ...

शरद पवारांचा ‘बटेंगे तो कटेंगे’वर हल्ला:भाजपला खडसावत म्हणाले – समाजात तेढ निर्माण करू नये याचे साधे भान सत्ताधारी पक्षाला नाही

शरद पवारांचा ‘बटेंगे तो कटेंगे’वर हल्ला:भाजपला खडसावत म्हणाले – समाजात तेढ निर्माण करू नये याचे साधे भान सत्ताधारी पक्षाला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यावरून सत्ताधारी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ताधारी पक्षाची टोकाची जातीयवादी भूमिका आहे. ही भूमिका या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. समाजात तेढ निर्माण करू नये याचे साधे भान या पक्षाला नाही, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला...

अकोल्यातून नरेंद्र मोदींची मतदारांना साद:राम मंदिर, वाढवण बंदरचा उल्लेख; पुन्हा महायुतीला आशीर्वाद देण्याचे आवाहन

अकोल्यातून नरेंद्र मोदींची मतदारांना साद:राम मंदिर, वाढवण बंदरचा उल्लेख; पुन्हा महायुतीला आशीर्वाद देण्याचे आवाहन

9 नोव्हेंबर ही तारीख ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला होता. त्यानंतर देशभरात उत्साह साजरा झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विकासाचा लेखाजोखा मांडला. महाराष्ट्रत वाढवण बंदर तयार झाल्यानंतर हे देशातील सर्वात मोठे बंदर असल्याचे नरेंद्र मोदी...

बाळू धानोरकर यांचा घातपात?:आईच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खबबळ; मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी

बाळू धानोरकर यांचा घातपात?:आईच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खबबळ; मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी

काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाची जाण्याची वेळ नव्हती, त्याच्या मृत्यू मागे घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. निवडणुकीनंतर बाळू धानोरकर यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. बाळू धानोरकर यांच्या घातपातामागे कोण आहे? याची चौकशी करण्याची मागणी...

राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद:तेलंगणा – हिमाचलचे CM, कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार; मोदींच्या आरोपांना उत्तर देणार

राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद:तेलंगणा – हिमाचलचे CM, कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार; मोदींच्या आरोपांना उत्तर देणार

महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही पत्रकार परिषदेत बोलावण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह 2 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री पीएम मोदींनी 1 नोव्हेंबर रोजी केलेल्या...