Category: marathi

राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद:तेलंगणा – हिमाचलचे CM, कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार; मोदींच्या आरोपांना उत्तर देणार

राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद:तेलंगणा – हिमाचलचे CM, कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार; मोदींच्या आरोपांना उत्तर देणार

महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही पत्रकार परिषदेत बोलावण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह 2 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री पीएम मोदींनी 1 नोव्हेंबर रोजी केलेल्या...

ठाकरे गटासोबत पडद्यामागून कुठलीही चर्चा, संपर्क नाही:शिंदेंच्या शिवसेनेसोबत घट्ट मैत्री- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

ठाकरे गटासोबत पडद्यामागून कुठलीही चर्चा, संपर्क नाही:शिंदेंच्या शिवसेनेसोबत घट्ट मैत्री- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

मी स्पष्ट करतो की, पडद्यामागून कुठलीही चर्चा, संवाद, संपर्क करण्यात आलेला नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत अजून मजबुतीने उभे आहोत. त्या शिवसेना गटासोबत आमचा काही एक संबंध नाही, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल स्पष्ट करत ठाकरे गटासोबत युतीच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पीयूष गोयल पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेला युतीने केलेल्या “चांगल्या कामात”...

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये पुन्हा गोंधळ:गवळी शिवरा गावामध्ये वातावरण तापले; प्रश्न विचारणाऱ्या तरुणास धक्काबुक्की

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये पुन्हा गोंधळ:गवळी शिवरा गावामध्ये वातावरण तापले; प्रश्न विचारणाऱ्या तरुणास धक्काबुक्की

गंगापूर मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. गेले काही दिवस भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारसभामध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे. गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी रेल्वे संदर्भात आश्वासन दिले होते अजून आले नाही म्हणत प्रश्न विचारले यानंतर सभेमध्ये गोंधळ झाला. दरम्यान प्रशांत बंब यांनी त्या तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी न ऐकल्याने सभेला उपस्थिती नागरिक आणि तरुणांमध्ये मोठा वाद...

उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर मोठी कारवाई:पक्षविरोधी कारवायांमुळे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी

उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर मोठी कारवाई:पक्षविरोधी कारवायांमुळे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे ठाकरे यांनी पाच नेत्यांची...

‘ते ठाकरे असले तर मी देखील राऊत’:संजय राऊत यांचा थेट राज ठाकरे यांना इशारा; भाजपच्या नादी लागलेला काय बोलणार? म्हणत पलटवार

‘ते ठाकरे असले तर मी देखील राऊत’:संजय राऊत यांचा थेट राज ठाकरे यांना इशारा; भाजपच्या नादी लागलेला काय बोलणार? म्हणत पलटवार

मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे असले तरी मी देखील राऊत आहे, माझे बरेच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गेले आहे. बाळासाहेबांनीच घडवलेला मी राऊत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी मला शिकवण्याची आवश्यकता नसल्यााचे राऊत यांनी म्हटले आहे. ज्याला जी भाषा समजते, ती भाषा मी...

पोलिस काॅलनीतील इमारतीवरून उडी मारणाऱ्या मनोरुग्णाला वाचवले:उपचारासाठी आला होता घाटी रुग्णालयात, तेथून आला पोलिसांच्या वसाहतीत

पोलिस काॅलनीतील इमारतीवरून उडी मारणाऱ्या मनोरुग्णाला वाचवले:उपचारासाठी आला होता घाटी रुग्णालयात, तेथून आला पोलिसांच्या वसाहतीत

पोलिस आयुक्त कार्यालय परिसरातील कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीवरून एका तरुणाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी (8 नोव्हेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. रहिवासी पोलिसांनी त्या तरुणाला सुखरूप वर काढले. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. भरत बाबूराव वनारसी (32, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी) असे तरुणाचे नाव आहे. भरत हा मजुरी करतो. मागील काही दिवसांपासून...

मूलभूत सुविधांअभावी मतदानावर श्रीकृष्णनगर वासीयांचा बहिष्कार:अंजनगाव सुर्जी तालुका प्रशासनाला संतप्त नागरिकांनी दिले निवेदन

मूलभूत सुविधांअभावी मतदानावर श्रीकृष्णनगर वासीयांचा बहिष्कार:अंजनगाव सुर्जी तालुका प्रशासनाला संतप्त नागरिकांनी दिले निवेदन

शहरातील राष्ट्रीय महामार्गाला लगत असलेल्या शहरातील श्रीकृष्ण नगर येथील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला वेळो वेळी निवेदन देऊन सुद्धा मूलभूत सुविधा व समस्यांचे निराकरण न केल्यामुळे निगरगट्ट कारभाराला कंटाळून विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासह तालुका व जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंजनगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. कामादरम्यान या रस्त्याची उंची वाढली. रस्त्याचे काम...

महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील:केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे स्पष्ट संकेत; राजकीय वर्तुळात चर्चा

महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील:केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे स्पष्ट संकेत; राजकीय वर्तुळात चर्चा

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभेत आगामी काळात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भाषण करताना अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत तेच मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच आणायचे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री...

254 किमी सायकल प्रवास करुन शंभुराजेंना अभिवादन:वारी परिवाराची मंगळवेढा- वढू बुद्रूक मोहिमेची सांगता, सायकलस्वारांचा केला गौरव

वारी परिवाराची मंगळवेढा-तुळापूर-वढू बुद्रुक ही ऐतिहासिक सायकल मोहीम खरोखरचं आजच्या तरुणांना आदर्शवत आहे ,असे मत सॅप पार्टसचे पार्थ प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वारी वारी परिवाराच्या मंगळवेढा ते वढू बुद्रुक ऐतिहासिक सायकल मोहीमेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रिता कुलकर्णी, वैशाली कसगावडे, आशा आवताडे, पल्लवी हजारे, अनुसया आवताडे आदी उपस्थित होते. कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, छत्रपती संभाजी महारांजांची तुळापूर...

देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण शिव चरित्रात:विश्व हिंदू परिषदेतर्फे पंढरीत संत संमेलन

देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण शिव चरित्रात:विश्व हिंदू परिषदेतर्फे पंढरीत संत संमेलन

रामायण व महाभारत दोन्ही एक करा, सर्व सद्गुणांचा समुच्चय म्हणजे छत्रपति शिवराय आहेत. शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक हा हिंदुस्थानच्या इतिहासातला सर्वोच्च क्षण असल्याचे मत या कार्यक्रमात महाराजांनी व्यक्त केले. सद्य परिस्थितीत देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ शिवछत्रपतींचे चरित्र हाच एकमेव पर्याय असल्याचे परखड मत यावेळी महाराजांनी व्यक्त केले. पंढरपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले...