Category: marathi

राज्यात 1 लाख 17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता:सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; 29 हजार रोजगार निर्मिती

राज्यात 1 लाख 17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता:सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; 29 हजार रोजगार निर्मिती

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत ८० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात झालेल्या बैठकांमध्ये एकूण दोन लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत दरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे. सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठया प्रमाणात फायदा होईल. स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल जि.रायगड येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे १५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. दरम्यान, ३० जुलै २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये लवकरच ओसॅट, चिप्स निर्मिती सुरू होणार आहे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स व टॉवर सेमीकंडक्टर कंपनी यांच्या प्रकल्पांमुळे प्रगत सेमीकंडक्टरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे याक्षेत्रात महाराष्ट्र भारताच्या अग्रस्थानी राहणार आहे. देशातील वाढती मागणी पुर्ण करणे व सेमीकंडक्टरची इकोसिस्टीम स्थापित करण्यास देखील चालना मिळणार आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होईल. मराठवाडयातील सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे. यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास होण्यास चालना मिळणार आहे. रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. याप्रकल्पात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.

​राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत ८० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात झालेल्या बैठकांमध्ये एकूण दोन लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत दरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे. सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठया प्रमाणात फायदा होईल. स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल जि.रायगड येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे १५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. दरम्यान, ३० जुलै २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये लवकरच ओसॅट, चिप्स निर्मिती सुरू होणार आहे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स व टॉवर सेमीकंडक्टर कंपनी यांच्या प्रकल्पांमुळे प्रगत सेमीकंडक्टरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे याक्षेत्रात महाराष्ट्र भारताच्या अग्रस्थानी राहणार आहे. देशातील वाढती मागणी पुर्ण करणे व सेमीकंडक्टरची इकोसिस्टीम स्थापित करण्यास देखील चालना मिळणार आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होईल. मराठवाडयातील सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे. यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास होण्यास चालना मिळणार आहे. रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. याप्रकल्पात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.  

एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा:म्हणाले- नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पण अधिकृत घोषणा नाही; राज्यातील 2 बड्या नेत्यांचा विरोध

एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा:म्हणाले- नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पण अधिकृत घोषणा नाही; राज्यातील 2 बड्या नेत्यांचा विरोध

एकनाथ खडसेंच्या हाती पुन्हा कमळाचं फुल येणार का? एकीकडे आड अन् दुसरीकडे विहीर अशा संभ्रमावस्थेत खडसे अडकले आहेत. पण आता राजकारणात खडबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा केला की, माझा भाजप पक्षप्रवेश हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झाला आहे. परंतु आपल्या अधिकृत प्रवेशाला महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा विरोध असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. खडसे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी उद्विग्नता व्यक्त केला होती. तर आज खडसे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचे सांगितले आहे. प्रवेश करूनही जाहीर केले नाही-खडसे खडसे म्हणाले की, भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपला माझी आवश्यकता नाही, असं वाटत आहे. मी काही अडचणींमुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अडचणी अजून आहेत. तसं आश्वासन मला भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र भाजपला तर माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस-महाजन पक्षात मोठे-खडसे ते पुढे म्हणाले- मी संभ्रमावस्थेत आहे मी आधीच सांगितलं आहे. पण भाजपने मला घेतले नाही तर मी राष्ट्रवादीत जाईन. जाईन म्हणजे मी राष्ट्रवादीचा सदस्यच आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. भाजपमधल्या काही लोकांनी मला प्रवेशासंदर्भात संपर्क केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन विरोध करत असतील तर मला असं वाटतं जे. पी नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि फडणवीस पक्षामध्ये मोठे असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. खडसेंनी व्यक्त केली होती उद्विग्नता एकनाथ खडसे यांनी नुकतेच भाजप प्रवेशाबद्दल उद्विग्नता व्यक्त केली होती. तुम्हाला भाजपकडून काहीतरी मोठी जबाबदारी मिळणार आहे ते खरं आहे का? असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, मोठी जबाबदारी मिळेल त्यावेळेस खरं, अशी माझी भूमिका आहे. त्याबाबत कुठलीही सूचना मला आलेली नाही. किंबहुना भाजपमध्ये प्रवेशाबाबत निर्णय झाला नाही तर पुढच्या मोठ्या जबाबदारीचा विचार काय करत बसायचा? आज मला भाजपमध्ये प्रवेश करायचा तर चार महिने वाट पाहावी लागते. यापेक्षा मला असं वाटतं की आपलं आपलं घरी बसावं आणि आपलं काम करावं. चार महिने झाले.

​एकनाथ खडसेंच्या हाती पुन्हा कमळाचं फुल येणार का? एकीकडे आड अन् दुसरीकडे विहीर अशा संभ्रमावस्थेत खडसे अडकले आहेत. पण आता राजकारणात खडबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा केला की, माझा भाजप पक्षप्रवेश हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झाला आहे. परंतु आपल्या अधिकृत प्रवेशाला महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा विरोध असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. खडसे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी उद्विग्नता व्यक्त केला होती. तर आज खडसे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचे सांगितले आहे. प्रवेश करूनही जाहीर केले नाही-खडसे खडसे म्हणाले की, भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपला माझी आवश्यकता नाही, असं वाटत आहे. मी काही अडचणींमुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अडचणी अजून आहेत. तसं आश्वासन मला भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र भाजपला तर माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस-महाजन पक्षात मोठे-खडसे ते पुढे म्हणाले- मी संभ्रमावस्थेत आहे मी आधीच सांगितलं आहे. पण भाजपने मला घेतले नाही तर मी राष्ट्रवादीत जाईन. जाईन म्हणजे मी राष्ट्रवादीचा सदस्यच आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. भाजपमधल्या काही लोकांनी मला प्रवेशासंदर्भात संपर्क केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन विरोध करत असतील तर मला असं वाटतं जे. पी नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि फडणवीस पक्षामध्ये मोठे असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. खडसेंनी व्यक्त केली होती उद्विग्नता एकनाथ खडसे यांनी नुकतेच भाजप प्रवेशाबद्दल उद्विग्नता व्यक्त केली होती. तुम्हाला भाजपकडून काहीतरी मोठी जबाबदारी मिळणार आहे ते खरं आहे का? असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, मोठी जबाबदारी मिळेल त्यावेळेस खरं, अशी माझी भूमिका आहे. त्याबाबत कुठलीही सूचना मला आलेली नाही. किंबहुना भाजपमध्ये प्रवेशाबाबत निर्णय झाला नाही तर पुढच्या मोठ्या जबाबदारीचा विचार काय करत बसायचा? आज मला भाजपमध्ये प्रवेश करायचा तर चार महिने वाट पाहावी लागते. यापेक्षा मला असं वाटतं की आपलं आपलं घरी बसावं आणि आपलं काम करावं. चार महिने झाले.  

उमरेड – भिवापूर रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात:4 जागीच ठार, 22 प्रवासी जखमी; ट्रॅव्हल्स रेशनच्या उभ्या ट्रकला धडकल्याने झाला अपघात

उमरेड – भिवापूर रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात:4 जागीच ठार, 22 प्रवासी जखमी; ट्रॅव्हल्स रेशनच्या उभ्या ट्रकला धडकल्याने झाला अपघात

उमरेड – भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील तास शिवारात एका भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील 4 प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला, तर 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडे 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स (एम.एच. 49 जे. 8616) नागपूर येथून चंद्रपूरच्या भिवापूरकडे जात होती. ती तास शिवारातील बसथांबा परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या एका ट्रकला (एम.एच. 31 ए.पी. 2966) धडकली. या ट्रकमध्ये रेशनचे धान्य होते. ट्रकच्या बाजूलाच एक पाणटपरी होती. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स हा ट्रक व सदर पाणटपरीला धडकत शेजारच्या शेतात शिरली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 1 महिला व एका मुलासह 2 पुरुष असे एकूण 4 जण जागीच ठार झाले. हे सर्वजण ट्रॅव्हल्सच्या खाली दबले गेले होते. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हलच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला होता. तसेच समोरची दोन्ही चाकेही निखळून पडली होती. मृतांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी 1, तर कन्हाळगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. इतर एका प्रवाशाची ओळख पटली नाही. या अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती.

​उमरेड – भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील तास शिवारात एका भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील 4 प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला, तर 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडे 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स (एम.एच. 49 जे. 8616) नागपूर येथून चंद्रपूरच्या भिवापूरकडे जात होती. ती तास शिवारातील बसथांबा परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या एका ट्रकला (एम.एच. 31 ए.पी. 2966) धडकली. या ट्रकमध्ये रेशनचे धान्य होते. ट्रकच्या बाजूलाच एक पाणटपरी होती. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स हा ट्रक व सदर पाणटपरीला धडकत शेजारच्या शेतात शिरली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 1 महिला व एका मुलासह 2 पुरुष असे एकूण 4 जण जागीच ठार झाले. हे सर्वजण ट्रॅव्हल्सच्या खाली दबले गेले होते. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हलच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला होता. तसेच समोरची दोन्ही चाकेही निखळून पडली होती. मृतांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी 1, तर कन्हाळगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. इतर एका प्रवाशाची ओळख पटली नाही. या अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती.  

लाडकी बहीण योजनेचे 2 हजार रुपये देणार:मल्लिकार्जुन खरगे यांनी केली घोषणा, म्हणाले- महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देश जिंकणार

लाडकी बहीण योजनेचे 2 हजार रुपये देणार:मल्लिकार्जुन खरगे यांनी केली घोषणा, म्हणाले- महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देश जिंकणार

लाडकी बहीण योजनेची चर्चा राज्यभर जोरदार सुरू आहे. तसेच विरोधकांकडूनही या योजनेवर टीकास्त्र डागलं जात आहे. आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या लाडकी बहीण योजनेवरून मोठी घोषणाच केली आहे. आमचे सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन सांगलीत बोलतांना खरगे यांनी दिले. खरी शिवसेना-राष्ट्रवादी आमच्यासोबत-खरगे
खरगे पुढे म्हणाले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीही आमच्यासोबत आहे. त्यांच्या बाजूने जे आहेत, ते सर्व नकली आहेत. मोदी सरकार केवळ तोडण्याच्या अन् फोडण्याच्याच गोष्टी करते. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केले आहे का? मोदींसमोर तुम्ही तुमचा सन्मान गहाण ठेवणार आहात का? महाराष्ट्र जर जिंकला तर संपूर्ण देश जिंकेल आणि लवकरच भाजपचे सरकार जाणार असा हल्लाबोलही त्यांनी केला. …तर भाजपचं सरकार दिसलं नसतं- खरगे
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर पुतळा पडला. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली तर मंदिर गळायला लागले. गुजरातच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पुलही कोसळला. मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकरात लवकर बनवण्यात आला आणि घाईघाईत केलेल्या या कामामुळेच हा पुतळा कोसळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले जे काही बनवत आहे, ते सर्वकाही कोसळतंय. शाळेतील अभ्यासक्रमही ते बदलत आहेत. संविधान बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र आम्हाला जर आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर तुम्हाला आज मोदी सरकार दिसले नसते, असा दावाही खरगे यांनी केला. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजित कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकले, असे सांगत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. ही बातमी पण वाचा… चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो:राहुल गांधींचा PM मोदींच्या माफीनाम्यावर घणाघात; माफी का मागितली? सांगितली 3 कारणे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सांगली येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आयोजित सभेत राहुल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर सडकून टीका केली. चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर बातमी…

​लाडकी बहीण योजनेची चर्चा राज्यभर जोरदार सुरू आहे. तसेच विरोधकांकडूनही या योजनेवर टीकास्त्र डागलं जात आहे. आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या लाडकी बहीण योजनेवरून मोठी घोषणाच केली आहे. आमचे सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन सांगलीत बोलतांना खरगे यांनी दिले. खरी शिवसेना-राष्ट्रवादी आमच्यासोबत-खरगे
खरगे पुढे म्हणाले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीही आमच्यासोबत आहे. त्यांच्या बाजूने जे आहेत, ते सर्व नकली आहेत. मोदी सरकार केवळ तोडण्याच्या अन् फोडण्याच्याच गोष्टी करते. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केले आहे का? मोदींसमोर तुम्ही तुमचा सन्मान गहाण ठेवणार आहात का? महाराष्ट्र जर जिंकला तर संपूर्ण देश जिंकेल आणि लवकरच भाजपचे सरकार जाणार असा हल्लाबोलही त्यांनी केला. …तर भाजपचं सरकार दिसलं नसतं- खरगे
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर पुतळा पडला. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली तर मंदिर गळायला लागले. गुजरातच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पुलही कोसळला. मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकरात लवकर बनवण्यात आला आणि घाईघाईत केलेल्या या कामामुळेच हा पुतळा कोसळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले जे काही बनवत आहे, ते सर्वकाही कोसळतंय. शाळेतील अभ्यासक्रमही ते बदलत आहेत. संविधान बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र आम्हाला जर आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर तुम्हाला आज मोदी सरकार दिसले नसते, असा दावाही खरगे यांनी केला. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजित कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकले, असे सांगत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. ही बातमी पण वाचा… चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो:राहुल गांधींचा PM मोदींच्या माफीनाम्यावर घणाघात; माफी का मागितली? सांगितली 3 कारणे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सांगली येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आयोजित सभेत राहुल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर सडकून टीका केली. चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर बातमी…  

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास शिवाजी महाराजांचे नाव:कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय, दादा भुसेंची होती मागणी

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास शिवाजी महाराजांचे नाव:कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय, दादा भुसेंची होती मागणी

नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी काष्टी ता.मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मंत्री भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागास केल्या होत्या. त्यानुसार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ निर्णय घेत काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे नाव बदलून आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी ता.मालेगाव जि.नाशिक’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलात दरवर्षी सुमारे 320 विद्यार्थी प्रवेश घेतात तर साधारण 4 वर्षांमध्ये 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अध्यायवत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच त्याचा तळागाळात योग्य प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने हे कृषी विज्ञान संकुल अत्यंत उपयुक्त असून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या कृषी विज्ञान संकुलास दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

​नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी काष्टी ता.मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मंत्री भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागास केल्या होत्या. त्यानुसार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ निर्णय घेत काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे नाव बदलून आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी ता.मालेगाव जि.नाशिक’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलात दरवर्षी सुमारे 320 विद्यार्थी प्रवेश घेतात तर साधारण 4 वर्षांमध्ये 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अध्यायवत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच त्याचा तळागाळात योग्य प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने हे कृषी विज्ञान संकुल अत्यंत उपयुक्त असून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या कृषी विज्ञान संकुलास दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.  

उद्धव ठाकरे गटाचे 22 शिलेदार ठरले:मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी समोर, नव्या जुन्यांचा मेळ; आदित्य ठाकरे वरळीतूनच लढणार

उद्धव ठाकरे गटाचे 22 शिलेदार ठरले:मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी समोर, नव्या जुन्यांचा मेळ; आदित्य ठाकरे वरळीतूनच लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील आपले 22 उमेदवार निश्चित केलेत. यासंबंधीची एक यादी समोर आली असून, ती जवळपास अंतिम असल्याचे सांगितले जात आहे. या यादीनुसार, आदित्य ठाकरे हे आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघातूनच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराशी दोनहात करतील. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी दीपावलीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई विभागावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार, या पक्षाने मुंबईतील 36 पैकी 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. या जागांवरील संभाव्य उमेदवारांची एक यादी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गट या उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी याविषयी बोलताना ही यादी अंतिम नव्हे तर संभाव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर यादी अंतिम नव्हे तर संभाव्य आहे. या यादीद्वारे शिवसेना विद्यमान आमदारांसह तरुणांनाही संधी देत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे. पण त्यात जुने-जाणते लोक असणेही तेवढेच गरजेचे आहे. या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन संयुक्त शिवसेनेने मुंबईतील 14 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर यंदा झालेल्या लोकसबा निवडणुकीत ठाकरे गटाने येथील 3 जागा जिंकल्या होत्या, तर चौथ्या जागेवर त्यांचा निसटता पराभव झाला होता. खाली वाचा संभाव्य उमेदवारांची यादी वरळी – आदित्य ठाकरे
दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
दिंडोशी – सुनील प्रभू
विक्रोळी – सुनील राऊत
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
कलिना – संजय पोतनीस
कुर्ला – प्रविणा मोरजकर
वडाळा – श्रद्धा जाधव
चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
घाटकोपर – सुरेश पाटील
मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी जोगेश्वरी – अमोल कीर्तिकर
चारकोप – नीरव बारोट
गोरेगाव – समीर देसाई
भांडूप – रमेश कोरगांवकर
चांदिवली – ईश्वर तायडे
दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील आपले 22 उमेदवार निश्चित केलेत. यासंबंधीची एक यादी समोर आली असून, ती जवळपास अंतिम असल्याचे सांगितले जात आहे. या यादीनुसार, आदित्य ठाकरे हे आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघातूनच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराशी दोनहात करतील. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी दीपावलीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई विभागावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार, या पक्षाने मुंबईतील 36 पैकी 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. या जागांवरील संभाव्य उमेदवारांची एक यादी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गट या उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी याविषयी बोलताना ही यादी अंतिम नव्हे तर संभाव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर यादी अंतिम नव्हे तर संभाव्य आहे. या यादीद्वारे शिवसेना विद्यमान आमदारांसह तरुणांनाही संधी देत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे. पण त्यात जुने-जाणते लोक असणेही तेवढेच गरजेचे आहे. या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन संयुक्त शिवसेनेने मुंबईतील 14 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर यंदा झालेल्या लोकसबा निवडणुकीत ठाकरे गटाने येथील 3 जागा जिंकल्या होत्या, तर चौथ्या जागेवर त्यांचा निसटता पराभव झाला होता. खाली वाचा संभाव्य उमेदवारांची यादी वरळी – आदित्य ठाकरे
दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
दिंडोशी – सुनील प्रभू
विक्रोळी – सुनील राऊत
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
कलिना – संजय पोतनीस
कुर्ला – प्रविणा मोरजकर
वडाळा – श्रद्धा जाधव
चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
घाटकोपर – सुरेश पाटील
मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी जोगेश्वरी – अमोल कीर्तिकर
चारकोप – नीरव बारोट
गोरेगाव – समीर देसाई
भांडूप – रमेश कोरगांवकर
चांदिवली – ईश्वर तायडे
दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे  

मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण:संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांची आघाडी; छत्रपती संभाजीराजे म्हणाले- जनतेला नवा पर्याय देणार

मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण:संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांची आघाडी; छत्रपती संभाजीराजे म्हणाले- जनतेला नवा पर्याय देणार

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राजकारणातील हालचालींना वेग आलेला आहे. आता महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. यात छत्रपती संभाजीराजे भोसले आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणाच छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल करणार-संभाजीराजे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या 75 वर्षात नुसते हेवेदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला, त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील 15-20 दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय घेऊन समोर येत आहोत. ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे. नवा पर्याय लोकांसमोर देणार-संभाजीराजे संभाजीराजे म्हणाले- निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत. प्रहारसोबतही बोलणी सुरू ते पुढे बोलतांना म्हणाले की, प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी 2 बैठका घ्याव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. जरांगे सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षा राजू शेट्टींसोबतही आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं, ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. महाराष्ट्रात नळावरची भांडणे सुरू आहेत-राजरत्न आंबेडकर या नवीन समीकरणावर राजरत्न आंबेडकर म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण 5 वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे.

​महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राजकारणातील हालचालींना वेग आलेला आहे. आता महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. यात छत्रपती संभाजीराजे भोसले आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणाच छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल करणार-संभाजीराजे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या 75 वर्षात नुसते हेवेदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला, त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील 15-20 दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय घेऊन समोर येत आहोत. ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे. नवा पर्याय लोकांसमोर देणार-संभाजीराजे संभाजीराजे म्हणाले- निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत. प्रहारसोबतही बोलणी सुरू ते पुढे बोलतांना म्हणाले की, प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी 2 बैठका घ्याव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. जरांगे सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षा राजू शेट्टींसोबतही आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं, ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. महाराष्ट्रात नळावरची भांडणे सुरू आहेत-राजरत्न आंबेडकर या नवीन समीकरणावर राजरत्न आंबेडकर म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण 5 वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे.  

आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय स्टंटबाजी:संजय शिरसाट यांचा दावा, पवारांनी ठाकरेंना संपवण्याचा कट आखल्याचा आरोप

आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय स्टंटबाजी:संजय शिरसाट यांचा दावा, पवारांनी ठाकरेंना संपवण्याचा कट आखल्याचा आरोप

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत पाहणी दौरा केला. मात्र त्यांचा हा दौरा म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांना शेतीतले काही कळत नसून केवळ एक दिवस यायचे आणि पाहून जायचे असा हा दौरा असल्याची टीका संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट होता.आदित्य यांना गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याची कोणतीही माहिती नाही. केवळ दोन-चार गावात येऊन पाहणी करून फोटो काढून आम्ही शेतकरी यांच्या पाठीशी आहोत असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना संपवण्याचा डाव यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना संपवण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका मांडली. त्यानंतर नाना पटोले यांनी देखील हीच भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पवारांनीच बोलायला लावले आणि त्याला मूक संमती दिली होती. आता पवार यांनी ज्यांचे जास्त जागा आमदार त्यांचा मुख्यमंत्री भूमिका मांडली आहे. पवार ठाकरे गटाला संपवण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. लाडकी बहिणी योजनेच्या श्रेय घेण्याच्या वादावरून महायुती मध्ये देखील कुठलाही वाद होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही शिरसाट यांनी यावेळी दिला.

​शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत पाहणी दौरा केला. मात्र त्यांचा हा दौरा म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांना शेतीतले काही कळत नसून केवळ एक दिवस यायचे आणि पाहून जायचे असा हा दौरा असल्याची टीका संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट होता.आदित्य यांना गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याची कोणतीही माहिती नाही. केवळ दोन-चार गावात येऊन पाहणी करून फोटो काढून आम्ही शेतकरी यांच्या पाठीशी आहोत असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना संपवण्याचा डाव यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना संपवण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका मांडली. त्यानंतर नाना पटोले यांनी देखील हीच भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पवारांनीच बोलायला लावले आणि त्याला मूक संमती दिली होती. आता पवार यांनी ज्यांचे जास्त जागा आमदार त्यांचा मुख्यमंत्री भूमिका मांडली आहे. पवार ठाकरे गटाला संपवण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. लाडकी बहिणी योजनेच्या श्रेय घेण्याच्या वादावरून महायुती मध्ये देखील कुठलाही वाद होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही शिरसाट यांनी यावेळी दिला.  

जयदीप आपटेवर होणार कठोर कारवाई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचा केला दावा

जयदीप आपटेवर होणार कठोर कारवाई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचा केला दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. आता त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सर्वचजण समान आहेत, असे ते म्हणालेत. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे 26 ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून फरार होता. त्याच्या बुधवारी रात्री मुसक्या आवळण्यात आल्या. या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. जयदीप आपटेची चौकशी केली जाईल. त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केले तो प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी तर संजय राऊत यांना ठाण्यातील एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा दिल्लीतील नेते मातोश्रीवर भेटण्यास येत होते पण आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत जावे लागत आहे. दिल्लीत जाऊन मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगावे लागत आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर अशी परिस्थिती होते. आम्ही विकासावर भर दिला, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. हे ही वाचा… शिल्पकार जयदीप आपटे नेमका कसा सापडला?:लोकलने आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; वकिलाने केला सरेंडर केल्याचा दावा मुंबई – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी केवळ संशयाच्या बळावर त्याला त्याच्या नावाने हाक मारली अन् त्याने मागे वळून पाहिले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. वाचा सविस्तर

​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. आता त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सर्वचजण समान आहेत, असे ते म्हणालेत. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे 26 ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून फरार होता. त्याच्या बुधवारी रात्री मुसक्या आवळण्यात आल्या. या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. जयदीप आपटेची चौकशी केली जाईल. त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केले तो प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी तर संजय राऊत यांना ठाण्यातील एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा दिल्लीतील नेते मातोश्रीवर भेटण्यास येत होते पण आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत जावे लागत आहे. दिल्लीत जाऊन मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगावे लागत आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर अशी परिस्थिती होते. आम्ही विकासावर भर दिला, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. हे ही वाचा… शिल्पकार जयदीप आपटे नेमका कसा सापडला?:लोकलने आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; वकिलाने केला सरेंडर केल्याचा दावा मुंबई – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी केवळ संशयाच्या बळावर त्याला त्याच्या नावाने हाक मारली अन् त्याने मागे वळून पाहिले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. वाचा सविस्तर  

हिंगोलीत आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा:राज्यात अनुशेषाची ५५६८७ पदे भरण्याची मागणी, हजारो आदिवासी बांधवांचा सहभाग

हिंगोलीत आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा:राज्यात अनुशेषाची ५५६८७ पदे भरण्याची मागणी, हजारो आदिवासी बांधवांचा सहभाग

राज्यात विविध शासकिय कार्यालयांमधील अनुशेषाची ५५६८७ रिक्तपदे तातडीने भरावीत यासह इतर मागण्यांसाठी हिंगोलीत हजारो आदिवासी बांधवांनी गुरुवारी ता. ५ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने आयोजित मोर्चात जिल्हाभरातील आदिवासी बांधव सहभागी होते. मोर्चाच महिलांची संख्याही लक्षणीय होती. हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. हिंगोली तालुक्यासह कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील आदिवासी बांधव मोर्चात सहभागी होण्याची खाजगी वाहने घेऊन हिंगोलीत दाखल झाले होते. यावेळी माजीमंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी जिल्हापरिषद सदस्य तथा आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, राम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी आदिवासी बांधवांनी केलेल्या घोषणाबाजीने हिंगोलीचा परिसर दुमदुमला होता. हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. राज्यातील १२५०० अधिसंख्य पदे विशेष मोहिमेद्वारे भरावीत, अनुशेषाची ५५६८७ पदे तातडीने भरावीत. नाम साधर्म्याचा गैरफायदा घेऊन बनावट आदिवासी प्रमाणपत्र, जातपडताळणी प्रमाणपत्रे याची तपासणी केलेल्या समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरतांनाच जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे, आयुक्त राजेंद्र भारूड यांच्यावर बनावट आदिवासींनी दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना संरक्षण द्यावे यासह इतर मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चासाठी आदिवासी युवक कल्याण संघाचे तालुकाध्यक्ष बबन डुकरे, काळूराम कुरुडे, मारोतराव बेले, संजय काळे, कृष्णा पिंपरे, चंद्रशेखर खोकले, शेकुराव मोकाडे यांच्यासह युवक कल्याण संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

​राज्यात विविध शासकिय कार्यालयांमधील अनुशेषाची ५५६८७ रिक्तपदे तातडीने भरावीत यासह इतर मागण्यांसाठी हिंगोलीत हजारो आदिवासी बांधवांनी गुरुवारी ता. ५ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने आयोजित मोर्चात जिल्हाभरातील आदिवासी बांधव सहभागी होते. मोर्चाच महिलांची संख्याही लक्षणीय होती. हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. हिंगोली तालुक्यासह कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील आदिवासी बांधव मोर्चात सहभागी होण्याची खाजगी वाहने घेऊन हिंगोलीत दाखल झाले होते. यावेळी माजीमंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी जिल्हापरिषद सदस्य तथा आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, राम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी आदिवासी बांधवांनी केलेल्या घोषणाबाजीने हिंगोलीचा परिसर दुमदुमला होता. हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. राज्यातील १२५०० अधिसंख्य पदे विशेष मोहिमेद्वारे भरावीत, अनुशेषाची ५५६८७ पदे तातडीने भरावीत. नाम साधर्म्याचा गैरफायदा घेऊन बनावट आदिवासी प्रमाणपत्र, जातपडताळणी प्रमाणपत्रे याची तपासणी केलेल्या समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरतांनाच जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे, आयुक्त राजेंद्र भारूड यांच्यावर बनावट आदिवासींनी दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना संरक्षण द्यावे यासह इतर मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चासाठी आदिवासी युवक कल्याण संघाचे तालुकाध्यक्ष बबन डुकरे, काळूराम कुरुडे, मारोतराव बेले, संजय काळे, कृष्णा पिंपरे, चंद्रशेखर खोकले, शेकुराव मोकाडे यांच्यासह युवक कल्याण संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.