Category: marathi

संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना धक्का:तनवाणी समर्थकांचे राजीनामे; दोन माजी नगरसेवकांसह 18 पदाधिकाऱ्यांचा समावेश

संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना धक्का:तनवाणी समर्थकांचे राजीनामे; दोन माजी नगरसेवकांसह 18 पदाधिकाऱ्यांचा समावेश

शहरातील उद्धवसेनेला गटबाजीने घेरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होते आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. शहरात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते असताना गटबाजी संपत नाही. एका समाजालाच पदे दिली जात असल्याचा आरोप करीत तनवाणी गटातील 18 पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (7 नोव्हेंबर) उद्धवसेना सोडली. उपजिल्हाप्रमुख सचिन जव्हेरी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. शिवसेना ठाकरे गटातर्फे...

मोदींची आज महाराष्ट्रात पहिली सभा:धुळे आणि नाशिकमध्ये मतदारांशी संवाद साधणार; तर अमित शहांच्याही चार सभा

मोदींची आज महाराष्ट्रात पहिली सभा:धुळे आणि नाशिकमध्ये मतदारांशी संवाद साधणार; तर अमित शहांच्याही चार सभा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान धुळ्यात जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांव्यतिरिक्त अमित शहा यांच्याही राज्यात चार सभा आहेत. महाराष्ट्रात 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. भाजप महायुतीसोबत निवडणूक लढवत आहे. भाजपने 148, शिंदे गटाने...

टीव्ही सेंटर-भिस्तबाग रस्त्यावर पॅचिंगच्या कामाला अखेर सुरुवात:ठेकेदारावर कारवाई करण्यास महानगरपालिकेकडून टाळाटाळ

टीव्ही सेंटर-भिस्तबाग रस्त्यावर पॅचिंगच्या कामाला अखेर सुरुवात:ठेकेदारावर कारवाई करण्यास महानगरपालिकेकडून टाळाटाळ

अहिल्यानगर सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला टीव्ही सेंटर ते भिस्तबाग रस्त्याची कामानंतर अवघ्या काही महिन्यात दुरवस्था झाली होती. मनपाने वारंवार नोटिसा बजावूनही ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. अखेर महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या ठेकेदारावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी महापालिकेने नगरोत्थान योजनेवरील व्याजाच्या...

काळाच्या ओघात लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर:जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक लेण्यांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरवस्था

काळाच्या ओघात लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर:जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक लेण्यांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरवस्था

जगाच्या पाठीवर कमीत कमी भूभागावर सर्वाधिक लेण्या असणारे एकमेव ठिकाण म्हणजे जुन्नर तालुका! मात्र, येथील सर्वच लेण्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे काळाच्या ओघात या लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून, सध्या भग्नावस्थेत उभ्या आहेत. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळ असणाऱ्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराच्या काही अंतरावर एक भूसपाटीला असणाऱ्या खडकात एक प्राचीन लेणी कोरलेली आहे. या...

प्रेयसीच्या पतीच्या खुनाबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा:खर्डा येथील घटना, मृताची पत्नी व एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

प्रेयसीच्या पतीच्या खुनाबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा:खर्डा येथील घटना, मृताची पत्नी व एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या प्रियकरास श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा व १३ हजार रुपये दंड केला. कृष्णा संजय सुर्वे, असे जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील मृताच्या पत्नीसह दोघांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या घटनेत विशाल ईश्वर सुर्वे (वय २६, रा. खर्डा, ता. जामखेड) याचा मृत्यू झाला...

कारखान्यांची धुराडी पेटली, ऊसतोड कामगार निवडणुकीच्या प्रचारात दंग:श्रीगोंद्यातील कारखान्याचे हंगाम सुरू, मजूर आणताना मुकादमांची दमछाक

कारखान्यांची धुराडी पेटली, ऊसतोड कामगार निवडणुकीच्या प्रचारात दंग:श्रीगोंद्यातील कारखान्याचे हंगाम सुरू, मजूर आणताना मुकादमांची दमछाक

हिवाळ्याला सुरुवात होत असताना, तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटू लागली आहेत. दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आपला गाव सोडून कारखान्याच्या दिशेने निघतात. त्यासाठी जुलै, ऑगस्टमध्येच मुकादमांनी ऊसतोड कामगारांसोबत करार केलेले असतात. दसरा, दिवाळीला उचल घेतली जाते. मात्र, अनेकदा परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी जाण्यास अनेक कामगार टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांना कामावर आणताना मुकादमांच्या नाकीनऊ येते. यंदा कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याच्या काळातच विधानसभा निवडणुकीची...

“मानवसेवा’ला किराणा व भेटवस्तू:स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

“मानवसेवा’ला किराणा व भेटवस्तू:स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

सोनेवाडी येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळामार्फत मनोरुग्ण लोकांसाठी मानव सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून मनोरुग्णांची सेवा केली जाते. येथे ८० ते ८५ मनोरुग्ण आहेत. ५० ते ६० महिला म्हणून रुग्ण आहेत. यात बाहेर राज्यातील ही रुग्ण आहेत. या प्रकल्पास रेल्वे स्टेशन येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सामाजिक भावनेतून संघाचे अध्यक्ष के डी खानदेशे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नानासाहेब दळवी व शामला साठे यांच्या हस्ते...

दीपोत्सवातून स्नेह वृद्धिंगत करण्याचे काम होतेय- न्या. एस. व्ही. यार्लगड्डा:वकील संघाद्वारे जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात दीपोत्सव कार्यक्रम थाटात

दीपोत्सवातून स्नेह वृद्धिंगत करण्याचे काम होतेय- न्या. एस. व्ही. यार्लगड्डा:वकील संघाद्वारे जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात दीपोत्सव कार्यक्रम थाटात

जिल्हा वकील संघाला दीपोत्सव एक उत्तम सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. या माध्यमातून वकील संघ स्नेह वृध्दींगत करण्याचे एक चांगले कार्य सातत्याने दरवर्षी करीत असते. अमरावती वकील संघाची ही परंपरा सांस्कृतिक सौहार्दाला चालना देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा यांनी केले. वकील संघाद्वारे नुकतेच दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद््घाटक म्हणून मार्गदर्शन करताना...

दिव्य मराठी विशेष:5.94 लाख पशुधनांचे इअर टॅगिंग, जिल्ह्यातील पशुधनाची माहिती एकाच पोर्टलवर

दिव्य मराठी विशेष:5.94 लाख पशुधनांचे इअर टॅगिंग, जिल्ह्यातील पशुधनाची माहिती एकाच पोर्टलवर

अमरावती गोवंशांचे जतन करून त्यांची तस्करी व कत्तल रोखण्यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या धर्तीवर पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व पशुंचे इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे शासनाने बंधनकारक केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ५ लाख ९४ हजार पशुधनाची इअर टॅगिंग करण्यात आले आहे. तत्पूर्वी यापुढे इअर टॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच...

आता सोयाबीन, कापसाला भाव अन् नुकसान भरपाई मिळते का?:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल

आता सोयाबीन, कापसाला भाव अन् नुकसान भरपाई मिळते का?:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल

आमचे (मविआ) सरकार असताना सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळत होता. शेतीच्या नुकसानीची भरपाईही वेळेवर मिळत होती. आता असे होते का, असे विचारताच नागरिकांनी नकाराचा सूर आवळत त्या सरकारात मिळत होते, याला हात उंचावून होकारार्थी ‌उत्तर दिले. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. ७) वलगाव, दर्यापूर आणि बडनेरा येथे मविआ उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते....