Category: marathi

प्रचाराचा स्तर घसरला:चेहऱ्या-चेहऱ्यांचा चक्रव्यूह, शरद पवारांच्या चेहऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून युती संकटात

प्रचाराचा स्तर घसरला:चेहऱ्या-चेहऱ्यांचा चक्रव्यूह, शरद पवारांच्या चेहऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून युती संकटात

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजशी धार चढत आहे, तसतसा टीकेचा स्तर खूपच घसरत चालला आहे. राज्यासमोरील प्रमुख समस्या व गंभीर मुद्दे बाजूला ठेवून सर्वपक्षीय पुुढारी प्रतिस्पर्धी नेत्यांच्या चेहऱ्यांना टार्गेट करण्यातच धन्यता मानत आहेत. यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागले आहे. राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणारे रयत क्रांती संघटनेचे नेते व भाजपच्या कोट्यातील विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर...

निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची माहिती दडवली:92 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, सिल्लोडमधील 69 पैकी 30 शाळा मंत्री सत्तार यांच्याशी संबंधित

निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची माहिती दडवली:92 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, सिल्लोडमधील 69 पैकी 30 शाळा मंत्री सत्तार यांच्याशी संबंधित

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती दडवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२ शाळांच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. या ९२ पैकी ६० शाळा या सिल्लोड तालुक्यातील आहेत. त्यापैकी ३० शाळा मंत्री तथा शिंदे सेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याशी नॅशनल एज्युकेशन सोसायटी आणि प्रगती शिक्षण संस्थेच्या आहेत. गुरूवारी सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात सत्तार यांच्या...

शिवाजी मैदानावरून ठाकरे बंधूंत कुस्ती:मनसे, उद्धवसेनेचे मनपाकडे अर्ज

शिवाजी मैदानावरून ठाकरे बंधूंत कुस्ती:मनसे, उद्धवसेनेचे मनपाकडे अर्ज

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्कचे मैदान प्रचारसभेकरिता मिळण्यासाठी उद्धवसेना आणि मनसेनेे मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. त्याच दिवशी ठाकरे बंधू शिवाजी पार्कसाठी आग्रही असल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या परवानगीचा प्रस्ताव...

महाभारत:दिव्य मराठीत प्रथमच प्रश्न तुमचे अन् उत्तरे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांची

महाभारत:दिव्य मराठीत प्रथमच प्रश्न तुमचे अन् उत्तरे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांची

दिव्य मराठीत प्रथमच प्रश्न तुमचे अन‌् उत्तरे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी राज्यभर आंदोलने केली. हे दोन्ही नेते आपापल्या समाजाचे प्रश्न मांडताहेत. पण त्यांच्या भूमिकेविषयीही सामान्य माणसालाही काही प्रश्न आहेत. ते या दोघांना थेट विचारण्याची संधी ‘दिव्य मराठी’ तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. यापैकी ज्या निवडक प्रश्नांना जरांगे...

आपल्या 16 व्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास:अशोक चव्हाणांकडे ज्या वेगाने CM पद आले, त्याच वेगाने ते गेले

आपल्या 16 व्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास:अशोक चव्हाणांकडे ज्या वेगाने CM पद आले, त्याच वेगाने ते गेले

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र. ते काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते होते. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ‘काँग्रेसमध्ये असेपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाने मला खूप काही दिले, तसे मी ही पक्षाला खूप काही दिले’, असे ते काँग्रेस सोडताना म्हणाले. काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे...

फडणवीसांचे ऐकून मराठ्यांचा नादाला लागू नका:मनोज जरांगे यांचा राज ठाकरे यांना इशारा, म्हणाले- समाजाचे अस्तित्व कसे वाढवायचे ते मला चांगले माहिती

फडणवीसांचे ऐकून मराठ्यांचा नादाला लागू नका:मनोज जरांगे यांचा राज ठाकरे यांना इशारा, म्हणाले- समाजाचे अस्तित्व कसे वाढवायचे ते मला चांगले माहिती

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही टीकास्त्र डागले आहे. फडणवीसांचे ऐकून तुम्ही मराठ्यांचा नादाला लागू नका. मराठा समाजाचे अस्तित्व कसे वाढवायचे ते मला चांगलेच माहिती असल्याचेही जरांगे यावेळी म्हणालेत. मनोज जरांगे म्हणाले की, राज ठाकरे यांनी फडणवीसांचे ऐकून या लफड्यात पडू नये. तुम्ही माझ्या नादी लागू नका आणि पुन्हा मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलू नका, असे...

अपयशी ठरलो तर दुकान बंद करणार – राज ठाकरे:एकदा संधी देण्याचे भावनिक आवाहन, म्हणाले – जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार

अपयशी ठरलो तर दुकान बंद करणार – राज ठाकरे:एकदा संधी देण्याचे भावनिक आवाहन, म्हणाले – जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार

देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची दशा होऊन बसली. तुमचा स्वाभिमानी कणा हा मतदानाशिवाय जागृत राहायला पाहिजे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा असल्याचे मी 2006 च्या माझ्या पहिल्या सभेत सांगितल्याचे राज ठाकरे म्हणालेत. आत्तापर्यंत तुम्ही अनेकांना संधी देऊन पाहिली. तशीच एकदा राज ठाकरेंच्या हातात महाराष्ट्र देऊन बघा. जर नालायक ठरलो तर समोर येणार नाही आणि दुकान बंद करून टाकणार असल्याचे...

भाजपची विचारसरणी म्हणजे बाबासाहेबांचा अपमान – राहुल गांधी:म्हणाले – भाजपचे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील अन् जात जनगणना होईल

भाजपची विचारसरणी म्हणजे बाबासाहेबांचा अपमान – राहुल गांधी:म्हणाले – भाजपचे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील अन् जात जनगणना होईल

राहुल गांधींची ध्येयधोरणे पाहता ते अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून ते कोणाला इशारा देत आहेत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. तसेच, यापेक्षा अर्बन नक्षलवाद वेगळा नसल्याचेही फडणवीस म्हणाले होते. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया X वर फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची विचारसरणी म्हणजे बाबासाहेबांचा अपमान राहुल गांधी म्हणाले...

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करणे भोवणार:ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करणे भोवणार:ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

कळमनुरी विधानसभा मतदार संघात राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करतांना ग्रामसेवकाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी गुरुवारी ता. ७ कळमनुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आता चौरंगी लढतीचे चित्र असून प्रत्येक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यामध्ये शहरी...

हयातीचा दाखल 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य ४८ हजार:48 हजार पेन्शनर्सचा प्रश्न, जि. प. कडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून दिली नाही

हयातीचा दाखल 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य ४८ हजार:48 हजार पेन्शनर्सचा प्रश्न, जि. प. कडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून दिली नाही

शहर जिल्ह्यातील सर्व कोषागार व जिल्हा परिषद पेन्शनर्स यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखल सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही. त्यामुळे वेळेत हयात दाखला सादर करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे ८ हजार व कोषागारचे ४० हजार असे एकूण ४८ हजार पेन्शनर्सचा हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेकडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स धारकांना बँकेत...