Category: marathi

बंडखोरी भोवली:राजेंद्र मुळक यांच्यासह याज्ञवल्क्य जिचकार काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित

बंडखोरी भोवली:राजेंद्र मुळक यांच्यासह याज्ञवल्क्य जिचकार काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित

काँग्रेसने अखेर नागपूर जिल्ह्यातील दोन बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात रामटेक मतदारसंघातून बंडखोरी करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटलेले याज्ञवल्क्य जिचकार यांचा समावेश आहे. मुळक यांनी रामटेकमधून उमेदवारी मागितली होती. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे मुळकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ते माघार...

जाहिरातीवरून आघाडी-युतींच्या एकमेकांविरोधात तक्रारी:मविआच्या जाहिरातीत अजित पवारांची, तर भाजपच्या जाहिरातीत कॉंग्रेसची बदनामी

जाहिरातीवरून आघाडी-युतींच्या एकमेकांविरोधात तक्रारी:मविआच्या जाहिरातीत अजित पवारांची, तर भाजपच्या जाहिरातीत कॉंग्रेसची बदनामी

महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत त्यांचे पात्र दाखवण्यात आले आहे. आता, या जाहिरातीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने...

भारती विद्यापीठात बॉम्ब असल्याच्या ईमेलने खळबळ:पोलिस, बीडीडीएस तपासणी नंतर अफवा असल्याचे स्पष्ट

भारती विद्यापीठात बॉम्ब असल्याच्या ईमेलने खळबळ:पोलिस, बीडीडीएस तपासणी नंतर अफवा असल्याचे स्पष्ट

पुणे शहरातील कात्रज परिसरात असलेल्या भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल कॉलेज प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिल्यावर पोलिस बीडीडीएस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन महाविद्यालय, हॉस्टेल खाली करुन सखोल तपासणी करण्यात आली. परंतु त्यानंतर सदर बाब अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, याप्रकरणी संबंधित अनोळखी ईमेल धारका विराधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात...

संविधान पवित्र, त्याला रंगात अडकवू नका:मोदींनीही राष्ट्रपतींना लाल रंगाचे संविधान दिले होते; पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

संविधान पवित्र, त्याला रंगात अडकवू नका:मोदींनीही राष्ट्रपतींना लाल रंगाचे संविधान दिले होते; पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

राहुल गांधी संविधनाच्या नावाने लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला आहे. संविधान हे पवित्र असून त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. पृथ्वीराज...

राहुल गांधींनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा:माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा सल्ला

राहुल गांधींनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा:माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा सल्ला

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. पूर्व पुण्यातील मंगळवार पेठेत प्रबोधन मंच, श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट,...

अवयवदानासाठी वारंवार जागृती होणे आवश्यक:डॉ. अविनाश भोंडवे यांचे प्रतिपादन; आरती देवगावकर यांना कोमल पवार स्मृती पुरस्कार प्रदान

अवयवदानासाठी वारंवार जागृती होणे आवश्यक:डॉ. अविनाश भोंडवे यांचे प्रतिपादन; आरती देवगावकर यांना कोमल पवार स्मृती पुरस्कार प्रदान

सुशिक्षित व्यक्तींमध्ये अजूनही आरोग्य साक्षरता नाही तसेच दुसरीकडे अवयव दानाविषयी पुरेशी जागृतीही नाही. अवयव दानाचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी असल्याने योग्य वेळी अवयवदान न झाल्याने रुग्णांचे मृत्यू ओढवतात. अवयव दानासंदर्भातील नागरिकांच्या मनातील भीती, शंका दूर करण्याचे वारंवार प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले. मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे...

निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची समीकरणे बदलणार?:नवाब मलिकांनंतर दिलीप वळसे पाटील यांचे विधान, राज्यात चर्चांना उधाण

निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची समीकरणे बदलणार?:नवाब मलिकांनंतर दिलीप वळसे पाटील यांचे विधान, राज्यात चर्चांना उधाण

प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात त्यावर पुढील गणित अवलंबून आहे. कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलू शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. याआधी नवाब मलिक यांनी देखील निवडणुकीच्या निकालानंतर समीकरणे बदलू शकतात, असे म्हटले होते. आता दिलीप वळसे पाटलांनी असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिलीप वळसे पाटील का...

दोन दिवसापूर्वी केलेला आरोप खरा ठरला:शहरी नक्षलवाद्यांना इशारा देण्यासाठीच लाल पुस्तकाचा वापर, देवेंद्र फडणवीसांचा दावा

दोन दिवसापूर्वी केलेला आरोप खरा ठरला:शहरी नक्षलवाद्यांना इशारा देण्यासाठीच लाल पुस्तकाचा वापर, देवेंद्र फडणवीसांचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दोन दिवसापूर्वी राहुल गांधींवर केलेला आरोप खरा ठरला आहे. नागपुरात एकूणच भारताच्या संविधनाबद्दल राहुल गांधींची अनास्था पाहायला मिळाली. लाल पुस्तक घेवून त्यांना संविधानाचा गौरव करायचा नाही. तर त्यांच्यासोबत असलेले शहरी नक्षलवादी आणि अराजकतावादी यांना एक प्रकारे इशारा देण्यासाठी तसेच त्यांची मदत घेण्यासाठी हे नाटक केले आहे. पण त्यांच्या या नाटकाला आता आंबेडकरी जनताही भूलणार नाही....

उद्धव ठाकरेंना मुल्ला-मौलानांचे पाय चाटायचे आहेत:नीतेश राणे यांचे वादग्रस्त विधान, राहुल गांधीवरही केली टीका

उद्धव ठाकरेंना मुल्ला-मौलानांचे पाय चाटायचे आहेत:नीतेश राणे यांचे वादग्रस्त विधान, राहुल गांधीवरही केली टीका

भाजप आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उबाठा ही मुस्लिम लीगची बी टीम झाली असून उद्धव ठाकरे यांनी आमच्या धर्मगुरू आणि महंतांना न भेटता मुल्लांचे आणि मौलानाचे पाय चाटायचे आहेत, असे नीतेश राणे म्हणाले. नीतेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफळण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, अशी टीका...

असे गलीच्छ लिखाण करणाऱ्यांना देशात राहायचा अधिकार नाही:तळपायाची आग मस्तकात जाते, राहुल गांधींच्या लेखावर भडकले उदयनराजे

असे गलीच्छ लिखाण करणाऱ्यांना देशात राहायचा अधिकार नाही:तळपायाची आग मस्तकात जाते, राहुल गांधींच्या लेखावर भडकले उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांचा एक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. या लेखावर उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राहुल गांधीला या देशात राहण्याचा अधिकार नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करून थांबले नाहीत....