Category: marathi

वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा:रोहिणी खडसे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी; ‘पॉलिटिकल नेक्सस’चा आरोप

वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा:रोहिणी खडसे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी; ‘पॉलिटिकल नेक्सस’चा आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस झाले होते. त्यामुळे हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता. सी-आयडीच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे पुढे आले होते. त्यामुळे आता वैष्णवी हगवणे प्रकरण देखील सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे. या संदर्भात रोहिणी खडसे...

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य:ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का? पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलटप्रश्न

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य:ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का? पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलटप्रश्न

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी...

वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी शशांक आणि सुशीलवर आणखी एक गुन्हा:शस्त्र परवाने मिळवण्यासाठी बनावट पत्त्याची कागदपत्रे सादर

वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी शशांक आणि सुशीलवर आणखी एक गुन्हा:शस्त्र परवाने मिळवण्यासाठी बनावट पत्त्याची कागदपत्रे सादर

वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि आत्महत्या प्रकरणातील आरोपी शशांक आणि सुशील हगवणे यांना शस्त्र परवाने दिल्याच्या आरोपाखाली पुण्यातील विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांची चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे मंजूर करून परवाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केली असून दरम्यान गृह विभागाने गुरुवारी सुपेकर यांच्यावरील अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात...

वर्षा गायकवाड यांचे गोडसेंशी नाते; शेलारांचा राहुल गांधींना टोला:तर अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा गायकवाडांचा पलटवार

वर्षा गायकवाड यांचे गोडसेंशी नाते; शेलारांचा राहुल गांधींना टोला:तर अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा गायकवाडांचा पलटवार

काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांचे गोडसेंची नाते आहे. लग्नानंतर त्यांचे सासरचे आडनावच गोडसे असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. तर याला आता वर्षा गायकवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. शेलार हे अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा पलटवार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर वर्षा गायकवाड यांनी देखील त्यांना जोरदार...

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी इगतपुरीमध्ये दाखल:संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपद गेले

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी इगतपुरीमध्ये दाखल:संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपद गेले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले खोटे आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी...

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण उघड:11.70 लाखांची केली फसवणूक, पिस्तूल दाखवत दिली धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण उघड:11.70 लाखांची केली फसवणूक, पिस्तूल दाखवत दिली धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

पुण्यातील हगवणे बापलेकांच्या फसवणूक आणि गुंडगिरीच्या मालिकेला काही केल्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही. आपल्या सुनेचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आधीच तुरुंगात असलेले शशांक व राजेंद्र हगवणे यांच्यावर आता आणखी एका नागरिकाने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तब्बल...

पाकिस्तानला पुरवली भारताची गोपनीय माहिती:ठाण्यातून गद्दाराला अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

पाकिस्तानला पुरवली भारताची गोपनीय माहिती:ठाण्यातून गद्दाराला अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी तपास यंत्रणांना भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला ठाण्यातून अटक केली आहे. देशाच्या या गद्दाराची चौकशी केली असता असे समजले की हा आरोपी पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या नोव्हेंबर 2024 पासून संपर्कात होता. फेसबुकच्या माध्यमातून हा संपर्क होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रविंद्र मुरलीधर वर्मा असे असून तो 25 वर्षांचा आहे. संरक्षण...

सीबीआय पथक थेट पासपोर्ट कार्यालयात:अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, विशेष न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

सीबीआय पथक थेट पासपोर्ट कार्यालयात:अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, विशेष न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

सीबीआयने थेट मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयात एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पासपोर्ट कार्यालयातील सहाय्यक आणि एका दलालाला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. बनावट पासपोर्ट बनवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कनिष्ठ पारपत्र सहाय्यक अक्षय कुमार मीणा व दलाल भावेश शांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्षय कुमार मीणा हे कनिष्ठ पारपत्र सहाय्यक असून लोवर...

साडे 5 किलो सोन्यापैकी 32 तोळेच रिकव्हर:बाकी सोने गेले कुठे? वाळूज दरोडा प्रकरणी मंत्री शिरसाटांनी थेट गाठले आयुक्तालय

साडे 5 किलो सोन्यापैकी 32 तोळेच रिकव्हर:बाकी सोने गेले कुठे? वाळूज दरोडा प्रकरणी मंत्री शिरसाटांनी थेट गाठले आयुक्तालय

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात उद्योगपतीच्या घरावर दरोडा पडला होता. या प्रकरणात 26 मे रोजी एका संशयित आरोपीचा एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यानंतर संशयित आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने आणि वडिलांनी पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी देखील उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यात पोलिस देखील सहभागी असतात,...

अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे:चारित्र्यावर आरोप करण्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही, गिरीश महाजन हगवणेंच्या वकिलावर संतापले

अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे:चारित्र्यावर आरोप करण्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही, गिरीश महाजन हगवणेंच्या वकिलावर संतापले

‘अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे. हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. हगवणे यांच्या वकिलाने बुधवारी केलेल्या युक्तिवादावर तसेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या विधानांवर ही संतप्त प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी...