चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य:ते हिंदुत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा, संजय राऊतांचे विधान; नेमके काय म्हणाले राऊत?

चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य:ते हिंदुत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा, संजय राऊतांचे विधान; नेमके काय म्हणाले राऊत?

चंद्रकांत खैरे हे हिंदुत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा आहेत. त्यांना बघितले तर शंकराचार्य यांची आठवण येते. ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिक येथे निर्धार शिबिरात ‘आम्ही इथेच’ या चर्चासत्रात बोलताना संजय राऊत यांनी चंद्रकांत खैरे यांच्याविषयी हे विधान केले आहे. या चर्चासत्रात चंद्रकांत खैरे यांच्यासह राजन विचारे, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत सहभागी होते. नाशिक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात ‘आम्ही इथेच’ हे चर्चासत्र भरवण्यात आले होते. यावेळी संजय राऊत तसेच अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे व राजाभाऊ वाजे यांच्यात प्रश्नोत्तर रंगले होते. यावेळी संजय राऊत चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारताना म्हणाले, चंद्रकांत खैरे आले आहेत, हिंदूत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा आहेत ते. त्यांना बघितले तर शंकराचार्य यांची आठवण येते. ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. औरंगजेबाची कबर आहे, ते तिथून येतात. कडवट शिवसैनिक आहेत, हा कडवटपणा आला कुठून? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला होता. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, मी मार्मिक मुळे शिवसेनेत आहे. वडील मार्मिक वाचायचे त्यामुळे शिवसेनेत आलो. शाखा स्थापन केली. साहेबांना भेटायचे होते, मला जाऊ देत नव्हते. मी घुसखोरी केली, साहेबांना लोटांगण घातले. साहेबांना बोललो तुम्ही मराठवाड्यात या. ते म्हणाले तुम्ही शिवसेना वाढवा. पुढे संजय राऊत यांनी विचारले की बाळासाहेब ठाकरे यांची पहिली थाप कधी पडली? त्यावर उत्तर देताना खैरे उत्तर देताना म्हणाले 1978 साली. दरम्यान, चंद्रकांत खैरे हे अंबादास दानवे यांची तक्रार घेऊन मातोश्रीवर गेले होते. तिथून बाहेर पडल्यावर चंद्रकांत खैरे यांचा सूर बदलल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा घेण्यात आला होता. या बैठकीला चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते. त्यावरून अंबादास दानवे यांनी मला बोलावलेच नव्हते, असा आरोप खैरे यांनी केला होता. तसेच अंबादास दानवे काड्या करतो, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर खैरे यांनी मातोश्री गाठले होते. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला आहे. मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नव्हतो, असे स्पष्टीकरणही खैरे यांनी दिले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment