चेन्नईतील अण्णा विद्यापीठातील बलात्काराच्या आरोपीला जन्मठेप:30 वर्षे तुरुंगवास; बिर्याणी विक्रेत्याने 19 वर्षांच्या विद्यार्थिनीचे केले होते शोषण

तामिळनाडूतील चेन्नई येथील अण्णा विद्यापीठातील हाय-प्रोफाइल लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरलेल्या ज्ञानसेकरनला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. महिला न्यायालयाच्या न्यायाधीश एम. राजलक्ष्मी यांनी सांगितले की, दोषीला कोणत्याही प्रकारची सूट न देता किमान ३० वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. दोषीला ९० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ज्ञानसेकरननला २८ मे रोजी दोषी ठरवण्यात आले. त्याच्यावरील लैंगिक छळ, बलात्कार, धमकी आणि अपहरण यासह सर्व ११ आरोप खरे सिद्ध झाले. या प्रकरणात किमान २९ साक्षीदारांनी साक्ष दिली आणि पोलिसांनी १०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण डिसेंबर २०२४ चे आहे. अण्णा विद्यापीठाबाहेर बिर्याणी विकणारा ज्ञानसेकरन २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसला आणि १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तेव्हा ती तिच्या एका मैत्रिणीसोबत होती. ज्ञानसेकरनने तरुणीला मारहाण केल्यानंतर मुलीचे शोषण केले. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने घटनेचा व्हिडिओही बनवला.