छगन भुजबळ यांची NCP सोडण्याची हिंमत नाही:कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे आव्हान, तर भुजबळ ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

छगन भुजबळ यांची NCP सोडण्याची हिंमत नाही:कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे आव्हान, तर भुजबळ ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, छगन भुजबळ यांची पक्ष सोडण्याची हिंमत नाही. त्यांनी पक्ष सोडून दाखवावा, असे आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे. सुहास कांदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान न देऊन अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला असल्याचे सुहास कांदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा वाद विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील पाहायला मिळाला होता. कांदे हे भुजबळांचे कट्टर विरोधक म्हणूनही ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यमंत्रीमंडळात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आपल्याला आनंद झाला असल्याचे कांदे यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले. छगन भुजबळ यांचे ज्या – ज्या वेळेस काही वाईट होते, त्या – त्या त्यावेळी मला आनंद होतो, असे देखील कांदे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांची पक्ष सोडून जाण्याची हिंमत नाही. त्यांनी पक्ष सोडून दाखवावा, असे आव्हान देखील त्यांनी भुजबळ यांना दिले आहे. छगन भुजबळ सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत राज्यमंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही त्यानंतर छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी नागपूर सोडून थेट नाशिक गाठले. यावेळी त्यांनी नाशिक मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत थेट आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली. मात्र पक्ष सोडण्याचा कोणताच निर्णय त्यांनी जाहीर केला नाही. अजित पवार हे लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे छगन भुजबळ सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. नाशिक येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर आता ते मुंबईत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भातील मागील बातमी देखील वाचा…. छगन भुजबळांचे महायुतीविरोधात काम:म्हणून त्यांना मंत्रिपद नाकारले, शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा दावा; NCP सोडण्याचे आव्हान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम केले. मी त्याचे पुरावे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही, असा दावा शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी केला. भुजबळांनी कितीही ढोंग व आगपाखड केली तरी त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याची हिंमत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment